हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, २९ एप्रिल, २०१२

देव झाला दानव


सचिन ला देव मानणारे अचानक त्याने खासदारकी स्वीकारली म्हणून दानव समजू लागले आहेत, इंटर नेट वर त्याला शिव्याची लाखोली वाहिली जात आहे.
जणू काही त्याने निशाने पाकिस्तान स्वीकारले आहे असा गजहब करण्यात येत आहे. पूर्वी हा देव मातोश्री वर दर्शन द्यायचा आता कृष्ण कुंज मध्ये त्यांचे बस्तान हलल्यामुळे अपेक्षित त्या प्रतिक्रिया राजकारणी मंडळींकडून आल्या. म्हणजे विरोध आणि समर्थन.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

हिटलर आणि जर्मनी ( मनमोकळे विचार

  सदर लेख हा अमुक एका विषयाला वाहिला नसून मनात उसळणाऱ्या विचारांना शब्दात उतरवण्याचा एक शीण प्रयत्न आहे.?

माझी पत्नी कथारीना जर्मन असून आम्ही जर्मनीत स्थयिक आहोत.
आज फेसबुक वर माझ्या  पत्नीच्या एका नेपाळी मित्राने ( जो अबुधाबी मध्ये तिच्या सोबत काम करता होता ) त्याने नाझी पक्षाचे चिन्ह स्वस्तिक टाकले. माझ्या पत्नीच्या मित्रांच्या यादीत तिचे वडील पण आहेत. त्यामुळे त्यांना हे कळताच त्यांनी तिला फोन करून त्या मित्राला तिच्या यादीतून काढण्याचे फर्मान काढले. म्हटलं तर फतवा काढला. माझ्या बायकोने तिच्या आईवडिलांना समजून सांगितले की ""तो मुलगा समंजस आहे. आणी दर आठवड्याला तो आपल्या प्रोफाईल वरील चित्र बदलतो". त्याच्या अल्बम मध्ये झोंबी चे चित्र आहे. ह्याच्या अर्थ तो काही नर भक्षी नाही. पण  .ह्याचा काहीही उपयोग झाला नाही.  दुसर्या महायुद्ध च्या नंतर दोस्त राष्ट्रांनी ह्यांच्या शिक्षण व्यवस्थेत मेकेलो च्या धर्तीवर अशी तजवीज केली की हिटलर ह्या नावाने जुन्या जर्मन खोडांना कापरे भरते.

रविवार, २२ एप्रिल, २०१२

महाभारत व आपण आणि तात्विक वाद

हिंदू समाजात रामायण आणी महाभारत ह्या दोन गाथा हजारो वर्ष जनमाणसात रूढ आहेत.  ह्यातही सलीम खान म्हणतात त्याप्रमाणे "महाभारतासारखे दुसरे कथानक आणी स्क्रीन प्ले जगात कुठेही आढळणार नाही". ह्यातील प्रत्येक प्रसंग व घटना हि पुढे घडणारया घटनेची नांदी आहे. एखादे पुस्तक हातात घेतल्यावर ते संपल्याशिवाय हातावेगळे करता येत नाही ,तसीच अवस्था महाभारत वाचताना किंवा आपली टीवी वर पाहतांना होते. 
म्हणुनच मला असे वाटते की रामायणा पेक्षा महाभारताचा  आपल्या समाजावर जास्त पगडा आहे. पण आपल्या वास्तविक जीवनात किंवा आभसी जगतात मुशाफिरगीरी करतांना मी अनेकदा कर्ण श्रेष्ठ कि अर्जुन हा पुणे की मुंबई ह्या धर्तीवर रंगणारा वाद पहातो.
 "कर्णाला ह्या शतकात मृत्युंजय ह्या कादंबरीने मोठा केला" अशी वक्तव्ये जर कुणी केली की
एखादा कर्णप्रेमी ( बहुदा अश्या व्यक्ती ज्यांना  आयुष्यात कोणत्या तरी बाबतीत आपली सतत उपेक्षा झाल्याचा सल उरी असतो अश्या व्यक्ती ) चवताळून उठतात. मग कोणत्याही बंगाली आणि महाराष्ट्रीय माणसाला तात्विक वाद किंवा वैचारिक मंथन करणे आवडते ह्या उक्तीला अनसरून मग शाब्दिक चकमकी लढतात. जीव्हेचे वार होतात. आणी महाभारताचे अनेक दाखले व प्रसंग दिले जातात. प्रत्येक पक्ष आपली बाजू हिराहीरीने मांडतो. 

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

प्रजासत्ताक दिन माझे मनोगत (माझ्या बालपणीचा भारताचा ते इंडियाचा प्रवास ))

इंग्रजांच्या काळात सर्वाना शिक्षणाची समान संधी व अश्या अनेक गोष्टी भारतीय समाजात नव्या होत्या (ह्या त्यांनी अर्थातच स्वताचा राज्यकारभार सोयीने व्हावा म्हणून केल्या )पण .भारता स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी भारतीय जनतेपैकी किती लोक साक्षर होती ?
साक्षर लोकांमधील किती लोक प्रगल्भ होती? .म्हणजे स्त्री पुरुष समानता .आदि मुद्यात .
देश स्वतंत्र झाला तेव्हा सत्ताधारी पक्षाला प्रबळ विरोधक नव्हते .हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नव्हते .युके मध्ये हुजूर मजूर तर अमेरिकेत रिपब्लिक व डेमोक्रेटिक असा प्रकार भारतात अनेक दशके नव्हता
.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या डोक्यात सत्तेचा कैफ गेला .शीण विरोधी पक्ष लोकांमध्ये लोकप्रिय न होता विविध लेबेले सत्ताधारी पक्षाकडून स्वीकारून जनतेपासून नि सत्तेपासून लांब असायचा
दूरदर्शन चे एककलमी कार्यक्रम (कोणी मेले कि ७ दिवस सुतकी चेहेर्याचे सतारवादन ) हे त्यांच्या निरस नि निसत्वतेचे मासलेवाईक उदाहरण .

रेल्वे कोर्ट, एक अनुभव

ते कॉलेज चे मयूर पंखी दिवस होते. हॉटेल व्यवस्थापन शिकत असतांना संध्याकाळी आम्हाला मुबई मधील अनेक पंचतारांकित हॉटेलात वेटिंग साठी जावे लागायचे. म्हणजे काय तर स्वतःचा पोकेट मनी सुटावा व आपण जे पुस्तकी शिक्षण घेत आहोत त्याची तोंड ओळख व्हावी म्हणून ह्या हॉटेलात आम्हाला काम करायला जावे लागायचे. १९९९ साली १५० रुपये दिवसाचे वर पंचातारीकीत भोजन ( प्रती थाळी ८०० ते ....) वर उंची विदेशी मद्ये अर्थात पैसा सोडल्यास ही खानपान सेवा रात्री बारा नंतर तळे राखी तो पाणी चाखी किंवा हाजीर तो वजीर ह्या न्यायाने आम्हास उपभोगास मिळायची.

असेच एकदा एका मोठ्या सिनेतारीकेचा वाढदिवस सकाळी ४ पर्यत साजरा केल्यावर मी फोर्टातून तडक सी एस टी स्टेशन गाठले. घरी कधी एकदा अंथरुणाला पाठ टेकतो असे झाले होते. माझे मित्र मात्र हॉटेलात स्टाफ रूम मध्ये थांबून पेंगत होते. काहींनी हॉटेल च्या कर्मचाऱ्यां सोबत पत्यांचे डाव टाकले होते. मी मात्र आज तडक घर गाठायच्या बेतात होतो. स्टेशन वरून एक नुकतीच सुटलेली गाडी धावत जाऊन पकडली

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

असामी असा ही मी

नमस्कार
माझे नाव निनाद सुहास कुलकर्णी.
 स्वताबद्दल माहिती द्यावी तीही पंचतारांकित शीर्षकाखाली एवढी माझी योग्यता नाही. मात्र पंचतारांकित दुनियेत मी माझा वावर असल्याने म्हणजे हॉटेलात काम करीत असल्याने गुण नाही पण वाण लागला ह्या म्हणी नुसार ह्या ब्लॉग वर पंचतारांकित दर्जाचे लेखन करण्याची ( म्हणजे अभिव्यक्त होण्याची माझी मनीषा आहे ) ह्या आधी सकाळची कम्युनिटी मुक्तपीठ व मिसळपाव ह्या अमराठी संस्थळावर मी माझे लेखन केले आहे.(आपण जे खरडतो त्याला वाचकांनी प्रतिसादाची मोहर उमटवली कि ते लेखन होते ) आता ह्या ब्लॉग द्वारे प्रवास वर्णन ,आंतराष्ट्रीय राजकारण ( ह्या लोकांच्या सहवास नोकरीनिमित्त नेहमी राहावे लागते ) आणि जगात घडलेल्या एखाद्या तत्कालीन घटनेवर माझी मताची पिंक टाकणे  माझ्या कामानिमित्त सिनेतारका व सिनेअभिनेते व ह्या शेत्रातील दिग्गज मंडळीची सरबराई करतांना ह्या शेत्राविषयी अनेक गोसीप कानावर पडत. ह्यामुळे मुळातच सिनेमाची आवड असल्यामुळे त्यावर परीक्षण म्हणण्यापेक्षा भाष्य करणे  .   हेच ह्या घडीला ह्या ब्लॉग चे उदिष्ट आहे.
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips