हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

असामी असा ही मी

नमस्कार
माझे नाव निनाद सुहास कुलकर्णी.
 स्वताबद्दल माहिती द्यावी तीही पंचतारांकित शीर्षकाखाली एवढी माझी योग्यता नाही. मात्र पंचतारांकित दुनियेत मी माझा वावर असल्याने म्हणजे हॉटेलात काम करीत असल्याने गुण नाही पण वाण लागला ह्या म्हणी नुसार ह्या ब्लॉग वर पंचतारांकित दर्जाचे लेखन करण्याची ( म्हणजे अभिव्यक्त होण्याची माझी मनीषा आहे ) ह्या आधी सकाळची कम्युनिटी मुक्तपीठ व मिसळपाव ह्या अमराठी संस्थळावर मी माझे लेखन केले आहे.(आपण जे खरडतो त्याला वाचकांनी प्रतिसादाची मोहर उमटवली कि ते लेखन होते ) आता ह्या ब्लॉग द्वारे प्रवास वर्णन ,आंतराष्ट्रीय राजकारण ( ह्या लोकांच्या सहवास नोकरीनिमित्त नेहमी राहावे लागते ) आणि जगात घडलेल्या एखाद्या तत्कालीन घटनेवर माझी मताची पिंक टाकणे  माझ्या कामानिमित्त सिनेतारका व सिनेअभिनेते व ह्या शेत्रातील दिग्गज मंडळीची सरबराई करतांना ह्या शेत्राविषयी अनेक गोसीप कानावर पडत. ह्यामुळे मुळातच सिनेमाची आवड असल्यामुळे त्यावर परीक्षण म्हणण्यापेक्षा भाष्य करणे  .   हेच ह्या घडीला ह्या ब्लॉग चे उदिष्ट आहे.


माझा परिचय मी स्वतःच करून देत आहे.( तो एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने करून द्यावा हि अभिलाषा मी नेहमीच मनी बाळगली होती) तूर्तास स्वतःच ....
नेहमीच्या पठडीतल्या शिक्षण आणि नोकरीपेक्षा काहीतरी वेगळे करायची इच्छा असलेल्या माझे बालपण डोंबिवलीत गेले... डोंबिवलीतून दहावी नंतर मुंबईत स्थलांतरित झाल्यामुळे मित्रपरिवार आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन व्यापक झाला होता.( मध्यम वर्गीय समाजाचे मुंबईतून उपनगरात स्थलांतर होतांना आमच्या आजोबांनी मुंबई मधील एका बटाट्याच्या चाळीत आमच्या भविष्यकाळातील शिक्षणासाठी तरतूद म्हणून जागा ठेवली होती ) म्हणून आम्हास मुंबई दिसली.

विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्याने साहजिकच आई-बाबांची इच्छा मी अभियंता व्हावे... पण मी बारावीच्या सुट्टीत टायटॅनिक हा सिनेमा १७ वेळा पहिला. अन त्यातुनच मोठ्या प्रवासी बोटीवर काम करावे. नवीन देश ,माणसे, संस्कृती अनुभवायला मिळावी. हा विचार मनात रुजायला लागला.
काहीतरी वेगळे करायचे होते हे पण मनात घोळत होतेच अन त्याचेच फ़लित म्हणुन की काय आणि कोणास ठाऊक एखादी "केट" ह्या जगाच्या पाठीवर आपल्यास भेटेल ( टायटॅनिक इफ़ेक्ट) अश्या हेतूने हॉटेल व्यवस्थापन करायचे ठरवले... माझ्या या निर्णयाला घरुन पाठिंबा मिळालाच..मी हॉटेल व्यवस्थापन पुर्ण केले व पोस्ट ग्रॅज्युएशन हॉटेल अ‍ॅंड टुरिझम ( युनिवर्सिटी ऑफ वेस्ट लंडन ) येथुन पुर्ण केले... माझ्या या निर्णयाला घरून जरी पाठिंबा मिळाला तरी घरी लहानपणापासून बाबांनी माझा वाचनाचा छंद जोपासला होता. रमेश मंत्री, पु ल, मीना प्रभू आणि अनेक लेखकांमुळे प्रवास वर्णन आणि पर्यटनाची इच्छा मनी रुजली होती. सदर निवडलेले करियर त्यास पूरक होते. आता हे विश्वची माझे घर हे जीवनाचे सूत्र ठरले होते. हॉटेल शेत्रातील नामवंत मराठी नाव विठ्ठल कामत ह्यांचे ऑर्किड आणि इडली हे आमच्या शेत्रातील मुलांचे बायबल आहे. त्यांची अनेक पारायण केली होती. त्यांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे.

, " माझी सहचारिणी कॅथरीना ( केट ) हि सुद्धा माझ्याच फिल्ड मधील असल्याने आम्ही एकमेकांना समजून घेतो. माझ्या यशात तिचा तिच्या यशात माझा खारीचा वाटा आहे. अंदरकी बात म्हणजे ह्या शेत्रात माझ्यापेक्षा
तीच जास्त यशस्वी आहे. ह्यामागे तिची अथक मेहेनत व कुशाग्र बुद्धी कारणीभूत आहे. त्यामुळे माझ्या आईच्या शब्दात सांगायचे तर ती माझ्यासकट माझा संसार एकहाती सांभाळते." आमची पत्नी युरोपियन काकूबाई आहे. पण तिला मी बरी आणि माझा संसार बरा ह्या मूळे लग्नाआधी आम्ही पार्ट्या, मित्रपरिवार ह्यात रमायचो ते प्रमाण खूपच कमी झाले आहे. तिचा स्वच्छतेचा आणि शिस्तीचा बडगा माझ्या सारख्या लाडोबाला बर्‍याच अंशी वठणीवर आणले आहे. ती कोणतीही गोष्ट मला विचारून करते, हे जरा अति होते. पण मी पण असेच वागावे अशी तिची अपेक्षा असते. ह्यामुळे आमच्यात नेहमीच सुसंवाद राहतो. थोडक्यात माझी बायको आणि प्रसंगी कजाग सासूची भूमिका निभावते

आयुष्यात करियर महत्वाचे आहे अन एकेकाळी मी जीवाचे रान करून त्या मागे धावत होतो. माझी पत्नी माझ्या आयुष्यात आली आणि करियर सोबत आपल्या माणसाचा सहवास आणि कौटुंबिक सहजीवन हे त्याच बरोबरीने महत्वाचे हे तीने मला पटवून दिले. ( एका वेस्टर्न संस्कृतीत वाढलेल्या मुलीने मला ह्या गोष्टींचे महत्व समजून सागणे म्हणजे अजब होते.) ह्यामुळे कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य देऊन मला माझ्या शेत्रात जगातील नामवंत पंचतारांकित हॉटेलात सर्वोच्च पदावर काम करायचे आहे." याचबरोबरीने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा आवडता छंद म्हणजे वाचन. अगदी कोणत्याही विषयावर मला वाचायला आवडते. "वाचाल तर वाचाल" हि म्हण लहानपणापासून अंगवळणी पडली आहे. पर्यटन हा आम्हा दोघांचा समान छंद आहे. ह्या निमिताने जगभरातील विविध खाद्य संस्कृतीची ओळख करून घेणे हा उप छंद.

 हल्ली असे म्हणतात कि स्त्री हि पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागली आहे ह्यावर माझे मत असे की "खरे तर हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यावर आताकुठे मान्यतेची मोहर उमटली आहे."
आज माझ्या यशस्वी जीवनाकडे मागे वळून पाहतांना मला असे वाटते कि " थोडा हे थोडे कि जरुरत हे , जिंदगी फिर भी मगर खुबसुरत हे." आयुष्यात कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडत असतांना स्वतः साठी आम्ही दोघंही स्पेस राखून ठेवली आहे. ह्यामुळे आभासी जगतात मला वावरायला आवडते. पण कुठल्याही वैवाहिक पुरुषाप्रमाणे " अहो, ऐकलत का " ह्या हाकेसरशी मी आभासी जगतातून वास्तविक जगतात परत येतो. "जगी सर्वसुखी असा कोण आहे असे रामदास स्वामी उर्फ़ ठोसर साहेब सांगून गेले आहेत. मात्र व्यर्थ मृगजळाच्या पाठी न लागता सुखाची व्याख्या मी प्रशांत म्हणतो त्या प्रमाणे "सुख म्हणजे नक्की काय असते तर काय पुण्य असले कि ते घर बसल्या मिळते" त्यामुळे हे जीवन सुंदर आहे असे चौकट राजमधील गाणे हे माझ्याच जीवनचे गाणे आहे असे मला वाटते.
आभासी जगत माझ्या आयुष्यातील महत्वाचे प्रकरण आहे. येथे परदेशात मराठी ला पार दुरावल्या गेलो होतो. अश्यावेळी पैलतीरा वरून हे आभासी जगत माझ्यासारख्या माहेरवाशांचे हक्कांचे व्यासपीठ आहे. ह्या आभासी जगतात अभिव्यक्त होणे तसेस माहितीचे आदानप्रदान अश्या बर्‍याच गोष्ट माझ्या आयुष्यात घडल्या. आज येथून आमची तुटपुंजी शिल्लक अनिवासी म्हणून भारतात मी गुंतवतो. त्यामुळे मला व्याज आणि सरकारला बहुमोल परकीय चलन मिळते. एकमेका सहाय्य करू ह्या ब्रीद्वाक्यावर माझा विश्वास आहे. स्त्री पुरुष हि संसार रथाची दोन चाके आहेत तेव्हा त्यातील एक जरी चाक निखळले तरी समस्या निर्माण होतील. ह्यामुळे घरातील कामात पुरुषांचा सहभाग महत्वाचा आणि आर्थिक हातभार लावण्यासाठी स्त्रींचे कमावते असणे महत्वाचे. कारण देशाला त्यांच्या अनुभव आणि हुशारीची गरज आहे. आज भविष्यातील पिढीबाबत मी खूप आशावादी आणि पराकोटीचा निराश सुद्धा नाही आहे. मी नव्या पिढीवर आमच्यावेळी असे नव्हते अशी शेलकी विशेषणे कधीच वापरत नाही. पण भविष्यातील तरुण पिढी हि विज्ञान निष्ठ आणि जातीपातींच्या पलीकडे जाऊन विचार करणारी आणि नवीन बदल व सुधारांना चटकन आत्मसात करणारी असो असे मला नेहमीच वाटते.


सध्या इथेच थांबतो
जय हिंद ,जय महाराष्ट ,
आणि जय जर्मनी

२८ टिप्पण्या :

  1. निनाद मस्त वाटल तुमचं जग पाहुन :)
    लिहित रहा आम्हि आहोत दाद द्यायला

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मनापासून धन्यवाद
      आमच्या पंचतारांकीत नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे.
      सध्या विविध विषयांच्या लेखांचे वर्गीकरण कसे करावे (म्हणजे पर्यटन ,राजकारण )
      ह्या विवंचनेत आहे
      ह्या बाबतीत सल्ला हवा आहे.
      . म्हणून लेखांच्या जिलब्या पाडता येत नाही आहे. आभसी जगतात माझे स्फुट लिखाण चौफेर विखुरले आहे. ते माझ्या नगरीत हळूहळू समाविष्ट करणार आहे.

      हटवा
  2. छान सुरवात केलीस मित्रा.. keep it up..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमची दिलखुलास प्रतिक्रिया वाचून मला लगेच गाणे आठवले
      तुम अगर साथ देने का वादा करो. मे युंही मस्त नगमे ( लेखांच्या जिलब्या ) पाडता रहू.

      हटवा
  3. अनघा कशी आहेस.
    ह्या ब्लॉग च्या निमितान्ने इतक्या महिन्यानंतर आपण ह्या आभासी जगतात भेटतोय.
    आम्ही म्युनिक मध्ये येऊन आता वर्ष झाले. जून मध्ये विएना आणि पेरीस अशी भटकंती करणार आहोत. आणि काही दिवस कार्लकुए ला मुक्काम आहे.
    बेत करून नक्की भेटूया.

    उत्तर द्याहटवा
  4. आपल्याला पुढील लिखाणासाठी पंचतारांकित शुभेच्छा

    डी पी
    मी डोंबिवली कर

    उत्तर द्याहटवा
  5. डोंबिवलीकर असा अकस्मात भेटला की खूप बरे वाटते.
    दत्त नगर म्हणजे तुम्ही पूर्वेचे राहणारे
    कुठे असता आपण फेस बुक वर भेटूया.

    उत्तर द्याहटवा
  6. वा मस्तच.. खरीखुरी पंचतारांकित ओळख करून दिलीत राजे :)

    पुढील लेखनास शुभेच्छा !

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद हेरंभ
    मुंबईची हवा लागल्याने मा वी स सारख्या संघटनेत तुझ्यासोबत शाळेसाठी काहीच करता आले नाही ह्यांची खंत वाटते.
    पण ह्या आभासी जगताच्या निमित्ताने का होईना राणाप्रताप मधील दोन माजी विद्यार्थी ब्लॉगिंग विश्वात आपले प्रताप दाखवितांना एकमेकास भेटले.
    हि भेट दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो .
    अगदी जशी स्विस बँकेत भारतातून कृष्ण धन
    जमा होते तशी

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान निनाद... परदेशात जाऊनच मराठी ची खरी ओढ निर्माण हे तू सिद्ध केलस...

    उत्तर द्याहटवा
  9. निनाद छान वाटले तुझ्याविषयी वाचुन....तुझे आंतरजाळावरील मराठी साईट्ला असलेले महत्व वाचुन मन भरुन आले. खुप छान लिहले आहेस तु. तुला आणि तुझ्या सहचारिनीला पुढील आयुष्यातील भटकंतीसाठी खुप-खुप शुभेच्छा!!!......यदु.

    उत्तर द्याहटवा
  10. धन्यवाद यदु
    तुझे माझ्या पंचतारांकित नगरीत
    मन पूर्वक स्वागत

    उत्तर द्याहटवा
  11. ur email id plz give me

    marathi wruttapatrat swatahache wegale sthan nirman kelelya "daily sakal" madhe
    navya warshapasun he sadar suru karat aahot .

    सोमवार : मुक्काम पोस्ट फॉरेन
    विदेशात जाऊन नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. विदेशात राहणाऱ्यांबद्दल देशातही आकर्षण असते. जॉब कसा मिळाला ? विदेशात विविध पातळ्यांवर कसा स्ट्रगल करावा लागतो?. खाण्यापिण्याच्या सुविधांशी कसे जुळवून घेतले. घर, कार्यालय, धर्म,संस्कृती, समाज, सणसमारंभ तसेच मित्रमैत्रीणी याबाबतचे विदेशातील अनुभव काय आहेत ? परदेशात राहताना व काम करताना मायभूमीबद्दल काय भावना असतात? हे आणि असच खूप काही सांगणार


    ya padhaticha kahi dewoo shakat asal tar plz sanga,,,

    उत्तर द्याहटवा
  12. आपण जे खरडतो त्याला वाचकांनी प्रतिसादाची मोहर उमटवली कि ते लेखन होते ....मस्त..!
    I like your blog.

    उत्तर द्याहटवा
  13. संदीप तुमचे पंचतारांकित नगरीत मनपूर्वक स्वागत.
    माझ्या खरडण्याला आपण प्रतिसादाची मोहर उमटवून त्यास लेखनाचा दर्जा प्राप्त करून दिला त्याबद्दल आभार.

    उत्तर द्याहटवा
  14. आवड्या. मस्तच लिहिले आहे. तुमच्या लेखनास शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  15. कलंदर
    तुमचे ह्या पंचताराकित नगरीत स्वागत
    आणि प्रतिसादाच्या रूपाने तुम्ही जी आपुलकी दाखवली ,त्याच्या साठी विशेष धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  16. मस्तच तुझी पंचतारांकित ओळख आवडली .... छान तुझ्या पंचतारांकित लिखाणाच शुभेच्छा !!!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद

      हटवा
    2. sundar lekh,aapli purvajanmichee punyaai khupach asavee (aapan manat asal tar )mhanunach aaplyaala westrn culture madhe suddha asa jodidar milaala,asech lekhan chalude ya shubhechha.

      हटवा
    3. धन्यवाद अनिरुद्ध
      मला जमेल तसे काहीबाही खरडत जाईल .
      आपला लोभ असाच असू दे

      हटवा
  17. तुझ्या नियमित "Followers" मध्ये आणि एकाची भर पडली. दोन-अडीच वर्षांनी का होईना "पंचतारांकित" माझ्या वाचनात आले याचा मला खूप आनंद वाटतो.

    उत्तर द्याहटवा
  18. वामनजी तुमचे ह्या पंचतारांकित नगरीत स्वागत, माझ्या तर्फे सातत्याने लेखन करण्याचा माझा प्रयत्न राहील.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips