हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

दामिनी आणि दामिनी

काय  विचित्र योगायोग आहे
फार पूर्वी दामिनी नावाचा मीनाक्षी व ऋषी व सनी चा सिनेमा आला होता ,
दिल्लीच्या बड्या घरात एक मध्यमवर्गीय मुलगी सून म्हणून जाते व तेथे होळीच्या दिवशी घरातील मोलकरणीवर झालेल्या बलात्काराविरूढ एकटी उभी ठाकते व शेवटी तिला न्याय मिळतो. राजकुमार संतोषी ह्या द्रष्ट्या दिग्दर्शकाने  दिल्ली मधील परिस्थितीचा आढावा घेत फार पूर्वी दिल्लीत होणारा बलात्कार व त्या तरुणीस न्याय मिळवून देण्यासाठी दामिनी नावांच्या मध्यमवर्गीय मुलीची संघर्षगाथा ह्या सिनेमातून मांडली, सिनेमा यशस्वी झाला मात्र वास्तविक जीवनातील  परिस्थिती अजिबात बदलली नाही.
ह्या सिनेमांच्या अनेक वर्षानंतर दिल्ली मध्ये दामिनी नावाच्या मुलीवर बस मध्ये बलात्कार होतो , आणि तिचा त्यात मृत्यू सुद्धा होतो ,
तिला न्याय मिळणार का

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

Christmas in Germany, जर्मन भाषेत Weihnachnten

जर्मनीत आता .हिवाळा सुरू झाला तोच मुळी अंगात हुडहुडी भरायला लावेल इतक्या ताकदीचा म्हणजे उणे ५ पर्यंत तापमान घसरले .हिमवर्षाव सुरू झाला .माझी लहान मुलांसारखी पावसाळ्याची खरेदी असते तशी तशी हिवाळ्याची खरेदी सुरू झाली .सर्वात प्रथम लोकरीचे मोजे व टोपी ती पण आवडत्या प्रसिद्ध जर्मन ब्र्यांड एसस्प्रिट  चे .अंगावर अद्ययावत कोट चढविण्यात आला .मग सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आतून लोकर असलेले लेदरचे जाड हिवाळा व हिमवर्षाव ह्यासाठी खास बनविलेले वजनदार बूट घेण्यात आले .त्याआधी दोन दिवस हिम वर्षावात मी साधे बूट घालून फिरत होतो .तेव्हा काही वेळात माझे सर्व शरीर व आतील रक्त गोठले जातेय अशी भावना व अवस्था निर्माण व्हायची .अश्यावेळी ड्रॅक्युला ने जर माझे रक्त शोषले. तर त्याला गोळे वाल्याचा चा लाल भडक बर्फाचा गोळा चाखायला मिळेल अशी कल्पना मनात आली.

सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

सध्याच्या बलात्कार कायदा काही प्रकरणात पुरुषांवर अन्याय कारक आहे.

हे शीर्षक वाचून अनेक जणांना माझ्यावर तोंड सुख घेण्याचा मोह होईल ,
सध्या वातावरण तंग आहे , ह्या मुद्द्यावर लोकांच्या भावना प्रखर आहेत , अश्यावेळी पुरुषांच्या बाजूने काही लिहिणे म्हणजे ब्रह्म हत्येचे पातक अंगावर ओढून घेण्याचा प्रकार झाला.
मला आभासी जगतात ओळखणाऱ्या सर्वांनाच माहिती असेल की दिल्लीत घडलेल्या घटनेवर मी  सोशल नेटवर्किंग साईट वर  प्रतिक्रिया  दिल्या आहेत.

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

कलोन , जर्मनी चे सांस्कृतिक वैभव भाग २


आम्ही स्टेशन वर आलो .अल्बर्ट येणार होता .आता पित्याला पाहून दाटून कंठ येतो कि काय अशी गमतीदार कल्पना माझ्या डोक्यात आली.  त्याने आल्या आल्या आज त्याचा क्लब जिंकला म्हणून मी खुशीत आहे .असे सांगितले .बाकी ह्या फूटबॉल पटू व गाढवा मध्ये एक साम्य असते म्हणजे दोघेही लाथा मारतात . आपण सर्व भारतीय गाढव असल्याची समजूत नेते आपल्याला आश्वासनाचे गाजर दाखवत असतात .

रविवार, १६ डिसेंबर, २०१२

सचिनची निवृत्ती व काही भ्रष्ट प्रवृत्ती

मला खरच कळत नाही की सचिनच्या निवृत्ती वर चर्चा करून आपण त्याला संघापेक्षा मोठे करत आहोत. आणि बाकीच्यांचे काय
ते त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करत आहे का क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे विसरून कसे चालेल. एकदा सचिनवर सर्व चर्चा केंद्रित केली की भारताच्या पराभवाला , संघाच्या भिकार कामगिरीवर कानाडोळा करायला प्रसारमाध्यम व त्यांच्या आहारी गेलेली जनता मोकळी .

सध्या ऐरणीवर आलेला प्रश्न हा आहे की भारतीय कसोटी संघाला गतवैभव कसे प्राप्त होईल.

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

सिनेमे आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या आठवणी

सिनेमे आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या  काही खास आठवणी असतात.
आभासी जगतात भटकत असतांना ह्या भन्नाट विषयावर वाचायला मिळाले.
ह्या निमित्ताने माझ्या आठवणींना लागलेला पाझर मी येथे रिता करतो.

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

कलोन , जर्मनी चे सांस्कृतिक वैभव

 माझ्या अनुदिनी मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माझे जर्मनी मधील वास्तव्यातील अनुभव जर्मन आख्यान ह्या सदरात देत आहे.
अबुधाबीहून जर्मनीला केट सर्वप्रथम आली व मी मुंबईला जर्मन भाषेची मुळाक्षरे गिरवून दोन महिन्यांनी कलोनला आलो.
जर्मनीत दीर्घ वास्तव्यासाठी यायचे असेल तर भाषेची तोंडओळख असणे अनिवार्य आहे तसा सरकारचा कायदा आहे ,त्यासाठी कोणालाही आंदोलन करायला लागत नाहीत.
 

