हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २६ मे, २०१२

नको तो पावसाळा नको तो गारवा


आमच्याकडे जर्मनीत  उन्हाळा सुरु झाला आहे.आठवड्याचे ५ दिवस लख्ख सूर्य प्रकाश असतो.  मात्र शनिवार ,रविवार नित्यनेमाने आभाळ दाटून येते. आणि गारवा दाटून येतो आणि कुंद वातावरण आणि दिवस भर पावसाची रिपरिप पण हे वातावरण त्यातील गारवा मला अजिबात आवडत नाही.

८ महिने थंडीत येथे थंडीत  गारठल्यावर सूर्याची दाहकता  आणी अंगाची लाही लाही करणारा  उन्हाळा ह्यासाठी मी अगदी आसुसलेला आहे.

हे जरा विचित्र वाटेल पण जागतीकरणामुळे आम्ही युरोपात येऊन स्थिरावलो आणि जगण्याचे सामाजिक ,सांस्कृतिक नाही तर भौगोलिक संधर्भ सुद्धा बदलले.
  एक मुंबईकर ह्या नात्याने   लहानपणी निसर्गाची रूपे पूर्णपणे कधीच उपभोगो शकलो नाही, नाही म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातील  पहिला पाऊस आणी मातीतून दरवळणारा सुंगध     त्यात मनोसोक्त भिजून घ्यायचो. मग मात्र चिखल ,
लोकल ची वाट पाहत पावसामुळे गाड्या उशिराने येत आहेत. व प्रत्येक सेकंदाला फलाटावर वाढणारी गर्दी ह्यामुळे पावसाळा
 नकोसा वाटायचा. नाही म्हणा एखाद्या रविवारी लोणावळा ,खंडाला गाठायचा पण एरवी नको तो पावसाळा

उन्हाळा लहानपणी केवळ त्यामुळे मिळणाऱ्या सुट्टीसाठी तर हिवाळा हा मुंबईत जेवणातील मिठासारखा असायचा पण अनेक सण व दिवाळी घेऊन यायचा म्हणून आवडायचा. येथे युरोपात हिवाळ्याचे वर्षभर साम्राज्य
म्हणून तर इंग्रजीत परिचिताला वार्म वेलकम करतात. म्हणजे प्रीतीची ,स्नेहाची उबदार स्वागत तर ह्याउलट आपल्याकडे मात्र "कलेजे मी ठंडक पड गयी" असे म्हणतात.

हाडे गोठवणारी थंडी हा जर्मनी मधील थंडीचे वैशिष्टे उणे १० ते १५ पर्यंत पारा खाली जातो आणि संपूर्ण सृष्टी पांढरी शुभ्र होते. आता केनेडा , सैबेरिया किंव रशिया च्या मानाने हे काहीच नसेल पण माझ्या साठी आणि खुद इथल्या लोकांसाठी थंडी हि जबराट असते. हिवाळ्याच्या सुरवातीला पहिल्या हिमवर्षावाचे कौतुक वाटते पण सतत आभाळ ढगाळलेले आणि वातावरण मरगळ णारे असते.
ह्यामुळे मनात कधी कधी खूप निराशा दाटून येते. स्टारबर्ग , कोस्टा केफे मध्ये पडीक होऊन एखादे रहस्यमय पुस्तक वाचत कॉफीचे कप रिते करायचे हा अलिखित नियम होऊन बसतो

 घरच्यांची माझ्या देशाची माझ्या माणसांची त्रीवतेने आठवण येते. आणि मग जीव सूर्य नारायणाच्या दर्शनासाठी खूप व्याकूळ होतो. एखादा सूर्यकिरण अंगावर पडावा ह्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतो. भर बर्फात अंगावर ढीगभर कपडे  घालून बाहेर आलो  असतांना चुकून सूर्य दिसला की अंगावर कोवळे किरण पडून शरीरात ड जीवनसत्व बनविण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतो. अधून मधून येथे पाऊस पडत असतो त्याचे काहीच नवल वाटत नाही. मात्र जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते तेव्हा हपापल्यासारखे सारे जर्मन उद्यानात पळतात. अल्प वस्त्रात किंवा दिंगबर अवस्थेत सुद्धा दीवस भर सूर्योपासना करत राहतात. येथे देह प्रदर्शन हा मुळीच हेतू नसतो, मात्र वर्षभरातून क्वचित दिसणारा सूर्य व त्याच्या किरणांनी आंघोळ करून आपली गोरी त्वचा थोडी कृष्ण्व्रणीय करण्याकडे त्यांचा काळ असतो.

आपल्याकडे जसे गोरे होण्याचे आकर्षण मग त्यासाठी अनेक क्रीम तसे   येथे शामवर्णाचे आकर्षण असते.
मला मात्र का कुणास ठाऊक मुंबईमधील उन्हाळा आठवतो. येथील पाऊस आउट सोर्स करावा व माझ्या देशातील बळीराजाच्या शेतात पाडवा धरणी सुजलाम ,सुफलाम करून त्याचे राज्य प्रस्थापित करावे असे मनापासून वाटते.
म्हणून आज पाऊस पडला नाही आणि पुढील आठवड्यात सुध्धा पडणार नाही आहे. म्हणून मी जाम खुश  आहे. तेव्हा रविवारी  म्युनिक चे जगप्रसिद्ध इंग्लिश गार्डन  गाठतो. त्यावर सविस्तर  लिहिले तर ह्याहून मोठी पोस्ट होईल

११ टिप्पण्या :

 1. एकदम सेंटी पोस्ट! लहानपण आठवलं की नॉस्टॅल्जिक होतंच . :)

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद काका
  येथील उन्हाळ्याची त्रीव्रता ही मुंबईतील हिवाळ्या इतकी असते.
  मर्ढेकरांच्या नखाची जरी मला सर असती तर म्युनिक च्या उन्हाळ्यावर मी पितात सारे गोड उन्हाळा च्या धर्तीवर कविता केली असती.

  उत्तर द्याहटवा
 3. दिवसभर कडक उन्ह आणि रात्री पाऊस अशी उन्ह ,पावसाचा पाठ शिवणीचा खेळ सुरु आहे. आमच्याकडे श्रावणात काय अजून वेगळे घडते. फरक एवढाच आहे की श्रावणात हा खेळ हलका फुलका व नजाकतीने परिपूर्ण असतो. लग्नात मंडपाच्या प्रवेश दारापाशी गुलाबपाणी शिंपडतात तसा पाऊस पडतो. तर त्याच्यापाठोपाठ येते कोवळे उन्ह येथे मात्र हे दोघेही रुद्ध रूपं धारण करतात.
  मुसळधार पाऊस काही नवीन नाही भारतियांना पण येथे सोबत विजेचे तांडव सुरु असते. सारंच एकदम टोकाचे मात्र येथे सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य आहे. येथे हिरवळीचा शब्दशः अर्थ घ्यावा. मात्र येथे कोणालाच पावसात भिजायला आवडत नाही. कारण पावसात भिजण्यासाठी आधी ४ महिने उन्हात घाम गाळावा लागतो. तेव्हा पावसा सोबत तुमच्या मनात सुप्त आकर्षण निर्माण होते.
  मात्र शून्याच्या खाली तापमान पाहण्याची सवय असलेल्या ह्या लोकांना अधून मधून वर्षभर पडणाऱ्या पावसाबद्दल ओढ ,जिव्हाळा कसा बरं निर्माण होईन . मला मात्र कधी रस्त्यात पाऊस लागला तर मी मनसोक्त चिंब भिजून घेतो. घरी आल्यावर पुरानी जीन्स यु ट्यूब वर लावतो.

  उत्तर द्याहटवा
 4. हे सूर्यदेवाची वाट पाहायचं काम मी पण नित्यनियमाने करतेय विशेषतः नॉर्थवेस्ट अमेरीकेत आल्यापासून...सारखीच पावसाची पिरपिर....मग त्रागा, वैताग, चहा-कॉफ़्फ़ी, ब्लॉग असं सुरू असतं....;) असो....
  पण तरी मला मुंबईचा पावसाळा भटकंती करायला अतिशय आवडायचा ...:)

  मस्त पोस्ट

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. अगदी अगदी
   रिमझिंम गिरे सावन ह्या गाण्यात नखशिखांत भिजलेली मुंबई काय गोजिरी दिसते.
   मरीन्स लाईन च्या किनारी उसळणाऱ्या लाटा दक्षिण मुंबईत आमचा ईशान्य मुंबईतून कॉलेज ला बुट्टी मारून आगमन मग झेवियर , सिडनी हेम सारख्या कॉलेजातील आमच्या सारख्या विद्यार्थानाकडे कुतुहूल मिश्रित भाव चेहऱ्यावर ठेवून लाटांमध्ये भिजणे ,भुट्टा खाणे अश्या कितीतरी आठवणी.
   किनार्यावरून दूर मलबार हिल च्या टेकड्या तेवढ्याच गोंडस दिसतात.

   हटवा
 5. चला उद्याचा रविवार आणि रवि नक्कीच प्रसन्न आहे असा एकंदरीत अनुमान आहे तर...अमर्याद उल्हास...
  बाकी पावसाबद्दल तू मांडलेल्या विचारांवर पूर्ण सहमत आहे....एकदम सही..

  उत्तर द्याहटवा
 6. पराग
  निसर्गाची करणी अजब आहे. मात्र येथे एकच सुख आहे की आठवड्याचे हवामान आधीच नेट वर कळते. त्यामुळे तसे आडाखे मांडता येतात. उद्या विएना ला चाललो आहे.
  पण उद्या तेथे ढगाळी हवामान आहे.ठीक आहे
  मोझार्ट च्या शहरात जायचे म्हणजे एवढे करणे आलेच.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मोझार्ट खरे तर खूपच गूढ व्यक्ती होता. एकदम थोड्या काळात त्याने अगणित आयुष्य जगले. अगदी युरोपेभर!. मी त्याच्या दोन्ही घरांना भेट देवू शकलो साल्झबर्ग आणि वेनिस. पण विएन्ना ला त्याला मिस केले. एकदम मोठे शहर ना? त्यात तो मला सापडला नाही रे...
   पण त्याचे संगीत वाजवणारा पिआनो मिळवला आहे, चावी दिली कि संगीत वाजत रहाते. विशेष म्हणजे एक सुंदर फ्रॉक युवती ची टोके हातात धरून गोल गिरक्या घेत त्या पिआनोवर संगीताच्या तालावर
   नाचत असते..खूपच सुंदर... इथे फोटो डकवला असता पण तशी काही सोय दिसत नाही...असो..
   परत कधी येतोयस? आणि नवीन काहीच कसे नाही? तुझे काही कामे मला करायला दे म्हणजे तुला blog ला वेळ मिळेल....

   हटवा
 7. पराग मला फोटो मेल कर मी तुझे नाव टाकून माझ्या गुगल प्लस मध्ये ठेवेन.
  आणि पुढील पोस्ट मध्ये नक्की वापरेन
  अवांतर
  माझे परदेशी संगीताबद्दल संपूर्ण आनंद आहे.
  मात्र केट ला भलताच व्यासंग आहे. म्हणून गाड्या बरोबर नळ्याची यात्रा ह्या न्यायाने
  मी सुद्धा आता थोडी माहिती जमवायला सुरवात केली आहे.
  आता लोकांपुढे
  सराईत पणे " मोझेर्ट म्हणजे , अभिजात , म्हणजे काय हो असे इतक्या आत्मविश्वासाने बरळतो की समोरच्याचा सुपडा साफ
  लखू रिसबूड आमचे आदर्श आहेत.

  उत्तर द्याहटवा
 8. Aaj Frankfurt madhal weather ani tu blog madhey lihilela ekdam match hotay.. :).. mast lihitos..

  उत्तर द्याहटवा
 9. निसर्गाची विडंबना पहा.
  जो देश शेतीवर जगतो तेथे दुष्काळ पडतो तर येथे युरोपात बारा महिन्यात फक्त काही महिनेच शेती केली जाते पण येथे पाऊसच पाऊस चोहीकडे
  परवा मराठी संमेलन आटपून तुमच्या शहरात आलो तेव्हा सरवणं भवन मध्ये अश्या पावसाळी वातावरणात पेपर डोसा आणि सांभार अशे अफलातून कोंबीनेशन होते.

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips