हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

कलोन , जर्मनी चे सांस्कृतिक वैभव भाग २


आम्ही स्टेशन वर आलो .अल्बर्ट येणार होता .आता पित्याला पाहून दाटून कंठ येतो कि काय अशी गमतीदार कल्पना माझ्या डोक्यात आली.  त्याने आल्या आल्या आज त्याचा क्लब जिंकला म्हणून मी खुशीत आहे .असे सांगितले .बाकी ह्या फूटबॉल पटू व गाढवा मध्ये एक साम्य असते म्हणजे दोघेही लाथा मारतात . आपण सर्व भारतीय गाढव असल्याची समजूत नेते आपल्याला आश्वासनाचे गाजर दाखवत असतात .


पहिल्यांदा  बनविल्या गेला. . मस्त मसालेदार असलेला सॉस ज्याला ते करी सॉस म्हणतात. व त्यात सोसेज चे काप व वर मिरपूड शिंपडले व त्या बरोबर क्रिकेट मधील बेल्स च्या आकाराचे पाव ..देतात .सासर्याने  तिखा डालो अशी फर्माइश  केली .आम्ही दोघे अचंबित झालो.  जर्मनीत फार कमी लोक अट्टल तिखट खाणारे आहेत माझा सासरा त्यातला.  जर्मनीत फ्रेंच फ्राय  हे मॅकडोनाल्ड मध्ये मिळतात. पण खरे प्रसिद्ध आहेत ते बटाट्याच्या मोठ्या कापाचे तळलेले तुकडे, त्याला येथे पोमेज म्हणतात.
चीज ,कांदा आणि त्यासोबत केचप किंवा मेयोनेज किंवा करी सॉस  हे गरमागरम
पोमेज च्या कागदी द्रोणात खाणे म्हणजे आनंदाचा परमावधी असतो.


१ युरो मध्ये मिळणारे बेलीना हा गोड पदार्थ  येथील खासियत आहे.


 .मग पावले मद्यालयाकडे च्या दिशेने वळली. भव्य आणि दिव्य अश्या मधुशाला हे त्यांचे सांस्कृतिक वैभव गोथिक पद्धतीच्या जुन्या काळाच्या इमारती आत प्रवेश केल्यावर वातावरण निर्मिती आम्हाला थेट
काही शतके मागे घेऊन गेली   उपाहारगृहात अंधूक मेणबत्तीचे दिवा .काचा तावदाने सर्व काही जुनी, थोडक्यात हॉलीवूड सिनेमातील  सेट  वाटावा  इतकी सुंदर वातावरण निर्मिती .त्यातच सेविका मोठ्या झगा घालून तर सेवक आमच्या दिमतीला तंग विजार व तलम अंगरखा घालून होता. मेज व बहुतेक सर्व गोष्टी लाकडाच्या भिंतीवरील चित्रे  सुद्धा हाय क्लास
येथे बियर चा ग्लास एका परीक्षा नळी असते ना त्यासारखाच, फक्त परीक्षा नळी हून मोठा होता. तो आणण्याची तरा एकदम न्यारी एक लाकडी बास्केट तिला त्या ग्लासच्या आकाराची भोक, अश्या भोकात ग्लास एकदम फिट बसवलेला असे २० ग्लास भरलेली बास्केट घेऊन हे फिरत असतात.  ०.२१ च्या ह्या ग्लास ला स्टेनगेल असे म्हणतात. .येथील बियर थंड व फ्रेश असते. वेटरला येथे स्थानिक भाषेत कोबेस म्हणतात. त्यांची बियर सर्विस ही पारंपारिक असून थोडक्यात अशी करतात.
आपण मेजावर स्थानापन्न झालो की 
की सेविका अथवा कोबेस  आदबीनं येणार व जर तिला काही ऑर्डर केले नाही तर न बोलता ती जितक्या व्यक्ती तेवढे ग्लास ठेवून जाणार. फक्त जाताना कोस्टर ठेवून जाणार ,ह्या कोस्टर वर ती एक फुली करून जाणार .पुढच्या वेळी जर तुमच्या गप्प रंगत आल्या असतील व तुमचा चषक रिता झाला असेल तर ती न सेविका अथवा कोबेस  आदबीनं येणार व जर तिला काही ऑर्डर केले नाही तर न बोलता ती जितक्या व्यक्ती तेवढे ग्लास ठेवून जाणार .फक्त जाताना कोस्टर ठेवून जाणार ह्या कोस्टर वर ती एक फुली करून जाणार .पुढच्या वेळी जर तुमच्या गप्प रंगत आल्या असतील व तुमचा चषक रिता झाला असेल तर ती न सांगता अजून एक चषक ठेवणार व अजून एक फुली जेवढे ग्लास तेवढ्या फुल्या मारणार .अर्थात तुम्ही नको असे सांगू शकतात .

 तुमच्यातील तळीराम शांत झाला  तर रिकाम्या ग्लास वर
कोस्टर ठेवून आपण त्याची वाट पहायची. म्हणजे तो येऊन कोस्टर वरील फुल्या मोजतो. व त्याप्रमाणे बिल आकारतो.  आम्ही तिघे कुल्श चा समाचार घेत होतो ,आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या
 .तेवढ्यात हातात हात घालून ते दोघे आले.एकच वेषभूषा ,एकाच रंगाचे कपडे अगदी दो जिस्म एक जान हे जगाला दाखवण्यासाठी त्याची सर्व सारखे घालण्याची अहमहमिका होती ,सगळ्यात मस्त चट्टेरी पट्टेरी विजार सर्वांचेच लक्ष आकर्षित करून घेत होती.

सुंदर ते ध्यान बसले आमच्या शेजारी नि घातल्या चोचीत चोची .

 समलैंगिक लोक युरोपात चिक्कार आढळतात .अर्थात ह्या आधी  लंडन मध्ये  असतांना मी सार्वजनिक ठिकाणी हे असे काही पहिले नव्हते .फक्त माझ्या सुरवातीच्या काळात रात्रीचे लंडन पाहायचे म्हणून मित्रांसोबत बाहेर पडलो होतो .बरेच काही जे रुपेरी पडद्यावर पहिले होते ते  आयुष्यात प्रथमच पाहत असतांना आम्ही चार मित्र दमलो .नि अपेयपान करण्यासाठी एका पब मध्ये गेलो.
 .सुरवातीला पब  काहीच नवल वाटले नाही .सगळे नॉर्मल वाटले पण हळू हळू खरा प्रकार लक्षात आला .तो गे क्लब होता.  जेथे नॉर्मल लोक हि जाऊ शकतात .पण प्राधान्य गे लोकांना होते त्यांना  आपल्या जोडीदाराबरोबर चार क्षण निवांत घालवायला मिळावे म्हणून त्याच्यासाठी हे विशेष कक्ष उभारण्यात आले .होते .एक लबाड वेटर अत्यंत लाडिक हावभाव  करत येत आमच्या कडे आला नि म्हणाला
 तुम्ही कोणत्या देशाचे ?आम्ही भारत असे म्हंटल्यावर तो खुश झाला .तुमचा जोडा खूप क्युट दिसत आहे .असे म्हटल्यावर तोंडात जोडे मारल्या सारखी आमची अवस्था झाली. गंमत म्हणजे आम्ही आधी बियर ऑर्डर केली असल्याने आता परतीचा मार्ग कठीण वाटत होता .न जाणू त्याचा पहिलवान बाउन्सर्स आम्हाला बुकलायचा .बरे जीवाचे लंडन करायचा हा पहिलाच प्रसंग त्यामुळे ह्याचे रीतीरिवाज माहिती नव्हते ,.हा साउथ   अमेरिकन वेटर आम्हाला  त्याची कर्म कहाणी थोडक्यात सांगून मोकळा झाला .अमेरिकेत त्याचा भारतीय जोडीदार होता . पण त्या भारतीय मित्राच्या  घरी प्रकरण कळल्याने प्रॉब्लेम झाला .मग हा बेकायदेशीर असल्यामुळे ह्याला तिथून तडीपार केले .थोडक्यात प्रेमी जीवाची ताटातूट .
बियर संपून जायचे म्हटले तर एकाला  लघु शंका आली .पण शौशालयातून    तो जे तडक बाहेर आला ते घाबरून
.आम्ही त्याला विचारले काय झाले ?
तो म्हणाला आत काही लोक अभद्र व्यवहार करत आहेत मला भीती वाटली मला खेचून घेतले तर ? चल जाउया  इथून
 .बाहेर आल्या वर आम्ही खूप हसलो .मी त्याला म्हटला तू अपनी  इज्जत बचा के आया.

तर वळूया कलोन कडे
 हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सम लैंगिक लोकांचे शहर आहे .पहिले बहुदा सेन फ्रान्सिस्को असावे . येथे गे परेड हा सर्वात मोठी असते .अजूनही आपल्या हक्कासाठी ते लढा देत आहेत .माझ्या मते युके सोडल्यास इतर युरोपियन देशात सम लैंगिक विवाह कायद्याने मान्य नाहीत .कारण पोपचा असलेला विरोध .युकेचे चर्च हे वेतीकान ला बांधील नाही आहेत .ते स्वतंत्र आहे .म्हणून फॅमिली प्लानिंग  चे केन्द्र जगात पहिले युकेत सुरु झाले .व दुसरे रधो कर्वे ह्यांनी गिरगावात . .दोन वर्षापूर्वी जर्मनीत वेश्याव्यवसाय कायदेशीर झाला .अर्थात तो अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे त्यत सुधारणा व्हायची गरज आहे असे टीव्हीवर सांगत होते.


 कलोन  बेल्जियम व हॉलंड च्या जवळ असल्याने ह्या देशांमध्ये विक एंड ला छोटेखानी ट्रीप करणे सहजशक्य आहे.
कलोन ते एमस्टेरदेम असा ३ तासांचा पोहोचवणाऱ्या अनेक केब कंपन्या असतात. त्या पाहून मला मुंबई पुणे नेणाऱ्या कुल केब ची आठवण आली.
बेल्जियम ची राजधानी ब्रुसेल व पेरिस ला जाण्यासाठी जलद गतीच्या ट्रेन्स येथून जातात.
कलोन शहरात भटकताना ठायी ठायी रोमन स्टोन ने बनलेल्या येथील इमारतीत थेट तुम्हाला मेडेटेरियन संस्कृतीची एक झलक दिसून येते.  जर्मनीतील प्रमुख नदी रायनचे (अजून ह्या लोकांनी तिचे आमच्या मिठी नदीप्रमाणे डबके का बरे केले नाही ह्यावर चिंतन केले  .)  कलोन शहराच्या मध्यभागी एका इमारतीच्या उंचावर हा पुतळा पाहून मला गंमत वाटली ,पण केट ने ह्या पुतळ्याची गोष्ट सांगताच मला हसून हसून पुरेवाट झाली.

 ह्या फोटो मधील मूर्ती काही शतकापूर्वी ह्या शहराच्या वजीराचा आहे .हा विक्षिप्त इसम राग आला कि कधी कधी आपल्या प्रसादाच्या सज्जात उभा राहून  खाली रस्त्यावरील पादचारी वर्गावर  मलमूत्राचा  अभिषेक करायचा. त्याच्या स्मृती प्रीत्यर्थ हा पुतळा त्याचा पूर्वी जेथे प्रासाद होता त्याठिकाणी असलेल्या इमारतीवर ठेवला आहे.

 कलोन मध्ये पाहण्यासारखे अजून एक म्हणजे पेगेल कलोन  हा चबुतरा

१८१० मध्ये रायन नदीच्या पाण्याची पातळी मोजण्यासाठी निर्माण केला होता.

ते नेमके कशी मोजतात ह्याबद्दल तांत्रिक माहिती तेथे माझ्या दृष्टीने  त्यावेळी अगम्य असलेल्या जर्मन भाषेत लिहिली होती.त्यामुळे मी तेथून सटकलो

इस्टर च्या आधी  कलोन शहरात ५थ सिझन ह्या नावाने  कार्निवल साजरा केला जातो.

११ नोव्हेंबर ला ११ वाजून ११ मिनिटांनी हा सोहळा अधिकृतरीत्या सुरु होतो.

ह्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्यांची रस्त्यावर निघालेली परेड जी १८२३ साली स्थापन झालेल्या कलोन कार्निवल कमिटी तर्फे आयोजित केले जाते.युरोपातील सर्वात मोठ्या रस्त्यावर निघणार्‍या ह्या रेली पाहणे म्हणजे एक नेत्रदीपक सोहळा असतो.ह्या निमित्ताने संपूर्ण शहरभर हॉटेल , बार मध्ये वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम  केले जातात.

 चित्र , विचित्र वेषभूषा करून येथे भटकणे हा ह्या सोहळ्यातील सर्व सामन्यांचा आकर्षणाचा एक भाग असतो. मी आणि केट सुद्धा ह्या सोहळ्यात एक कौतुक व शहराची प्रथा म्हणून सामील झालो होतो.,

  प्राचीन वारसा लाभलेल्या शहरामध्ये अनेक शतके प्रचलित अश्या दंतकथा असतात. आणि बालपणी त्या प्रत्येकाने ऐकल्या असतात. कलोन शहराची अशीच एक दंतकथा आहे ,

अनेक शतकांपूर्वी हैईनझेलमेन्शन नावाचे बुटके एक प्रकारचे क्रीचर कलोन शहरात रात्री यायचे. कलोनवासीयांची सर्व घरची कामे म्हणजे साफसफाई , स्वयंपाक अशी बिनबोभाट संपवून सूर्योदयाच्या पूर्वी निघून जायचे त्यांना दिवसा आराम करायला आवडते असे. त्याची एकच अट होती.

रात्रीच्या वेळेस त्यांना काम करतांना कोणीही पाहायचे नाही व त्यांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही.

ही अट कलोनवासियांना अमान्य नसण्याचा प्रश्नच नव्हता. ह्यामुळे कलोनवासीय चांगलेच आळसावलेली होते.

ह्या शहरातील एक शिंप्याने नुकतेच लग्न केले.   त्याच्या बायकोला मनात उत्सुकता चाळवली, तिने रात्रीचे ह्या बुटक्या लोकांना पहायचे ठरवले. ह्या गोष्टींचा हैईनझेल मेन्शन लोकांना भयंकर राग आला व ते परत कधीही कलोन शहरात आले नाही.

त्या दिवसापासून कलोनवासियांना स्वतःची कामे स्वतः करावी लागतात.

ह्या दंतकथेला मूर्त रूप देण्याची व त्याजोगे जगाला व त्यांच्या भावी पिढीला माहिती व्हावी म्हणून कलोन शहरात एक सुंदर असे स्मारक बनवले आहे.

जे हैईनझेलमेन्शन फौण्तेन नावाने विख्यात आहे.

एक सुंदर कारंजे ज्याच्या पायथ्याशी हे बुटके आहेत व वरती त्या आगाऊ शिंपिणीचा .  हातात कंदील घेऊन त्यांना शोधात असलेला सुंदर पुतळा असे गोंडस स्वरूप आहे,

केथेद्रेल पासून काही अंतरावर असलेले कारंजे पाहायला आम्ही गेलो .त्याच्या पाठीमागे असलेल्या फृह आम डोम ह्या जगप्रसिद्ध उपाहारगृह कम ब्रेवरी येथे शिरलो. कलोन ची लाडकी फृह बियर चे माहेरघर असलेले हे १६०० जणांना एकाच वेळी सामाहून घेणारे ३ मजली उपाहारगृह केठेद्रेल च्या सानिध्यात उभे आहे. वरती पहिल्या मजल्यावरून चर्च व कारंजे पाहत बियर चे घुटके घेत एक रम्य संध्याकाळ घालवली.

केट ने मला विचारले , तुमच्याकडे तुझ्या लहानपणी एखादी दंतकथा तू ऐकली असशील ना ,

मी ह्या वर लगेच , कापूस कोंड्याची गोष्ट सांगू असा प्रश्न विचारून वर सांग काय म्हणते , कापूस कोंड्याची गोष्ट सांगू असे म्हणून काही क्षण तिला पिडले. तिला म्हातारीच्या पिसा ची गोष्ट सांगितली.

पण कापूस कोंड्याची स्मारक किंवा पुतळा उभारायचा विचार कधीच कोणाच्या मनात आला नाही ,

पण जाऊ दे , नको तो पुतळ्याचा व स्मारकाचा विषय

आधीच काय कमी वाद चालले आहेत स्मारकावरून ,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips