हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१२

मलाला ( परकीय प्रसारमाध्यमांचा बळी )

मला एक गोष्ट कळत नाही आपण प्रसार माध्यमांच्या एवढे अधीन का आहोत. मलाला विषयी परकीय प्रसारमाध्यमांनी वृत्त जगभर प्रसिद्ध केले. आणि अचानक भारतीयांना ती अन्यायाचे विरोध करणारे एक प्रतिक दिसली (  काही दिवसांपूर्वी त्यांना आण्णा हजारे आणि केजारीवाल सुद्धा वाटायचे ) मात्र ह्या प्रसारमाध्यमांनी नाण्याची एक बाजू मांडली आहे.  तिची दुसरी बाजू समोर आणण्यासाठी हा लेखप्रपंच
  
 त्या १४ वर्षाच्या पाकिस्तानी मुलीवर तालिबान ने हल्ला केला येथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे तालिबान मुल्ला ओमर चे नाही तर पाकिस्तान मधील तालिबान आहेत जे अमेरिकेलाच मदत करणाऱ्या पाकिस्तानी लष्कर व आय एस आय च्या लोकांना गेली ५ वर्ष टिपून मारत आहेत.  तेहेरीके तालिबान ही पाकिस्तानच्या सीमेलगत ची संघटना आहे.
ती तालिबान पासून फुटून वेगळी झाली.  त्यांचे प्रमुख लक्ष्य हे पाकिस्तानी सैन्य , व आय इस आय आहे.
 ते अमेरिकन बाहुले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
म्हणून त्यांना पाकिस्तानी मीडियातील अनेक जण सी आय ए व रॉ चे  हस्तक म्हटले जाते.


मात्र एक तालिबान मारण्यासाठी गेली काही वर्ष अमेरीका द्रोण हल्ला करतो तेव्हा त्याच्यासोबत अनेक निरपराध लहान म्हणजे काही महिन्यांची बाळ. वृद्ध , महिला पाकिस्तानी व अफगाणी लोक मारले जातात. तरीही अमेरीका द्रोण हल्ल्यांचे समर्थन करते कारण समोर समोर त्यांचे सैन्य तालिबान ला अफगाणिस्तान व पाकिस्तान मध्ये भिडले तर अमेरिकन सैनिकांचे बळी जातील व त्यामुळे व्हिएतनाम सारखे त्यांना माघारी यावे लागेल.

 आज अमेरिके विरुद्ध ह्या प्रदेशात प्रचंड व प्रचंड विरोध असून इम्रान खान ने ह्या भागात नुकतीच एक सभा घेऊन अमेरिकेतला लाखोल्या वाहिल्या तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  त्याने सभेत एक १३ वर्षाचा मुलगा आणला. त्याला जनतेला दाखवून इम्रान म्हणाला " ह्या मुलांचा घरावर द्रोण हल्ला झाला. अर्थात हा हल्ला विमानाचा नेम चुकल्याने त्याच्या घरावर झाला."
 ह्यात ह्याचे आईवडील व लहान बहीण मारल्या गेली. थोडक्यात ह्याची भरपाई कोण देणार?, पाकिस्तानी सरकार ह्याला न्याय देत नाही, उद्या हा तालिबान मध्ये दाखल झाला तर ह्यात नवल ते काय जनतेने अमेरिकेच्या विरोध ात नारे दिले.

ह्या  भागातील एक १४ वर्षाची महिला जिला बी बी सी ने डायरी लिहायला सांगितली , ज्यात तिला शिकता न येण्यापासून अनेक गोष्टींना वंचित राहावे लागत असल्याचा उल्लेख आहे.  अर्थात तिचा वापर करून परकीय प्रसार माध्यमांनी तालिबान वर आपला निशाणा साधला . अश्या वातावरणात अमेरीका व इंग्लंड च्या प्रसार माध्यमांनी मलाला ला एक बाहुले बनवून तालिबान विरोधी वातावरण आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करत होते, आता हे तालिबान म्हणजे मध्य युगीन काळात जगणारे  ,त्यांनी मलाला ला लक्ष्य केले.

 पण जर तील शिक्षणाचा जसा हक्क आहे तसा तेथील पाकिस्तानी जनतेला जगण्याचा हक्क आहे
 हे परकीय प्रसार माध्यम समजून घेत नाहीत. आज १५००० ( नीट आकडा वाचा ) निरपराध लोक मारल्या गेली ह्या द्रोण हल्ल्यात ( कुर्बान मध्ये विवेक ओबेराय व सैफ अली खान मधील हा प्रसंग खूपच बोलका आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग झोपा काढत होता व काश्मीर मध्ये भारतीय सैन्यावर टिपणी करतांना त्यांना बरी जाग येते. मात्र बलुचिस्तान मध्ये अनेक बेपत्ता झालेले नागरिक दिसत नाहीत,व त्या मागील आय एस आय दिसत नाही. बलुची जनता व त्यांच्या नेत्यांचा आक्रोश दिसत नाही. ती मुलगी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी ठरली आहे. इतकेच मी म्हणेन. तिच्या परिसरातील अनेक नागरिक जर्मनीत निर्वासित आहेत , त्यांच्या कहाण्या ऐकल्या की मलाला प्रकरण काहीच वाटत नाही.

येथे मी जेव्हा पाकिस्तानी जनता असा उल्लेख केला तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे दक्षिण व उत्तर वझिरीस्तान मधील लोक कधीही पाकिस्तानला आपले सरकार किंवा राष्ट्र मानत नाही, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याचा समूह , कबिला
व ह्या काबिल्याचा सरदार न्याय व्यवस्था बनवितो.
तेथे जिर्गा म्हणजे  सर्व सरदार व जनतेचे संमेलन भरले जाते व एखाद्या गोष्टीवर चर्चा होऊन निर्णय होतो. ह्या लोकांचे जीवन मध्य युगीन आहे. व त्यांचे कायदे व परंपरा सुद्धा तश्याच आहे.
मागे सौदी अरेबिया जेव्हा अश्याच कायद्या नुसार एका इंडोनेशियन महिलेला शिक्षा दिली तेव्हा ही कोणी बोंबा बोंब केली नाही,


 परकीय प्रसार मध्यम वृत्त देण्याचे काम करत नसून वृत्त बनविण्याचे काम करतात. ते आपापल्या देशाचा परराष्ट्र धोरणाचे कार्य करत असतात त्यांच्याकडून निरपेक्ष बातमी देणे कधीही होत नाही. शीत युद्धात पाकिस्तानची तळी उचलून भारताला कमी लेखणारे व आता अचानक भारत एक फार मोठ्ठी बाजार पेठ आहे हे कळल्यावर अचानक त्यांना भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही व भविष्यातील महासत्ता दिसते ह्यातही चीन च्या पुढे भारताला एक प्यादे म्हणून वापरण्याची त्याची कुल्प्ती असते. गंमत अशी आहे की मलाला प्रकरण वेस्टर्न मिडीया प्रकाश झोतात आणते मात्र स्वतःच्या देशाची झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवते. आपण उगीच ते म्हणतील ती पूर्व दिशा समजून मत बनवत आहोत. मुल्ला ओमरच्या तालिबान समवेत अमेरिका अफगाण मध्ये चर्चा करत आहे. हक्कानी नेटवर्क व तेहेरीके तालिबान मात्र आधी अमेरिकन आर्मी आमच्या भूमी वरून जाऊ द्या मग चर्चा करू असा पवित्रा घेतात. म्हणून त्याच्यावर द्रोण हल्ले होतात

 येथे एक भारतीय म्हणून एक लक्षात घेतले पाहिजे. आपल्या सरकारची व परराष्ट्र नीती अफगाण मध्ये विकास कामे करते पण सैनिकी कारवाई करत नाही व सगळ्यात महत्त्वाचे अमेरिकेने निर्माण केलेले तालिबान व अमेरीका ह्यांच्या संघर्षात स्वतःला गुंतवून घेत नाही. कोन कुठली मलाला अचानक भारतात तिचा सगळ्यांना पुळका येतो. मात्र बिहार मध्ये एका तरुणींचे बेपत्ता होणे व तिच्या आईवडिलांनी तिचा शोध न लागले अश्या घटना असो किंवा खुद्द मुंबईत परकीय तरुणीवर बलात्कार असो , किंवा पुण्यात , मुंबईत तरुणीची बलात्कार होऊन हत्या असो अश्या गोष्टींवर काहीही लिहले जात नाही. आज अमेरीका विरोध पाकिस्तानात कमी करून तालिबान ला पाकिस्तानी जनतेच्या मनातून उतरविण्याचे मनसुबे परकीय प्रसारमाध्यमांचे आहेत. थोडक्यात डर्टी गेम अमेरीका व तालिबान ह्यांच्यात सुरु आहे. कोणालाही मानवी जीवांची चाड नाही आहे.

 आज ह्या अमेरिकेने आता मोदी व गुजरातवर बहिष्कार टाकला का तर तेथे म्हणे मानवी मुल्यांची पायमल्ली झाली. त्यांचा कित्त्त्ता त्यांचे पित्ते युरोपियन देशांनी गिरवला तरीही गुजरात ने प्रगती गेली. आता आपल पूर्वीचा निर्णय बासनात बांधून निर्लज्ज पणाने ब्रिटीश गुजरात मध्ये नुकतेच जाऊन आले. आता अमेरीका सुद्धा ह्याच विचारात आहे. थोडक्यात काय ह्या परकीय प्रसारमाध्यम व त्यांची सरकार हे पलटी मारणारे मोकाफर्स्त आहेत. तेव्हा त्यांच्या ज्यादा आहारी जाऊन जाऊन उगाच मलाला ,मलाला करण्यात काहीही अर्थ नाही

( ह्याच तेहेरीके तालिबान ने पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी अगदी ब्रिगेडीयर व आय एस आय चे वरिष्ठ ह्यंना जेव्हा मारल्याच्या बातम्या येतात तेव्हा मला मनातून आसुरी आनंद होतो , कारगील चा बदला भारतीय जवानांचे रक्त न सांडता घेतला जातो कधी नव्हे ते ह्या घटनांनी पाकिस्तानी लष्कर व आय एस आय दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. एक प्रो अमेरिकन तर दुसरे प्रो तालिबान जाहिद हमीद सारखा कट्टरवादी व भारताला पाण्यात लेखणारे जेव्हा तेहेरीके तालिबान ला नावे ठेवतो. तेव्हा ह्या संघटनेने त्यांच्या लष्कराची व आय एस आय ची किती हानी केली आहे हे दिसून येते,रशिया विरुद्ध आपल्याला वापरले गेल्याची भावना तेथील जनतेत आहे. व सगळ्यात जास्त राग त्यांचा पाकिस्तानी सरकारवर व सैन्यावर आहे,
त्यांना ते पेशावर कातील म्हणतात. अमेरिकन पैशांत   आपल्या लोकांना मारणारे
कातील.
ह्यामुळे पुरेशी कारवाई करत नाही म्हणून अमेरिका पाकिस्तानी सैन्यावर दबाव आणते,
व कारवाई केली तर अमेरिकन भाडोत्री म्हणून त्यांच्यावर हल्ले होतात.
ह्यामुळे कधी नव्हे पाकिस्तानी सरकार व लष्कर ह्यांची बाजू  पाकिस्तानी जनतेपुढे
लंगडी पडली आहे. म्हणून शीत युद्धातील पाकिस्तानचे समर्थक तेहेरीके तालिबान
आता त्यांचा जीव घेत आहेत. त्यांच्या नेव्ही तळावर दोनदा हल्ले करून करोडो डॉलर चे लढाऊ विमाने नष्ट करत आहे.
 .    आज आय एस आय व पाकिस्तानी लष्करी अधिकारी हेच गाणे रडक्या आवाजात म्हणत असतील.</p>

 अगदी मनापासून सांगायचे ९० च्या दशकात  तर काश्मीर की आझादी तक जंग रहेगी ,जंग रेहेगी
असे नारे पाकिस्तानी लहान मुलांपासून आबाल वृद्ध देत काश्मीर च्या जिहाद साठी चंदा गोळा  करत होते त्यातून जिहादी गट पोसले जात होते. हे गट मुंबईत ,दिल्लीत , काश्मिरात भारतीय जनतेवर बॉंब हल्ले करत होते. तेव्हा पाकिस्तानी जनता जिहादी उन्मादात मग्न होती..
मात्र तेहेरीके तालिबान ने लाहोर , कराची मध्ये असेच जिहादी बॉंब हल्ले करून
प्रत्यक्ष जिहाद काय चीज असतो हे संदर्भासहित स्पष्ट करून दाखवले.
आणि अचानक पाकिस्तानात तेथील मंत्र्यांना भारत नाही तर अंतर्गत दहशतवाद
हा पाकिस्तानचा क्रमांक १ चा शत्रू असल्याचे कळले.
दहशतवादाने युद्ध जिंकता येत नाही व तो सापासारखा उलटा डसतो ही जाणीव तेथील जनतेला होत आहे. म्हणूनच आता काश्मीर मध्ये जिहादसाठी चंदे गोळा करायला तेथील जनता रस्त्यावर येत नाही.
भारताने स्वतःला अफगाणिस्तान मधील सैनिकी कारवायांमुळे जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. म्हणून अलका यदा किंवा तालिबान ह्यांनी भारतात कोणतेही हल्ले केले नाही.
भारतातील हल्ले पाकिस्तानी काश्मीर केंद्रित संघटना लष्करे तय्यबा करते.
त्याला रसद तेथील सैन्य , आय एस आय पुरवते.
ह्या पैकी बलुचिस्तान मधील लिबरेशन आर्मी आणि तेहेरीके तालिबान जर पाकिस्तानी सैन्य , आय एस आय ला टार्गेट  करते तेव्हा एक भारतीय म्हणून  मला खूप आनंद होतो.
आंतरराष्ट्रीय राजकारणात भावनाप्रधान होण्यापेक्षा चाणक्य नीती वापरणे योग्य

३ टिप्पण्या : 1. तिच्या शिक्षणाची कळकळ तुमच्यापर्यंत पोहोचवणारे त्या भागातील निरपराध लोकांचा जगण्याचा हक्क आणि त्यांची कळकळ एवढ्याच हिरिरीने का नाही मांडत?

  दुसरी बाजू ही आहे की ती लोक ज्या काळात जगतात ज्या चालीरीती व संस्कृतीचा त्यांच्यावर पगडा आहे उदा खून का बदला खून ( त्यांनी इंग्रजांची न्याय व्यवस्था कधीच स्वीकारली नाही )
  हे लक्षात घ्या-
  दुसरे महत्त्वाचे उदाहरण तेथील जनतेत अमेरिकेविरुद्ध प्रचंड म्हणजे विचार करण्यापलीकडे असंतोष आहे. आपल्याकडे हिरव्या दहशतवादाविरुद्ध सुद्धा त्रीव भावना आहेत.
  एक उदाहरण देतो.
  लाल दहशतवादात २० बळी व हिरव्या दहशतवादात १० बळी अश्या दोन बातम्या जर भारतात प्रसारित झाल्या तर
  लोक त्या १० बळी असलेल्या घटनेवर जास्त राग व्यक्त करतात.
  कारण त्यामागे अनेक वर्षांची पार्श्वभूमी ,इतिहास , धर्म आणि इतर बरेच मुद्दे येतात.
  तसेच तेथे अमेरिकेला मदत करणारा म्हणून एकदा बदनाम झाला तर त्याला शिक्षा त्यांच्या कायद्यानुसार देतात.
  आता भारतात देखील अशी मानसिकता व असे कायदे अजूनही खेड्यांमध्ये आहे.
  तामिळनाडू मधील ताजे उदाहरण किंवा एखाद्या गावात एखाद्या महिलेला चेटकीण समजून दगडाने ठेसून ठार मारणे ह्या गोष्टी होतात.
  हे तुम्ही आणी मी सरकार थांबवू शकत नाही त्यासाठी लोक प्रबोधन आवश्यक आहे.
  प्रसारमाध्यम एकाला हिरो बनवितात तर एकाला झिरो
  त्यांनी चढवले म्हणून एका दिवस व आठवड्यासाठी गांधी टोपी घालावी ह्याला अर्थ नाही.

  अमेरिका सम दंड भेद वापरून हे युद्ध जिंकण्यासाठी तेथे सर्वकाही डावपेच करत आहे.
  मलाला प्रकरणाचे थोडक्यात सार सांगायचे तर अमेरिका पाकिस्तानला उत्तर , दक्षिण वझिरीस्तान जेथे हक्कानी नेटवर्क, तेहेरीके तालिबान चा तळ आहे व नाटो सैन्यावर जास्त हल्ले तेथून होतात तेथे सैनिकी कारवाई करायला सांगत आहे.
  मात्र पाकिस्तानी लष्कर व आय एस आय चे हक्कानी नेटवर्क शी हितसंबंध असल्याने
  ते काही केल्या कारवाई करत नाही आहे.
  म्हणून पाकिस्तानी शहरी भागात ह्या संघटने विरुद्ध जनमत गोळा करणे
  व आंतराष्ट्रीय पातळीवरून ह्या कारवाई साठी दबाव वाढवणे ह्यासाठी मलाला चा वापर केला गेला ह्यात त्यांना यश मिळाले तरीही मला नाही वाटत पाकिस्तान ही कारवाई करेल
  ज्या दिवशी ही सैनिकी कारवाई होईल त्या दिवशी कराची व लाहोर ह्या शहरांना बगदाद पेक्षा जास्त भयानक आत्मघाती हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल.

  जो पर्यंत ही सैनिकी कारवाई पाकिस्तानी लष्कर किंवा अमेरिकी सैन्य करत नाही
  अफगाणिस्तान मधून ओबामा आपले सर्व सैन्य परत आणू शकत नाही.
  तेव्हा पाकिस्तान व अमेरिका ह्यांच्या राड्यात आपण उगाच का पडायचे
  आपले प्रमुख लक्ष्य तेथील भारत केंद्रित दहशतवादी संघटना आहेत.

  उत्तर द्याहटवा
 2. निनाद, प्रयत्न छान करत आहात व खास करुन असे विषय हाताळणे सोपे नव्हे. टिपण्णी व comments या विषयावर करता आली असती पण सध्या व्यस्तते मुळे शक्य नाही. भविष्यात जमल्यास करेन.

  पण तुमच्या लेखांची मांडणी तितकीशी छान वाटत नाही, त्यामुळे आशय समजायला अडचणी येतात. तसेच शुद्धलेखनाच्या चुका बर्‍याच असतात, publish करण्या आगोदर एक दोनदा proof reading केल्यास बराच फरक पडेल.

  उत्तर द्याहटवा
 3. अजय बिडवे
  तुमचे माझ्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे ,
  कार्य बाहुल्यामुळे आपणस ह्या विषयावर मनात असून सुद्धा प्रतिसाद देता आला नाही ह्या बद्दल खेद वाटला.
  लेखाची मांडणी व शुद्ध लेखन ह्यावर आपण म्हणता तसे लक्ष देण्याचा प्रयत्न करेल ,
  पण लेखातील मुद्दे व भावना ह्यांच्याशी आपण सहमत आहात का हे गुलदस्त्यातच राहिले.
  आपल्या सविस्तर अभिप्रायाची वाट पाहत आहे.

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips