सध्या पाकिस्तानी कलाकार व भारतीय कार्यक्रमात
सहभाग ह्या विषयांवर बरेच काही लिहून येत आहे. त्या विषयी माझे मुक्त
प्रकटन ह्यात मी अबुधाबी , युके
, आणि जर्मनी मध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांना भेटलो व त्यांच्याशी संवाद
साधला चर्चा ,वादविवाद खूप घातले. त्यांचा कडून भारताविषयी मत जहाल ,मवाळ
मते कानावर पडली म्हणूनच ह्या विषयावर वेगळ्या दृष्टी कोनातून विचार मांडत
आहे.
भारतातील सुजाण व सुसंस्कृत नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तान मधील सामाजिक व राजकीय स्तर हा आपल्या सारखा बहु त्रिस्तरीय आहे. तेथे सुद्धा प्रांतिक अस्मिता , शिया ,सुन्नी राजकारण व जहाल व मवाळ विचारधारा आहेत. तेथे चार प्रमुख वर्ग आहेत. एक सत्ताधारी ( जे अमेरिकेच्या पाठिंब्यावर टिकून आहेत ) दुसरा म्हणजे सर्वात प्रबळ तेथील आर्मी तिसरा म्हणजे आय एस आय हि गुप्तचर संघटना व चौथा म्हणजे मुल्ला आणि कट्टरपंथी ह्या चारही वर्गाचा एकमेकावर नियंत्रण व ताळमेळ नाही आहे. मुंबई हल्ला झाला तो ह्याच सर्व वर्गातील काही लोकांमुळे
. पण सर्व सामान्य पाकिस्तानी ( मी जे परदेशात वेगवेगळ्या देशात पहिले ते आपल्या देशातील ह्या चारही वर्गापासून प्रचंड नाराज आहेत.) आपला देश रसातळाला जात आहे हे त्यांना दिसत आहे. व भारताची प्रगती सुद्धा ( त्यांच्या मानाने दिसत आहे.)
मी तू नळीवर अनेक क्लिप मध्ये पाकिस्तानमधील बॉलिवूड चे पाकिस्तानात मधील अस्तित्व कमी करावे कारण ते भारतीय हिंदू संस्कृती त्यांच्या मुलांवर लादत आहेत असे अनेक उदाहरण देऊन स्पष्ट करत आहेत. आपल्या टिव्ही मालिका व हिंदू सण ह्यांचे त्यांच्या समाजात कसा प्रभाव पडत आहे हे त्यांनी अनेक घरात मुलाखती घेऊन स्पष्ट केले आहे. व काही पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी देऊन त्या बदल्यात पाकिस्तानी बाजारपेठ काबिज केल्याचा आरोप केला जातो. आज घरी गणपती ठेवणारा सलमान पाकिस्तानात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
(आज हॉलिवूड सुद्धा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया मधून काही कलाकारांना आपल्या देशात संधी ह्या साठी देतात. म्हणूनच आज युके मध्ये बॉण्ड सिनेमे सोडल्यास स्वतःचे सिनेमे चालत नाहीत सर्वत्र हॉलिवूड ची सत्ता आहे- आज पाकिस्तानातील श्रीमंत , मूठभर शहरी मध्यमवर्गीय व गावातील व शहरातील कनिष्ट मध्यम वर्ग ह्यांच्याकडे टिव्ही आहे .त्यांना मनोरंजनाचे एकमेव साधन भारतीय सिनेमे व टेलिव्हीजन आहे. तेथे कट्टर धर्मपंथीय विचारधारा वाढत आहेत. व पाकिस्तान चे तालिबान पंथीय राष्ट्र होण्यापेक्षा भारतीय संस्कृती चा प्रभाव असलेले राष्ट्र बनणे केव्हाही चांगले असा विचार करून तेथील सत्ताधारी वर्ग भारतीय वाहिन्यांना पाकिस्तानात खुलेआम परवानगी देत आहे. भले भारतात पाकिस्तानी वाहिन्या अधिकृतरीत्या दाखविण्यात सरकार तर्फे बंदी आहे.
त्यांच्या पाकिस्तानी संसद बुशा रेहेमान ह्यांनी पाकिस्तानात भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. कारण भारतीय सांस्कृतिक प्रदुषण त्यांची संस्कृती उद्ध्वस्त करीत आहे. जसा अमेरिका मोठी सुपर पॉवर आहे अशी प्रतिमा जगभर जनमानसात त्यांच्या हॉलिवूड सिनेमांनी पसरवली आहे. उदा जगावर एलियन चा हमला व जगाचे रक्षण फक्त अमेरिकन करणार हा मक्ता त्यांच्याकडे आहे असे सतत दाखवले जाते.
म्हणूनच की काय अमेरिकेलाच जगातील कोणत्याही समस्येत नाक खुपसण्याचे नैतिक अधिकार आहे असा गोड गैरसमज अमेरिकन जनतेमध्ये आहे.
. प्रसार माध्यमे एखाद्या देशाची सांस्कृतिक बाजू जगापुढे मांडतात. भारतीय वाहिन्या पाकिस्तानात दाखवल्या जायला लागल्या व तेथील मुल्ला लोकांच्या खोट्या प्रचार जसे सर्व भारतीय मुस्लिमांचा खूप द्वेष करतात वगैरे हे पितळ उघडे पडले. आज मला भेटलेले अनेक पाकिस्तानी हे चकीतच होऊन भारतीय काय क्रम त्यातील सास ,बहु और साजीश अश्या अनेक गोष्टी पाकिस्तानात चवीने पहिल्या जातात असे आवर्जून सांगतात. आज भारताची पाकिस्तानात मध्ये नंबर एक चा शत्रू ही प्रतिमा कमी करून त्यांची जागा आज तालिबान व त्यांच्या अंतर्गत दहशतवादाने घेतली आहे. ह्यांचे श्रेय आपल्या थोड्याफार फरकाने आपल्या प्रसारमाध्यमांना जाते.
. हज्ब ए हाल हा पाकिस्तानातील लोकप्रिय टोक शो वर भारतीय सांस्कृतिक आक्रमणाच्या विरुद्ध कशी गरळ ओकली जात आहे ते पहा. माझ्या मते त्यांच्या मूठभर लोकांना आपल्या कडे संधी देऊन आवळा देऊन कोवळा काढून घ्यावा. त्यांची तरुण व शिशू पिढी आता मोठी होणार तेच मुळी भारतीय संस्कृती सण ह्यांचे माहात्म्य मनात रूजवत
. मागे पाकिस्तानी व भारतीय लहान मुलांचा छोटे उस्ताद ह्या कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्यात पाकिस्तानी स्पर्धकांकडून भारतीय देवतांची गाणी गाऊन घेण्यात आली. किंवा ज्या सिंधी लोकांना पाकिस्तानातून बाहेर हाकलले त्यांचे गाणे गाऊन घेतले. भारतीय हिंदू संस्कृतींचे पाकिस्तानात वाढणारे प्राबल्य हा तेथे टोक शो चा आवडता विषय आहे. तरी आपल्या वाहिन्या व सिनेमे तेथे लोकप्रिय आहेत.
. पाकिस्तानात भारत ४थ जनरेशन वॉरफेअर अंमलात आणत आहे. असा पाकिस्तानी बुद्धिवाद्यांचे आक्षेप आहे. आज जर पाकिस्तान भारतात प्रोक्सी वॉर गेम खेळत असेल तर त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. आज जेव्हा पाकिस्तानातील आय एस आय च्या वरिष्ठ अधिकारी हे आत्मघाती हल्ल्यात बळी पडतात. तेव्हा तेथील तेहेरीके तालिबान हि संघटना भारतीय रॉ कडून प्रशिक्षण घेऊन हे हल्ले घडवून आणत आहे. असे आरोप त्यांच्या टीव्हीवर केले गेले. हे सर्व खरे असेल किंवा नसेल पण हा विचार मनाला गुदगुल्या करणारा होता. तेव्हा आपल्या सरकारी संस्था त्यांच्या पातळीवर दिवस रात्र युद्ध करत असतात. आपण उगाच भारत पाकिस्तान अशी सामान्य नागरिकांमध्ये तेढ माजवली तर त्याचा फायदा तेथील कट्टरपंथी व चीन घेऊ शकतो.

चांगलेच अवलोकन केलेले आहे. खूपच अभ्यासपूर्ण, आणि संतुलित मांडणी. मला आवडला.
उत्तर द्याहटवाधन्यवाद पराग
उत्तर द्याहटवाशत्रूवर खर्या अर्थाने विजय मिळवायचा असेल तर त्यांच्या मनावर म्हणजेच त्यांच्या मानसिकतेवर विजय मिळवायला हवा.
मानसिक पगुत्व घेऊन त्यांची नवीन पिढी भारता विरुध्ध जिहाद करू शकत नाही.
निनाद, धाग्याचे शीर्षक व मजकूर याचा फारसा संबंध वाटला नाही. फक्त सिनेमा व टीव्हीवरून भारताच्या संस्कृतीचे एका अर्थाने पॅसिव्ह,आक्रमण पाकिस्तांन्यासहन होत नाही. कारण पाकिस्तानात आपल्या सीरियल्स पाहिल्या जातात म्हणून हिंदू सणांचे उदोउदो करावेत असा डाव सर्वच सीरिलवाले करतात वा करत असावेत हे म्हणणे अवास्तव वाटते. समस्येचा तो फक्त एक छोटा भाग आहे.
उत्तर द्याहटवा"मानसिक पगुत्व घेऊन त्यांची नवीन पिढी भारता विरुध्ध जिहाद करू शकत नाही."
असे तू छातीठोकपणे कसे म्हणतोस. जे जिहादी भारतात येऊन उधम माजवतात ते काही स्वातंत्र्यपुर्व काळातील बुढ्ढे असतात की काय? सध्याच्या पाकिस्तानातील बालपिढीवर शिक्षणाच्या पुस्तकातून भारताबद्दलचा आकस इतका विषारी आहे. (असे भारतीय म्हणून मी म्हणत नाही, ब्रिटिश संशोधनाकानी केलेल्या सर्वेक्षणावरून मी सागतोय) त्यामुळे अशा भडक व उथळ सिरियल्स कितपत प्रभाव पाडतील शंका आहे. असो.
शशी तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवाधाग्याचे शीर्षक व लेख ह्यातील संबंध इतकाच आहे की पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश बंदची मागणी ह्या निमित्ताने झाली आणि पाकिस्तानात भारतीय मालिकांच्या वर बंदी अशी मागणी करणारे कट्टर धर्मपंथीय ह्यांचे ध्येय एका वेगळ्या प्रकारे सारखे आहे.
भारतीय जाणून बुजून असा डाव करतात असे मी म्हटले नाही. कारण भारतीय मालिकांचं प्रमुख बाजारपेठ ही भारत असल्याने भारतीय मुख्यत्वे हिंदू कनिष्ठ , उच्च व मध्य असा मध्यमवर्ग हा टी आर पी वाढवणारा वर्ग आहे. तेव्हा आपल्या देशात आपले सण व कौटुंबिक मालिका बनविल्या जातात. पाकिस्तानात त्यांना छोटीशी बाजारपेठ आहे.
आपल्याकडे येणारे अतिरेकी हे कट्टर पंथीय विचारधारेची असून त्यांना जिहाद विषयी भडकवले जाते. आपल्याहून जास्त घटक आत्मघाती हल्ले लाहोर आणि कराची मध्ये हीच लोक करून आणतात. अगदी मज्जीद किंवा एखाद्याच्या जनाजा असेल तरी आत्मघाती हल्ले होतात. म्हणूनच पाकिस्तानात तालिबानीकरण होत आहे असा सूचक उल्लेख मी केला आहे, बहुसंख्य मदरसे व गावातील बेरोजगार तरुण अतिरेकी संघटने मध्ये जात आहेत. तर पाकिस्तानातल्या शहरातील श्रीमंत व अल्पसा मध्यमवर्ग
हा तालीबिकारानाच्या विरोधात आहे. व त्यांना जाणीव आहे की आपल्या देशाचे अफगाणिस्थान होण्यात वेळ लागणार नाही.
ह्या लोकांच्या कर दिल्यामुळे पाक अर्थ व्यवस्था चालते व लष्कराला बजेट सुद्धा ह्याच लोकांच्या पैशातून येते.
तेव्हा ह्या लोकांशी माझा अबू धाबी , लंडन ,किंवा जर्मनी मध्ये माझा व्यवसायामुळे जेव्हा भेट होते तेव्हा त्यांचे अनुभव व मत जाणून घेऊन मी हा लेख लिहिला.
मी आधीच लिहिले आहे. की ह्या लोकांचा भारत फारच पुढे गेला आहे हे वास्तव स्वीकारण्याची पूर्ण मानसिकता झाली असून त्याचा त्यांना एक प्रकरचा हेवा वाटतो.
आणि तेथील श्रीमंत आणी मध्यमवर्ग अमेरिकेच्या विरोधात गेला असून त्यामुळे भारतीय मनोरंजन क्षेत्राकडे आकृष्ट झाला आहे.
आज पाकिस्तान मध्ये प्रचंड महागाई , व दहशतवादी वातावरण व अमेरिकेचे द्रोण हल्ले व धमक्या व लादेन कारवाई नंतर लष्कराची घसरती प्रतिमा ह्यामुळे तेथील बहुसंख्य जनता ही पोटाला चिमटा काढून काश्मीर साठी निधी देण्यात तयार होत नाही.
म्हणूनच भारताशी व्यापार करावा ह्या हेतूने तेथे प्रयत्न चालू आहेत.
आपल्या मालिका व सिनेमे अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करत आहेत.
मात्र एकेकाळी पाकिस्तान हा सर्वच बाबतीत सरस आहे, अशी समज घेऊन ८० ते ९० च्या दशकात एक पाकिस्तानी पिढी वावरत होती. क्रिकेट च्या शेत्रात इम्रान खान त्यांचे प्रतिनिधित्व करत होता.
मात्र आताची पिढी वास्तव जाणून आहे. म्हणूनच त्यांचे कलाकार , खेळाडू भारतात येण्यासाठी तळमळत असतात. बदल झाला आहे व होत आहे.
द्रारका नाथ संझीगिरी हे पाकिस्तांत अनेकवेळा जाऊन आले त्यांचा अनुभव सामान्य पाकिस्तानी नागरिकांबरोबर चांगला होता. एवढे मात्र खरे की जेवढा भारता विषयी ओढ असणारा वर्ग तेथे निर्माण होत आहे. तेवढाच तेथे भारत द्वेष करणारा कट्टर पंथीय गट
वाढत चालला आहे.