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

एक अफगाणी, त्याची कहाणी

 .

तो प्रसंग अजूनही आठवला की गंमत वाटते. जेवत असताना आमच्या टेबलावर तीन अफगाण, दोन पाकिस्तानी व मी एकटा हिंदुस्थानी जेवायला बसलो होतो. आणि अचानक एका अफगाणाने "आप कहाँ से हो?” असा प्रश्न विचारला. “मुंबईसे” असे मी म्हटल्यावर तो क्षणभर चकित झाला. मला सगळ्यांसमोर प्रश्न विचारला, "आप क्या रॉ के आदमी हो?” त्याच्या ह्या अकस्मिक प्रश्नावर टेबलावरील सर्व सज्जन गृहस्थ माझ्याकडे रोखून पाहायला लागले.

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

कसाब ( चोरी चोरी ,चुपके चुपके )

कसाब कसा मेला म्हणजे फाशीच्या दोरी मुळे की डासामुळे ह्यावर सध्या पब्लिक चर्चा करत आहे. त्यांच्या आणि लादेन च्या मृत्यू बाबत असे गूढ वलय निर्माण झाले आहे हा योगायोग की अमेरिकन सरकार व आपले प्रशासन आजकाल मित्र असल्याने ,,,, असो . मह्त्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला फाशी देण्याची बातमी सरकारने मस्त रंगवून दिली आहे . एकदम गुप्तहेर कथेप्रमाणे गोपनीय , पण कल्पना करा जर त्यांची फाशीची शिक्षा सरकारने १ आठवडा आधी जाहीर केली असती कदाचित लोकांच्या मनात शंका निर्माण झाली नसती पण प्रसार माध्यमांनी मात्र जो काही धुमाकूळ घातला असता त्यांची मी कल्पना केली

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात.

 सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात 
. मिसळपाव ह्या मराठी संकेत स्थळावर वर एका माजी सभासदाने बहुदा नाना असावा ह्याने हे वाक्य लिहले होते. साहेबांच्या अंत्ययात्रा थेट प्रक्षेपित करत असतांना काही मराठी वृत्त निवेदक मग ते इंग्रजीतून असो किंवा मराठीतून अत्यंत निकृष्ट , हलक्या , दर्जाचे वृत्त देत होते. त्यांनी घेतलेल्या मुलाखती असो किंवा वृत्त निवेदन ह्यात हिंदू हृदय सम्राटाला आदरांजली कमी व इतर बरीच जळजळ दिसून येत होती. पोटातील आम्लयुक्त जळजळ इनो ने दूर करता येते. मात्र वैचारिक जळजळ झाल्याने विखारी पत्रकारिता करणाऱ्या ह्या प्रसारमाध्यमांना कोणता डोस द्यावा ह्या विचार मला पडला आहे. 
मुंबईत एका मुस्लिम युवतीने फेसबुक वर बाळासाहेबांच्या साठी अपशब्द वापरले आणि तिच्या हिंदू मैत्रिणीने ते लाईक केले ह्यासाठी त्या दोघींना अटक होऊन कोर्टाने दिवसाची सजा सुनावली. मात्र ह्या प्रसारमाध्यमांना कोण आवरणार ?

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

सौनायन नमः (इन रोम बी रोमन, चलो सौंना)

 अश्या आजीचा गोड निरोप घेतल्यावर अनिता व केट खरेदीसाठी बाहेर पडल्या .अल्बर्ट म्हाणाला मी व माझे काही मित्र सौना बाथ ला जाणार आहोत येशील का ?
मी लगेच हो म्हटले .ह्यावर केट जाताना कानात कुजाबली तुला माहिती आहे का येथे सौना बाथ महिला व पुरुषांचा एकच असतो. व सगळे दिगंबर पंथीय असतात .तिथे .मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखे कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

आमची ओमा

जर्मनी दुसऱ्या महायुद्धानंतर दोन भागात विभागला केला .भांडवलदार पाश्चिमात्य ज्या पैकी फ्रांस व अमेरिकेने वेस्ट जर्मनीचा विकासाचा मक्ता घेतला .जर्मन नवीन पिढीला इतिहास व भांडवलशाही आपल्या पद्घतीने शिकवली.तर पूर्व जर्मनी साम्यवादी रशियाच्या ताब्यात आला . दोघांची बर्लिन येथे भिंत उभी करून ह्या देशाची फाळणी केली .एकि कडे मुक्त व्यापार व्यवस्था /लोकशाही व विकासाच्या मार्फत अमेरिकेतून जन्माला आलेला चंगळवाद होता .व दुसरीकडे पूर्व जर्मनीत रशियन आदर्शवाद / साम्यवादी विचारसरणी व सरकारी व्यवस्थेने पूर्ण कब्जा केलेले लोकांचे जीवन होते .आजही एकसंध झाल्यावर त्यांच्यातील मुल्ये व जीवन पद्धती वेगळ्या असल्याने भौगोलिक दृष्ट्या जरी एक आले असले तरी त्यांचे मनोमिलन अजून झाले नाही आहे .

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१२

मलाला ( परकीय प्रसारमाध्यमांचा बळी )

मला एक गोष्ट कळत नाही आपण प्रसार माध्यमांच्या एवढे अधीन का आहोत. मलाला विषयी परकीय प्रसारमाध्यमांनी वृत्त जगभर प्रसिद्ध केले. आणि अचानक भारतीयांना ती अन्यायाचे विरोध करणारे एक प्रतिक दिसली (  काही दिवसांपूर्वी त्यांना आण्णा हजारे आणि केजारीवाल सुद्धा वाटायचे ) मात्र ह्या प्रसारमाध्यमांनी नाण्याची एक बाजू मांडली आहे.  तिची दुसरी बाजू समोर आणण्यासाठी हा लेखप्रपंच
  
 त्या १४ वर्षाच्या पाकिस्तानी मुलीवर तालिबान ने हल्ला केला येथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे तालिबान मुल्ला ओमर चे नाही तर पाकिस्तान मधील तालिबान आहेत जे अमेरिकेलाच मदत करणाऱ्या पाकिस्तानी लष्कर व आय एस आय च्या लोकांना गेली ५ वर्ष टिपून मारत आहेत.  तेहेरीके तालिबान ही पाकिस्तानच्या सीमेलगत ची संघटना आहे.
ती तालिबान पासून फुटून वेगळी झाली.  त्यांचे प्रमुख लक्ष्य हे पाकिस्तानी सैन्य , व आय इस आय आहे.
 ते अमेरिकन बाहुले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
म्हणून त्यांना पाकिस्तानी मीडियातील अनेक जण सी आय ए व रॉ चे  हस्तक म्हटले जाते.

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

. पुराना मंदीर और पुरानी यादे ( बालपणीच्या आठवणी )

काल हेलोवीन होता. अमेरिकेत तर निसर्ग चेटकीण , भुतांच्या स्वरुपात प्रत्येक अमेरिकावासियांच्या दारावर उभे ठाकले आहे.
जर्मनीत ह्या सणाचे विशेष महात्म्य नाही. पण माझे मन मला माझ्या बालपणीच्या आठवणी मध्ये रमले.
भुतांच्या गोष्टी आजी , आजोबा ह्यांच्या कडून ऐकल्या गेल्या. माझा पिंड
भुतांच्या गोष्टीवर बालपणी पोसल्या गेला.

आमच्या सोसायटी मध्ये गच्चीवर भाड्याने विडीयो आणून ३ सिनेमे सलग पाहण्याची परंपरा कोजागिरीच्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सुरु झाली. येथेच मी गुमनाम , बीस साल बाद ( जुना ) आणि वो कौन थी सारखे सिनेमे पहिले.

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२

अमेरिकन संडी आणि शाळेला दांडी

अमेरिकेत आलेल्या वादळामुळे साहजिकच डोंबिवलीकर व स्वामी राणा प्रताप  शी निगडित सर्व विद्यार्थ्यांना काळजी वाटणे संयुक्तिक आहे. आपले अनेक आप्त मित्र , मैत्रिणी तेथे आहेत.
ते सुखरूप असतील अशी आशा करतो. (ज्यांनी अजून आपले स्टेटस अपडेट केले नाही आहेत त्यांनी लवकर करा ,
 . प्रसार माध्यमे सतत तेथील परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. तेव्हा काळजी वाटते.)

चेहरा पुस्तकावर अनेकांची म्हणजे हेरंभ व इतर वर्ग मित्रांची खुशाली त्यांच्या खुसखुशीत स्टेटस वाचून कळत असते. इतर ही असेच सुखरूप असतील , .पण त्यांचे स्टेटस अजून वाचायला मिळाले नाही आहेत.
अश्या वेळी माझ्या  टवाळ , वात्रट स्वभावाला अनुसरून  मला ह्या तणावग्रस्त परिस्थितीत सुद्धा डोक्यात कल्पना आली.  जर आपल्या बालपणी शाळेत असतांना  चक्रीवादळ  डोंबिवलीत आले असते तर
.

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

यश चोप्रा एक इत्तेफाक

माझी पिढी यश जी ना किंग ऑफ रोमान्स समजते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली अशी सुतकी भाषा मी वापरणार नाही कारण सदाबहार व मानाने चिरतरुण असलेल्या ह्या ८० वर्षाच्या  युवकाचा तो अपमान ठरेल. त्यापेक्षा आजच्या पिढीला माहीत नसलेले यश जी मी त्यांच्या माझ्या आवडत्या सिनेमा द्वारे दाखवू इच्छितो.

 रहस्य कथा बहुतेक सर्वांना आवडतात.   

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

ओ माय गॉड , मोदी विरोधक ,

इतके दिवस  म्हणजे २००२  च्या गुजरात दंगली नंतर  मानवी हक्काच्या पायमल्ली चे  कारण  देऊन अमेरिकेने नरेंद्र मोदी ह्यांचा विसा नाकारला व गुजरात शी संबंध तोडले. ब्रिटीश कालपरवा पर्यंत अमेरिकेची वसाहत असल्यासारखे आंतर्राष्ट्रीय राजकारणात  वागत होते. त्यांनी अमेरिकेची री ओढली. गुजरात शी व्यापारिक संबंध तोडले.
मात्र आता ब्रिटन च्या अर्थव्यवस्थेला पूर्वीच्या वैभवशाली काळात न्यायचे  असेल तर शुद्ध व्यापारी निर्णय घेणे गरजेचे आहे हे ब्रिटिशांनी ओळखले.

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

आशा भोसले व पाकिस्तानी कलाकार

 सध्या पाकिस्तानी कलाकार व भारतीय कार्यक्रमात सहभाग ह्या विषयांवर बरेच काही लिहून येत आहे. त्या विषयी माझे मुक्त प्रकटन ह्यात मी अबुधाबी , युके , आणि जर्मनी मध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांना भेटलो व त्यांच्याशी संवाद साधला चर्चा ,वादविवाद खूप घातले. त्यांचा कडून भारताविषयी मत जहाल ,मवाळ मते कानावर पडली म्हणूनच ह्या विषयावर वेगळ्या दृष्टी कोनातून विचार मांडत आहे.

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१२

गो मेरी गो

उद्या लंडन मध्ये ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या स्थानिक वेळ दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी ५ वेळा जगजेत्ती भारतीय मेरी कोम व ब्रिटीश खेळाडू निकोल अडम ह्यांच्यात बॉक्सिंग चा सामना रंगणार आहे. मेरी कॉम ही साऱ्या भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याची माझ्या मते शेवटची आशा आहे.

 दोन मुलांची आई व ५ वेळा जगात अजिंक्य ठरूनही सानिया किंवा आपल्या आय पी एल खेळणाऱ्या स्टार खेळाडू सारखा लक्ष्मीचा वरदहस्त तिच्यावर कधीच नव्हता. आता मात्र लंडन मध्ये तिची मुलाखत घेण्यासाठी जगभरातील वार्ताहर तळमळत आहेत. सानिया मिर्झा खाली हात आये थे हम , खाली हात जायेंगे हे ऋतिक रोषन च्या पहिल्या सिनेमातील गाण्यातील ओळ सार्थ करत आपल्या घरी गेली सुद्धा असेल

. तेव्हा आपल्या पूर्व भारताच्या ह्या मिलियन डॉलर बेबी च्या विजयासाठी सर्वांनी मिळून साकडे घालूया. येथे जर्मनीत बॉक्सिंग लोकप्रिय आहे. मात्र महिला बॉक्सिंग चा पहिल्यांदा ह्या ऑलिंपिक मध्ये सहभाग झाल्याने त्यातही भारतीय महिला खेळाडू ने पदक नक्की केल्याने मी व केट उद्या ऑफिस ला दांडी मारून उद्याचा सामना पाहणार आहोत.

शुक्रवार, २० जुलै, २०१२

दास्ताने हिंदुस्तान ( राजस्थान , एक शाही अनुभव )


 भारत दौरा करून आता ४ महिन्याहून जास्त काळ लोटला पण अजून दोन आठवडे केलेल्या मनसोक्त भटकंतीच्या रम्य आठवणी मनात रुंजी घालत आहेत. प्रत्येक वेळी भारतात येणे हे मी सहसा एखाद्या चुलत, मावस भावांचे लग्न ठरले की ठरवतो. ह्यामुळे बहुसंख्य नातेवाईकांना एकाच वेळी भेटता येते. एरवी अश्या अनेक आप्त परकीयांच्या लग्नात येणे जमत नाही. मग फेसबुक वर त्यांच्या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देणे व आपण हुकलेले क्षण ह्या आभासी जगतातील आभासी दुनियेत पहाणे, उपभोगणे एवढेच माझ्या हाती उरते

शनिवार, १४ जुलै, २०१२

जर्मनीतील सोशल बेनिफीट आणि भारतीयांना संधी

सध्या वास्तव्य आमचा डेरा  म्युनशन शहरात आहे  जर्मनी मध्ये जर दिर्घकाळ वास्तव्य ( १ एका वर्षाहून जास्त ) जर असेल  .की येथे सरकारचा इंटिग्रेशन कोर्स करावा लागतो. ह्या कोर्स मध्ये बे१ म्हणजे ४ त्या लेव्हल पर्यंत जर्मन भाषा आणि जर्मनीच्या आर्थिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,व युरोपियन युनियन बद्दल माहिती शिकवली जाते.त्यावर सरकारतर्फे परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झालेल्या लोकांनाच येथे विसा वाढवून दिला जातो. आमच्या देशात राहणार असाल तर आमची भाषा व संस्कृती जाणून घेतलीच पाहिजे असा पवित्रा येथील सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला.ह्यासाठी तेथे वेगळे भाषेवरून आंदोलन झाले नाही. मुळात सरकारने  वेळीच कायदा करून त्याची अंमल बजावणी केली तर मग उगाच कोण कशाला आंदोलन करेन

शनिवार, ३० जून, २०१२

फुटबॉल वल्ड कप २०१० कलोन मंतरलेले दिवस भाग १



जर्मनी नुकताच युरोकप मधून बाहेर झाला. मात्र जोपर्यंत जर्मनी स्पर्धेत होता. तेव्हा येथे म्युनशन मध्ये भारलेले वातावरण होते. एक धुंदीत ,कैफात सर्व वावरत होते. अशी बेभान   करणारी ह्या खेळाची नशा मी २०१० च्या फुट बॉल च्या विश्वचषकाच्या वेळी मी अनुभवली होती. माझे मन मला भूतकाळातील रम्य आठवणीच्या दालनात नेत आहे. व म्हणूनच माझा त्याकाळात लिहिलेला    लिहिलेला लेख येथे अडकवत आहे..

विश्व चषक तोही फुटू बॉलचा ..माझा आणि माझ्या जर्मन पत्नी मध्ये दोन राष्ट्रात होतात तसा एक द्विपक्षीय अलिखित करार झाला आहे .फुट बॉल-च्या स्पर्धेत मी जर्मनीला पाठिंबा द्यायचा (माझा जर्मन सासरा एकेकाळचा नावाजलेला फुट बॉल पटू /कोच / रेफ्री व सध्या निवृत्तीनंतर स्वताच्या क्लब साठी काहीना काहीतरी करत असतात .) त्या बदलण्यास तिने क्रिकेट च्या विश्व चषक स्पर्धेत हिंदुस्थानला पाठिंबा द्यायचा .(आमच्या दोघांचेही हा करार करतांना  तिला क्रिकेट व मला फूटबॉल ह्या खेळा विषयी फारशी आवड नाही आहे. .)

फुटबॉल वल्ड कप २०१० , कलोन मधील मंतरलेले दिवस भाग २

त्या रोमहर्षक क्षणाची चित्रफीत (  आता ह्यात मी ती शिट्टी कर्कश का वाजवत आहे अशी विचारणा करू नका कारण खूप दिवसांनी ती माझ्या तोंडात आली होती. )

२००६ चा लंडन मध्ये आम्ही सामने पहिले ते पब मध्ये. तेव्हा आठवते पोलंड विरुद्ध जर्मनी असा सामना रंगत आला असताना बहुसंख्य पोलिश घोळक्यात आम्ही जर्मन संघासह पाठिंबा देणारे अल्पसंख्य होतो त्यामुळे घोषणा बाजीत कमी पडत होतो .शेवटी इतकावेळ गप्प बसलेल्या मला त्या जर्मन बांधवांचे दुखः पाहवलं नाही. मग आवाज कुणाचा.... च्या तालावर मी चालू झालो बाकी एविबिपी मध्ये कधीकाळी कार्यरत असल्याचा दांडगा अनुभव माझ्या नरड्यात होता. तेव्हाही कर्मभूमी युके व भावी जावई म्हणून जर्मनी हे समोरासमोर येऊ नये अशी प्रार्थना केली होती .नाही तर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था झाली असती. .बाकी क्रिकेट च्या वेळी आपली भूमिका स्पष्ट असते .त्यावेळी अंगात भुवन संचारला असतो

बुधवार, २० जून, २०१२

मराठी संकेत स्थळावरील अनुभव व त्यांचा वास्तविक जीवनातील वास्तविक उपयोग

 मराठी संस्थळावर मुशाफिरगिरी करून ३ वर्ष झाली. सुरवातीला साता समुद्रापलीकडून मराठीत काही दर्जेदार वाचायला मिळावे ह्या हेतूने येथे माझा राबता सुरु झाला. सुरवातीला इतरांसारखा मी मूक वाचक होतो. हळू हळू प्रतिसाद द्यायला लागलो. व मग लेखनाला सुरूवात केली. माझे लेखन हे बहुदा एखाद्या विषयांवरील मनातील मुक्त प्रकटन असते किंवा गतकाळातील स्मृती परत जगण्यासाठी ,अनुभवले क्षण परत अनुभवण्यासाठी प्रवास वर्णन करणे इतपत मर्यादित असते.
 मात्र येथे मला आलेले अनेक चांगले वाईट ,आंबटगोड अनुभव दरवेळी काहीतरी नवीन शिकवून गेले. माझे वैचारिक ,भावनिक , सामाजिक , सांस्कृतिक विश्व समृद्ध करून गेले. आभासी जगतातील शिकवणीचा वास्तविक जगात कसा फायदा होतो ह्या बद्दल थोडे विनोदी अंगाने लेखन केले आहे. तेव्हा हलके घ्यावे ( टेकू इट इजि)
 मराठी संस्थळावर लिहीता झाल्याने माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप होकारात्मक बदल झाले. मला वाचनाचे व्यसन असल्याने जास्त वाचून व तू नळीवर पाहून मनातील भाव ,भावना ह्यांचा निचरा होण्यास आभासी जगतात अभिव्यक्त होणे हा रामबाण उपाय आहे. एखादे टोपण नाव घेउन समजा आपण एखादा विचार जो प्रत्यक्ष जीवनात मांडायला चाचरतो तो आभासी जगतात मांडला व त्याला काही समविचारी मंडळीचे अनुमोदन मिळाले की आपल्या विचार अगदीच फुटकळ नव्हता हा विचार एक आत्मविश्वास देऊन जातो.

बुधवार, १३ जून, २०१२

दोन बातम्यांवर मुक्त प्रकटन ,राष्टपती मनमोहन , शांघाय च्या निमित्ताने उरातील सल

मनमोहन ह्याच्या कारकिर्दीची अखेर व्हावी आणि त्यांचा पुढील ५ वर्ष गुळाचा गणपती करावा म्हणजे त्यांच्या आंतराष्ट्रीय नावाचा देशाला व पक्षाला फायदा
व संकट विमोचन अशी ख्याती असलेले मुखर्जी ह्यांच्या हाती पंतप्रधान पद ( ज्यासाठी त्यांनी कधीपासून देव पाण्यात घातले आहेत.)  व अर्थमंत्री पदी अलुवालीया
(  विकीलीक्स नुसार अलुवायीया ह्यांना अर्थमंत्री न केल्याबद्दल सखेद आश्यर्य व्यक्त करणारी तार भारतातील अमेरिकन दूतावासातून गेली होती. )
थोडक्यात काय एकमेका सहाय्य करू ",एवढे  धरू सुपंथ असा राजनैतिक डाव मांडला जात आहे".
मनमोहन ह्या पदासाठी सर्वथा योग्य आहेत.

सोमवार, ११ जून, २०१२

वय हे मानण्यावर असते. Top Gun


एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?

 काही ठिकाणी नेट वर म्हणजेच आभासी जगतात अश्या प्रकरच्या वाझोट्या चर्चा मी वाचल्या. म्हणजे ह्या मोहिमेतून काय साधल्या गेले. वैगैरे .... माझ्या मते  

माझ्या मते निसर्गाची रम्य व रौद्र रूपे मानवाला नेहमीच भुलवत राहिली आहेत. कारण मानव ह्या निसर्गाचा घटक आहे. मात्र मेंदू विकसित झाल्यावर मानवाने निसर्गावर मत करण्याचा नेहमीच प्रत्यत्न केला आहे. ह्यात कधी तो विजयी तर कधी निसर्गाकडून परास्त झाला आहे.

बुधवार, ६ जून, २०१२

आयटी युगातील मराठी संस्थळ आणि मराठी माणूस

इंटर नेट (  आंतरजालिय महाजाळ) म्हणजेच आंजा   जसे जसे जगभरात लोकप्रिय होऊ लागले. तसे जग एकाच व्यासपीठावर येऊ घातले गेले. वसुधैव कुटुंबं किंवा ग्लोबल सिटीझन ही संकल्पना मूळ धरू लागली. जगाच्या कानाकोपर्यातून समविचारी माणसाचे कंपू मग इंटर नेट च्या आभासी जगतात भेटू लागले. कधी चेट रूम कधी फोरम तर कधी थ्रेड्स तर कधी कम्युनिटी
ह्यांना जोडणारे महत्वाचे कारण म्हणजे धर्म ,भाषा , राष्ट्रं किंवा एखदी मानसिकता
किंवा एखादा विचार. वपुर्झा मध्ये वपू म्हणतात त्या प्रमाणे आपण का लिहितो? ह्याचे एकमेव कारण मला जग किंवा एखादा विषय समाजाला उमजला आहे हे सार्यांना कळावे म्हणून.

भारतात विचारवंत व बुद्धीजीवी व वादविवाद प्रवीण समूह प्रामुख्याने दोन
बंगाली ,मराठी 

रविवार, ३ जून, २०१२

दारू एक व्यसन आणि मराठी संस्थळ


दारू पिणे ही आवड तर पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचा भाग होता.

म्हणून ह्याविषयावर हक्काने थोडेसे खरडतो.( एरवी सुद्धा खरडतो ......)

एखादा माणूस दारू चे आचमन करत असेल तर अनुभवाने आम्ही (पाजणारे ) हा दारू पितोय का दारू ह्याला पीत आहे हे सांगू शकतो.

येथे दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे.


शनिवार, २ जून, २०१२

अणुऊर्जेला जर्मनीत विरोध

सदर लेख २०११ मध्ये सकाळ मधील पैलतीर ह्या अनिवासी भारतीयांच्या हक्कांच्या व्यासपीठावर प्रकशित झाला होता. तेव्हा भारतात आय एम अण्णा
ह्या आंद्लोनाचे पडघम सुद्धा वाजले नव्हते.
प्रगत देशात अणु उर्जेला समर्थ पर्याय म्हणून अपारंपरिक उर्जास्त्रोताचा विकास करावा ह्या मागणीसाठी सोशल नेटवर्किंग द्वारा संपूर्ण जर्मनीत लोक रस्त्यावर उतरली. म्युनिक मध्ये अश्याच एका आंदोलनात माझी जर्मन पत्नी तिची बहिण व मी सहभागी झालो. होतो. त्याबद्दल हा संशिप्त वृत्तांत
तळटीप
आम्ही एवरी कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक अथवा विरोधक नसून
जर आपल्यापुढे पर्याय असेल तर अपारंपरिक उर्जास्त्रोत भविष्यात विकसित केला जावा ह्या उद्देशापोटी आम्ही ह्या आंदोलनात सहभाग घेतला होता. पुढे सरकारने जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या. व त्यावेळी अहिसंक पद्धतीने सुद्धा सामान्य जनता न्याय जर जर्मनीत मिळवू शकते तर आपल्या भारतात का बरे अशी चळवळ होत नाही असा प्रश्न किंबहुना वणवा पेट घेत आहे अशी मी त्यावेळी माझ्या लेखाचा शेवट केला होता.


शनिवार, २६ मे, २०१२

नको तो पावसाळा नको तो गारवा


आमच्याकडे जर्मनीत  उन्हाळा सुरु झाला आहे.आठवड्याचे ५ दिवस लख्ख सूर्य प्रकाश असतो.  मात्र शनिवार ,रविवार नित्यनेमाने आभाळ दाटून येते. आणि गारवा दाटून येतो आणि कुंद वातावरण आणि दिवस भर पावसाची रिपरिप पण हे वातावरण त्यातील गारवा मला अजिबात आवडत नाही.

८ महिने थंडीत येथे थंडीत  गारठल्यावर सूर्याची दाहकता  आणी अंगाची लाही लाही करणारा  उन्हाळा ह्यासाठी मी अगदी आसुसलेला आहे.

हे जरा विचित्र वाटेल पण जागतीकरणामुळे आम्ही युरोपात येऊन स्थिरावलो आणि जगण्याचे सामाजिक ,सांस्कृतिक नाही तर भौगोलिक संधर्भ सुद्धा बदलले.

मंगळवार, २२ मे, २०१२

राजीव इंदिरायुगीन भारतवर्ष

राजीव इंदिरायुगीन भारतवर्ष
राजीव गांधी ह्यांना सध्या भावपूर्वक श्रद्धांजली सध्या सर्वत्र वाहिली जात आहे.
कदाचित भविष्यात राजधानी राजीव गांधी टर्मिनल मधून दिल्लीकडे कूच करेल.
तेव्हा राजीव ह्यांच्या काळात भारतात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणे मला गरजेचे वाटले.
राजीव गांधी ह्यांचे थोडक्यात वर्णन माझ्या लेखी
लोकशाहीच्या नावाखाली एकाधिकारशाही राबविण्यात व सर्व सूत्र स्वतः कडे ठेवण्याचा अट्टाहास करणाऱ्या आईचा मुलगा शेवटी जे पेराल तेच उगवेल ह्या न्यायाने काळाच्या पडद्याआड गेला.
दिल्लीतून गल्लीची सर्व सूत्रे स्वतः चालविण्याचा अट्टाहास व स्वतःभोवती खुशमस्करे व जोडे उचलानार्यांची भाऊ गर्दी ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खास वैशिष्ट्ये

सोमवार, १४ मे, २०१२

फेसाळणाऱ्या बिअरसाठी उसळणारा जनसागर (भाग २)

८) वाईन झेल्ट - या एकमेव तंबूत विविध प्रकारच्या वाईन आणि शँपेन मिळतात. सागरी, थाय खाद्यपदार्थ हे येथील प्रमुख आकर्षण. हा जागतिकीकरणाचा परिणाम, असा या तंबूसंदर्भात बायरिश लोक शेलका शेरा मारतात).

९) लोवेनब्राउ - तंबूच्या प्रवेशद्वाराजवळील १५ फूट उंचीची सिंहमूर्ती हे या तंबूचे आकर्षण. फुटबॉलपटूंचा हा आवडता तंबू).

१०) फिशर व्रोनी - नावातच सार्थकता असलेला मत्स्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरविणारा हा तंबू. माझा स्वतःच्या आवडीचा आहे. येथे आगुस्टेना बिअर मिळते).

फेसाळणाऱ्या बिअरसाठी उसळणारा जनसागर ( भाग १)ऑक्टोबर फेस्ट


म्युनिकमध्ये येऊन मला एक वर्ष झाले. आल्यापासून उत्कंठेने वाट पाहात होतो ऑक्टोबर महिन्याची. कारण याच महिन्यात आयोजित करण्यात येतो जगविख्यात 'ऑक्टोबर फेस्ट' अर्थात बिअर फेस्टिव्हल. केवळ जर्मनीतूनच नाही, तर जगातून बिअर चाहत्यांची म्युनिकच्या दिशेने वाटचाल चालू असते.

जगातील हा सर्वात मोठा सोहळा समजला जातो. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटचा व ऑक्टोबरचा पहिला, असे दोन आठवडे चालणाऱ्या या सोहळ्यात जगभरातून ६५ लाख लोक आवर्जून हजेरी लावतात.

दिवसाला किमान ५ लाख माणसे येथे हजेरी लावतात. आम्ही गेलो तेव्हा सुद्धा तोबा गर्दी होती.

गुरुवार, १० मे, २०१२

सुपर जंबो ए ३८० , जणू इंद्राचा ऐरावत.,

अमेरिकन बोईंग च्या  जगभरातील एकतर्फी साम्राज्याला शह द्यायला युरोपातील प्रमुख राष्ट्रांनी   आर्थिक भागीदारी करत  एअरबस ह्या विमान कंपनीची स्थापना केली.  केली. ह्याचा एक भाग म्हणून बोईंग च्या ७४७ ह्या जंबो विमानाला टक्कर देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या विमान निर्मितीची योजना केली.पण नकटी च्या लग्नाला विघ्ने का काय म्हणतात तसे ह्यांचा उड्डाणाला विलंब झाला.( काही प्रसारमाध्यमांनी हा पांढरा हत्ती उडणार कधी अशी त्याची कुचेष्टा सुरु केली.)
 पण ह्या ऐरावताचे पहिले उड्डाण पेरीस वरून लंडन च्या हिथ्रो वर आगमनाची तारीख पक्की ठरली.


ते वर्ष २००६ चे होते.. हित्रो लगत मोठ्या इमारती नसल्याने   फक्त चार आणी पंचतारांकीत हॉटेलातील उंच इमारतीमधून हा लेंडिंग सोहळा दिसणे शक्य होते. मी व  माझी  माजी प्रेयसी व आत्ताची  पत्नी  हिल्टन हिथ्रो मध्ये कार्यरत असल्यामुळे ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले  . (पत्नी हि क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते ह्या मतावर मी ठाम आहे.)

शुक्रवार, ४ मे, २०१२

माझी शाळा आणि एक मुक्त प्रकटन .

आज चेपू वर म्हणजे चेहरा पुस्तक वर आमची वर्गातील मैत्रीण दीपाली सिरपोतदार,जठार शाळेच्या बिल्ल्याचा फोटो टाकला 
 ( हिच्या आडनावाचा वर्गातील काहीजण सरपोतदार असा उच्चारीत.  ह्यावर तिचा
नेहमीच आक्षेप असायचा )   

रविवार, २९ एप्रिल, २०१२

देव झाला दानव


सचिन ला देव मानणारे अचानक त्याने खासदारकी स्वीकारली म्हणून दानव समजू लागले आहेत, इंटर नेट वर त्याला शिव्याची लाखोली वाहिली जात आहे.
जणू काही त्याने निशाने पाकिस्तान स्वीकारले आहे असा गजहब करण्यात येत आहे. पूर्वी हा देव मातोश्री वर दर्शन द्यायचा आता कृष्ण कुंज मध्ये त्यांचे बस्तान हलल्यामुळे अपेक्षित त्या प्रतिक्रिया राजकारणी मंडळींकडून आल्या. म्हणजे विरोध आणि समर्थन.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

हिटलर आणि जर्मनी ( मनमोकळे विचार

  सदर लेख हा अमुक एका विषयाला वाहिला नसून मनात उसळणाऱ्या विचारांना शब्दात उतरवण्याचा एक शीण प्रयत्न आहे.?

माझी पत्नी कथारीना जर्मन असून आम्ही जर्मनीत स्थयिक आहोत.
आज फेसबुक वर माझ्या  पत्नीच्या एका नेपाळी मित्राने ( जो अबुधाबी मध्ये तिच्या सोबत काम करता होता ) त्याने नाझी पक्षाचे चिन्ह स्वस्तिक टाकले. माझ्या पत्नीच्या मित्रांच्या यादीत तिचे वडील पण आहेत. त्यामुळे त्यांना हे कळताच त्यांनी तिला फोन करून त्या मित्राला तिच्या यादीतून काढण्याचे फर्मान काढले. म्हटलं तर फतवा काढला. माझ्या बायकोने तिच्या आईवडिलांना समजून सांगितले की ""तो मुलगा समंजस आहे. आणी दर आठवड्याला तो आपल्या प्रोफाईल वरील चित्र बदलतो". त्याच्या अल्बम मध्ये झोंबी चे चित्र आहे. ह्याच्या अर्थ तो काही नर भक्षी नाही. पण  .ह्याचा काहीही उपयोग झाला नाही.  दुसर्या महायुद्ध च्या नंतर दोस्त राष्ट्रांनी ह्यांच्या शिक्षण व्यवस्थेत मेकेलो च्या धर्तीवर अशी तजवीज केली की हिटलर ह्या नावाने जुन्या जर्मन खोडांना कापरे भरते.

रविवार, २२ एप्रिल, २०१२

महाभारत व आपण आणि तात्विक वाद

हिंदू समाजात रामायण आणी महाभारत ह्या दोन गाथा हजारो वर्ष जनमाणसात रूढ आहेत.  ह्यातही सलीम खान म्हणतात त्याप्रमाणे "महाभारतासारखे दुसरे कथानक आणी स्क्रीन प्ले जगात कुठेही आढळणार नाही". ह्यातील प्रत्येक प्रसंग व घटना हि पुढे घडणारया घटनेची नांदी आहे. एखादे पुस्तक हातात घेतल्यावर ते संपल्याशिवाय हातावेगळे करता येत नाही ,तसीच अवस्था महाभारत वाचताना किंवा आपली टीवी वर पाहतांना होते. 
म्हणुनच मला असे वाटते की रामायणा पेक्षा महाभारताचा  आपल्या समाजावर जास्त पगडा आहे. पण आपल्या वास्तविक जीवनात किंवा आभसी जगतात मुशाफिरगीरी करतांना मी अनेकदा कर्ण श्रेष्ठ कि अर्जुन हा पुणे की मुंबई ह्या धर्तीवर रंगणारा वाद पहातो.
 "कर्णाला ह्या शतकात मृत्युंजय ह्या कादंबरीने मोठा केला" अशी वक्तव्ये जर कुणी केली की
एखादा कर्णप्रेमी ( बहुदा अश्या व्यक्ती ज्यांना  आयुष्यात कोणत्या तरी बाबतीत आपली सतत उपेक्षा झाल्याचा सल उरी असतो अश्या व्यक्ती ) चवताळून उठतात. मग कोणत्याही बंगाली आणि महाराष्ट्रीय माणसाला तात्विक वाद किंवा वैचारिक मंथन करणे आवडते ह्या उक्तीला अनसरून मग शाब्दिक चकमकी लढतात. जीव्हेचे वार होतात. आणी महाभारताचे अनेक दाखले व प्रसंग दिले जातात. प्रत्येक पक्ष आपली बाजू हिराहीरीने मांडतो. 

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

प्रजासत्ताक दिन माझे मनोगत (माझ्या बालपणीचा भारताचा ते इंडियाचा प्रवास ))

इंग्रजांच्या काळात सर्वाना शिक्षणाची समान संधी व अश्या अनेक गोष्टी भारतीय समाजात नव्या होत्या (ह्या त्यांनी अर्थातच स्वताचा राज्यकारभार सोयीने व्हावा म्हणून केल्या )पण .भारता स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी भारतीय जनतेपैकी किती लोक साक्षर होती ?
साक्षर लोकांमधील किती लोक प्रगल्भ होती? .म्हणजे स्त्री पुरुष समानता .आदि मुद्यात .
देश स्वतंत्र झाला तेव्हा सत्ताधारी पक्षाला प्रबळ विरोधक नव्हते .हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नव्हते .युके मध्ये हुजूर मजूर तर अमेरिकेत रिपब्लिक व डेमोक्रेटिक असा प्रकार भारतात अनेक दशके नव्हता
.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या डोक्यात सत्तेचा कैफ गेला .शीण विरोधी पक्ष लोकांमध्ये लोकप्रिय न होता विविध लेबेले सत्ताधारी पक्षाकडून स्वीकारून जनतेपासून नि सत्तेपासून लांब असायचा
दूरदर्शन चे एककलमी कार्यक्रम (कोणी मेले कि ७ दिवस सुतकी चेहेर्याचे सतारवादन ) हे त्यांच्या निरस नि निसत्वतेचे मासलेवाईक उदाहरण .

रेल्वे कोर्ट, एक अनुभव

ते कॉलेज चे मयूर पंखी दिवस होते. हॉटेल व्यवस्थापन शिकत असतांना संध्याकाळी आम्हाला मुबई मधील अनेक पंचतारांकित हॉटेलात वेटिंग साठी जावे लागायचे. म्हणजे काय तर स्वतःचा पोकेट मनी सुटावा व आपण जे पुस्तकी शिक्षण घेत आहोत त्याची तोंड ओळख व्हावी म्हणून ह्या हॉटेलात आम्हाला काम करायला जावे लागायचे. १९९९ साली १५० रुपये दिवसाचे वर पंचातारीकीत भोजन ( प्रती थाळी ८०० ते ....) वर उंची विदेशी मद्ये अर्थात पैसा सोडल्यास ही खानपान सेवा रात्री बारा नंतर तळे राखी तो पाणी चाखी किंवा हाजीर तो वजीर ह्या न्यायाने आम्हास उपभोगास मिळायची.

असेच एकदा एका मोठ्या सिनेतारीकेचा वाढदिवस सकाळी ४ पर्यत साजरा केल्यावर मी फोर्टातून तडक सी एस टी स्टेशन गाठले. घरी कधी एकदा अंथरुणाला पाठ टेकतो असे झाले होते. माझे मित्र मात्र हॉटेलात स्टाफ रूम मध्ये थांबून पेंगत होते. काहींनी हॉटेल च्या कर्मचाऱ्यां सोबत पत्यांचे डाव टाकले होते. मी मात्र आज तडक घर गाठायच्या बेतात होतो. स्टेशन वरून एक नुकतीच सुटलेली गाडी धावत जाऊन पकडली

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

असामी असा ही मी

नमस्कार
माझे नाव निनाद सुहास कुलकर्णी.
 स्वताबद्दल माहिती द्यावी तीही पंचतारांकित शीर्षकाखाली एवढी माझी योग्यता नाही. मात्र पंचतारांकित दुनियेत मी माझा वावर असल्याने म्हणजे हॉटेलात काम करीत असल्याने गुण नाही पण वाण लागला ह्या म्हणी नुसार ह्या ब्लॉग वर पंचतारांकित दर्जाचे लेखन करण्याची ( म्हणजे अभिव्यक्त होण्याची माझी मनीषा आहे ) ह्या आधी सकाळची कम्युनिटी मुक्तपीठ व मिसळपाव ह्या अमराठी संस्थळावर मी माझे लेखन केले आहे.(आपण जे खरडतो त्याला वाचकांनी प्रतिसादाची मोहर उमटवली कि ते लेखन होते ) आता ह्या ब्लॉग द्वारे प्रवास वर्णन ,आंतराष्ट्रीय राजकारण ( ह्या लोकांच्या सहवास नोकरीनिमित्त नेहमी राहावे लागते ) आणि जगात घडलेल्या एखाद्या तत्कालीन घटनेवर माझी मताची पिंक टाकणे  माझ्या कामानिमित्त सिनेतारका व सिनेअभिनेते व ह्या शेत्रातील दिग्गज मंडळीची सरबराई करतांना ह्या शेत्राविषयी अनेक गोसीप कानावर पडत. ह्यामुळे मुळातच सिनेमाची आवड असल्यामुळे त्यावर परीक्षण म्हणण्यापेक्षा भाष्य करणे  .   हेच ह्या घडीला ह्या ब्लॉग चे उदिष्ट आहे.
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips