हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

मुंबई महानगर पालिका निवडणूक फुल टु घुमशान , दंगल , धर्मयुद्ध भाग एक

.
 राज साहेबांचे भाषण ऐकले ,त्याआधी अवधूत चे गाणे ऐकले
भाजपाची दुसरी टीम आल्याचा सेनेच्या आरोपाचे मळभ दूर सारण्यासाठी भाजपवर मनोसोक्त टीका झाली ,
त्यातून नेहमीचे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न  हा आरोप करण्यात आला
मुळात मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करावयाचे झाले तर ते केंद्र व राज्य सरकारच्या परवानगी ने होऊ शकते आणि दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे

मुळात महानगर पालिकेच्या निवडणुकीत मुंबई शहराबद्दल त्याच्या विकाबद्दल बोलणे अपेक्षित आहे पण मराठी माणसाने मनसेला मत भाजपाला दूर ठेवण्यासाठी द्यावे त्यासाठी सेनाला टाळी दिली होती हे सांगून चेंडू सेनेच्या अंगणात अलगद फाटकावून टाकला आहे.
भाषणाच्या शेवटी कोणी पक्ष  सोडून गेले तर
मुन्ना भाई च्या सिनेमातील डायलॉग ऐकवून आधीच एवढे रसातळाला गेलो आहोत अजून किती जाऊ अशी निर्वाणीची भाषा केली.
मला भाजप समर्थक म्हणून नाही पण भाजपाचे एका गोसंघटीचे कौतुक वाटले कि
भाजपाच्या नेत्यानाचे राजसाहेबांनी चांगले संबंध आहे त्यात गडकरी पासून अनेक आले.
पण सेनेशी युती तुटली तेव्हा विधानसभा ते डोंबिवली ते आता मुंबई मध्ये निवडणुकीत शत्रूचा शत्रू ह्या न्यायाने भाजपने मनसे  शी कधीही युती केली नाही
खरे तर भाजपाच्या अमराठी मतांच्या शिवाय सेने मनसेला कशी टक्कर देऊ शकते हे ह्या आगामी निवडणुकीत दिसेन
गरज आहे ते मनसे  ने सुलतानढवा चढवण्याची.
सध्या आहेत त्यापेक्षा नक्कीच जास्त नगरसेवक निवडनू येऊ शकतात.
सेनेची काही मराठी मते त्यांच्या बालेकिल्ल्यात  भाजप तर भाजपची काही मते सेना त्यांच्या बालेकिल्ल्यात आपापल्या पारंपरिक मतांच्या जोरावर नक्कीच खेचू शकेल.
ह्यातून मनसेला संधी मिळू शकते
सरतेशेवटी भाषणाच्या सुरवातीला अवधूतने गाणे म्हटले तसे
तुमच्या राजाला साथ द्या असे भावनिक आव्हानं मनसैनिक व मराठी मतदारांना केले.
त्याला किती मुंबई मधील  मराठी माणसं किती   साथ मिळते. हे पाहणे मनोरंजक आहे.
कारण मराठी साठी मत कि मराठा म्हणून मराठा मोर्च्याला समर्थन द्यायचे अश्या द्विधा मनस्थिती अनेक मने आहे.

1 टिप्पणी :

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips