हिमवर्षाव

Blogger Tricks

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२

अमेरिकन संडी आणि शाळेला दांडी

अमेरिकेत आलेल्या वादळामुळे साहजिकच डोंबिवलीकर व स्वामी राणा प्रताप  शी निगडित सर्व विद्यार्थ्यांना काळजी वाटणे संयुक्तिक आहे. आपले अनेक आप्त मित्र , मैत्रिणी तेथे आहेत.
ते सुखरूप असतील अशी आशा करतो. (ज्यांनी अजून आपले स्टेटस अपडेट केले नाही आहेत त्यांनी लवकर करा ,
 . प्रसार माध्यमे सतत तेथील परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. तेव्हा काळजी वाटते.)

चेहरा पुस्तकावर अनेकांची म्हणजे हेरंभ व इतर वर्ग मित्रांची खुशाली त्यांच्या खुसखुशीत स्टेटस वाचून कळत असते. इतर ही असेच सुखरूप असतील , .पण त्यांचे स्टेटस अजून वाचायला मिळाले नाही आहेत.
अश्या वेळी माझ्या  टवाळ , वात्रट स्वभावाला अनुसरून  मला ह्या तणावग्रस्त परिस्थितीत सुद्धा डोक्यात कल्पना आली.  जर आपल्या बालपणी शाळेत असतांना  चक्रीवादळ  डोंबिवलीत आले असते तर
.

 मुंगी  उडाली आकाशी ह्या आशयाच्या कल्पनाविस्तार निबंध मराठीच्या पेपरात असायचे. तसाच हा एक कल्पना विस्तार

तो जरा  हलके घ्या ( टेक इट इजी) तेथे म्हणे ( अमेरिकेत ) शाळांना सुट्टी आहे.
आपल्या काळी डोंबिवलीत अश्या शाळेला सुट्ट्या कधीही मिळाल्या नाही.
असा थरार सुद्धा कधी अनुभवायला मिळाला नाही.
जरा विचार करा
डोंबिवलीत चक्रीवादळ        ( शाळेतील शिक्षकांची आपत्कालीन बैठक , समिती )
आपल्या आवडत्या वर्ग मैत्रिणीला तिच्या घरी सोडवण्याची आपली धडपड ( पण तिचे घर पाण्यात बुडाले व आपले सुद्धा.
मग नाईलाजाने कोण तिसर्याच्या घरात आश्रय ( दुर कुठे तरी रूप तेरा मस्ताना विविध भारतीवर लागले आहे )
कल्पना विस्ताराला भयानक स्कोप ( पाणी पाणी चोहीकडे ,  त्यात मुंन मून च्या मिसळीचे दोन भले मोठे पिंप पाण्यावर तरंगत आहेत , ते आपल्या हाती लागतात आणि आठवड्याची सोय.,,,

आणि अचानक वर्गातील मित्र मंडळी जवळच्या एवरेस्ट समूहांच्या इमारतीत अडकले आहेत अशी बातमी कळते
.( एरवी  नाख्ये  बिल्डरांनी बांधलेल्या ह्या इमारती चे छत
दर पावसाळ्यात डांबर लावले तरी हमखास गळते पण ह्या कठीण प्रसंगी ह्या इमारती आपल्या एवरेस्ट नावाला   सार्थ ठरवत ताठ मानेने उभ्या राहतात. मग वर्गातील मित्र मैत्रिणींचा अड्डा जमतो. ह्यातून कोणालातरी  तरी चहा करता येतो हा शोध लागतो तर एका विद्यार्थ्याला जेवण करता येते हा अजून मोठा शोध लागतो.
मग वादळी वाऱ्यात आहे त्या शिधा सामग्री मध्ये  अंगत पंगत रमते.

मग घरातील डबे ,ताट वाट्या हाती लागेल ते घेऊन वर्गातील काही कलावंत वाद्य वाजवायला सुरवात करतात.
वर्गातील गान कोकिळा आपसूकच सूर धरते..
कडकडनार्या   विजांच्या व गडगडणाऱ्या ढगांच्या  साक्षीने मैफल रंगते
शेवटी निसर्गाला दया येऊन त्याचा प्रकोप थांबतो.
आणि मग सर्व वर्गातील मित्र मैत्रिणी आपापल्या घरी जातात. तेव्हा वर्गातील काही मुलांची ह्या प्रकोपाने अभ्यासाचा अमृततुल्य वेळ वाया गेल्याची खंत त्यांच्या संभाषणातून जाणवते.

 तर माझ्या डोक्यात मात्र...
परत आता तेच चाकोरीबद्ध आयुष्य
तोच मार्च महिन्याचा उन्हाळा , वर्गात परीक्षेचा पेपर पाहून फुटणाऱ्या घामाच्या धारा
आणि त्या दूर करण्याची निष्फळ प्रयत्न करणारा वर्गातील पंखा
दूर कुठेतरी घडल्याचे टोले पडत आहेत.
जणू ते सुचवत आहेत
ये वक्त भी गुजर जायेगा.
,


जोक्स अपार्ट
मला आठवते आहे की मी चौथी मध्ये असतांना डोंबिवलीत बदलापूर डेम चे पाणी सोडल्याने पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
आणि शाळेला सुट्टी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips