हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

दामिनी आणि दामिनी

काय  विचित्र योगायोग आहे
फार पूर्वी दामिनी नावाचा मीनाक्षी व ऋषी व सनी चा सिनेमा आला होता ,
दिल्लीच्या बड्या घरात एक मध्यमवर्गीय मुलगी सून म्हणून जाते व तेथे होळीच्या दिवशी घरातील मोलकरणीवर झालेल्या बलात्काराविरूढ एकटी उभी ठाकते व शेवटी तिला न्याय मिळतो. राजकुमार संतोषी ह्या द्रष्ट्या दिग्दर्शकाने  दिल्ली मधील परिस्थितीचा आढावा घेत फार पूर्वी दिल्लीत होणारा बलात्कार व त्या तरुणीस न्याय मिळवून देण्यासाठी दामिनी नावांच्या मध्यमवर्गीय मुलीची संघर्षगाथा ह्या सिनेमातून मांडली, सिनेमा यशस्वी झाला मात्र वास्तविक जीवनातील  परिस्थिती अजिबात बदलली नाही.
ह्या सिनेमांच्या अनेक वर्षानंतर दिल्ली मध्ये दामिनी नावाच्या मुलीवर बस मध्ये बलात्कार होतो , आणि तिचा त्यात मृत्यू सुद्धा होतो ,
तिला न्याय मिळणार का

का तारीख पे तारीख मिळणार
पण इन्साफ नाही मिळणार
आज सनी देओल च्या भूमिकेत दामिनीच्या बाजूने सारी भारतीय जनता आहे , तर अनेक राजीकीय नेते चड्डा वकिलाची भूमिका प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या निभावत आहेत. दामिनीला सिंगापूर ला नेण्यामागे वैद्यकीय कमी आणि राजकीय गरज जास्त होती असे अनुमान अनेक वैद्यकीय तज्ञांच्या तिच्या सिंगापूर ला नेण्यामागील निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने काढले जात आहे.
आज नही तो कभी नही ह्याच आवेशात आपण सर्वांनी जमेल तसे दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे,. जनतेचा ढाई किलोचा हात ह्या नादान राज्यकर्त्यांवर पडला तर त्यांचे काय होईल ह्यांची चिंता त्यांनी वेळीच करावी असे मला वाटते.
आज दामीनीचा मित्र ह्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तेव्हा आरोपींवर खुनाचा खटला चालवून त्यांना देहांत शासन द्यावे व बलात्कार कायद्यासंबंधी सुधारणा करावी ह्याने राज्यकर्त्यांची थोडीशी का होईना पण पत वाचेल.
 
  आगरकरांचे मला पटायला लागले
माझ्या मते
जो पर्यंत समाजातील अनिष्ट रूढी ,प्रथा व सर्वात महत्त्वाचे पुरुष प्रधान संस्कृती
नष्ट होत नाही शिक्षणाचा प्रसार होणार नाही. जाती पातीचे राजकारण होणार नाही. तो पर्यंत समाज खर्या अर्थाने सुसंस्कृत होणार नाही
आणि बलात्कारांच्या घटना घडणार नाहीत.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण समाजातील अनेक घटकांना विशेतः महिलांना मात्र ते भारतात पूर्णतः कधीच मिळाले नाही.
आभासी जगतात निषेध नोंदवून एखाद्या मुद्दयावर ह्याच जगतात चळवळ करून तो मुद्दा जगभर पोहोचवला तर धर्मसंस्था व सरकारला झुकावे लागते हे आयर्लंडच्या
मुद्द्यावरून सिद्ध झाले आहे. तेव्हा ही प्रतिमा
आजच्या दिवस तरी तुमच्या फेसबुक प्रोफाईल फोटो वर चिटकवून ह्या मुद्द्याला जगासमोर आणा ही नम्र विनंती.
 
समाज सुसंस्कृत नसला तर मग त्यांना बनवणारे गोरा साहेब असो किंवा काळा काहीच फरक पडत नाही. विकास न होता रायबरेली मधील जनता गांधी घराण्याला निवडून देते तेव्हा स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ भारतात कितीजणांना समजला आहे ह्याचे नवल वाटते. स्वतंत्र विचार करायचे , महिलांना मानाने जगायचे जर समाजात स्वातंत्र्य नसेल तर गोरा साहेब काय वाईट होता.

भारतात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी राजे राजवाडे , संस्थानिक ह्यांची एकनिष्ठ जनता होती.
आपल्या राजाविषयी जग काय म्हणते त्याचे आपल्याप्रती वर्तन कसे आहे व त्याचे ह्याची अजिबात तमा न बाळगता त्यावर जीवापाड प्रेम करणे ही आंधळी भक्ती होती.
आजही विकास न होता जेव्हा हे खादीधारी संस्थानिक निवडणुकीच्या निमित्तानेच फक्त जनतेला तोंड दाखवतात क्वचित एका लहान मुलाला कडेवर घेतात. आणि जनता त्यांना भरभरून मत देते . आपल्या शेजारच्या राज्यात आपल्या खासदाराला मिळतात तेवढेच पैसे कोण्या एका मतदार संघातील खासदाराला मिळतात तरीही तेथील जनता आपल्या परी बरीच सुखात आहे मग आपण काय पाप केले आहे असा प्रश्न पडत नाही ,
जर भोळ्या भाबड्या जनतेला वैचारिक स्वातंत्र्य नाही ,

मला स्वातंत्र्य म्हणजे विकास असे म्हणायचे नाही आहे मात्र वैचारिक स्वातंत्र्य नसेल .
तर सध्या जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात घराणे शाही असलेले बहुसंख्य पक्ष व राजनेते आहेत ही लोकशाही ची क्रूर चेष्टा आहे.
ह्यात लोकशाहीला अपेक्षित लोकांचे राज्य कुठेच दिसून येत नाही व राजकारण्यांनी काहीही निर्णय घेतला तरी जनता तो निमुटपणे मानते.
जसे पूर्वी राजाचा मानायचे.
आपण आपले विचार मांडतो आभासी जगतात म्हणून आपण स्वतंत्र आहोत ही फुशारकी मारायची आणि प्रत्यक्षात काहीही बदल होणार नाही हे वास्तव स्वीकारून
जगायचे आणि आयर्लंड मध्ये धर्म संस्था व सरकारच्या विरोधात काही स्वयंसेवी संस्था आंदोलन करत होत्या तर ते परकीय पैशावर आहे का नाही ह्याचा ऊहापोह न करता तेथील सरकारला अनेक वर्षांचा कायदा बदलावा लागत आहे ज्याला धर्माची किनार आहे.
व्यापार्र्यानी चालवलेल्या व्यापारासाठी मोठा व्यापार ही लोकशाहीची नवी व्याख्या आहे.
अश्या परिस्थितीस लोकशाहीत दररोज नवे घोटाळे पहिले की साहेब लुटत होता तेव्हा सुद्धा विशिष्ट गटांचा भारतात उन्नती होत होती व आजही तेच होत आहे ,तेव्हा स्वातंत्र्य मिळून फायदा काय असे मला वाटले.


 
दामीनीचा अर्थ वीज
आज बलात्कारित पीडित तरुणी स्वर्गवासी झाली.
पण आकाशातूनच वीज बरसते.
हे दिल्ली मधील नादान राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.
अजून काहीनाही तरी निदान २०१४ ला ज्या जनतेसमोर मतांची भिक मागायची आहे त्यांचा विचार करा नाहीतर ही दामिनी तुमच्यावर अशी बरसेल की तुमच्या राजकीय कारकीर्दीचा जळून कोळसा होईल.

८ टिप्पण्या :

 1. राजकारण्यांची झेप स्वतःची तुंबडी अन खुर्ची ह्या पलीकडे नाही. त्यातही बरेचसे मंत्री संत्री तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा असव्यात?
  अजून तर निरो ने ह्या विषयावर आपला बिगुल वाजवला नाहीये.
  पण दुसर्या 'मुर्ख ' अर्जी ने आपली विद्वत्तेचे वाभाडे आपल्याच 'मुखा'ने काढलेले आहेत. विशेष म्हणजे त्या कुटुंबाचा नायक हा आपल्या देशाचा पती? त्याने आपल्या मुलांवर कमीत कमी क्या संस्कार केले असावेत असे वाटते?
  एका दामिनीला न्याय मिळायला एव्हढी धडपड करावी लागतेय, देशभरात कितीतरी दामिनींचे दमन होत आहे, प्रसिद्ध झालेली आकडेवारी -ती पण official - बघितली कि डोळे फिरतात, खऱ्या अप्रसिद्ध किंवा पुढे न आलेल्या केसेस किती तरी पट असतील?
  पुन्हा एकदा तेच , एका दामिनीला न्याय मिळून हे थांबणार नाहीये. पण संपूर्ण पोलीसव्यवस्था, न्यायव्यवस्था हि effective व्हायला हवी.
  तसेही आपली जगातली सर्वात मोठी लोकशाही हे खोटे आहे कारण कुठल्याच प्रक्रियेत लोकशाहीचा अंश दिसत नाही, तर ठोकशाही आणि गेन्डे शाही, भ्रष्टाशाही सर्वत्र दिसतेय.
  मला वाटते सर्वात मोठी लोकसंख्या असलेली अधोगातीशाही आहे आपली.
  खूप मोठे काम आहे, एका दिवसात किंवा वर्षात होणार नाहीये. प्रगतीचे सोडाच, फक्त अधोगती थांबवण्यासाठी बराच काल झटावे लागणार आहे.

  उत्तर द्याहटवा
 2. प्रगतीचे सोडाच, फक्त अधोगती थांबवण्यासाठी बराच काल झटावे लागणार आहे.
  वा काय बोललास राव
  खूप दिवसांनी तुझे पंचतारांकित नगरीत येणे झाले ,
  पण आल्यावर तुझा प्रतिसाद वाचून बरे वाटले.
  भारत एक भावी महासत्ता आणि ओबामा च्या म्हणण्यानुसार तर तो आताच महासत्ता तेही जागतिक झाला आहे,
  अश्या मूर्खाच्या नंदनवनात राहणाऱ्यांना तुझे वाक्य वाचायला दिले पाहिजे.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मित्र निनादा,

   योग्य निरीक्षण.! माझा जरा vorübergehend संन्यास होता खरा. पण हळूहळू परततोय.

   पण पुनरागमनानंतर आल्या आल्या काय केले असेल तर तुझ्या पंचतारांकित मध्ये चौफेर सिंहावलोकन केले. तशी तू बरीच मजल मारलीये. आणि मला तर तुझ्या लेखामधला 'मी माझा' पण खुप आवडतो.

   असो, माझ्यावर नकारात्मक विचारसरणीचा ठपका ठेवण्याआधी, सांगू इच्छितो कि हे फक्त आपल्या मित्रांमध्येच विचार मांडतो. तसा मी पण कट्टर भारतीयाच कि.

   पण वास्तविक पाहता माझ्या भारताबद्दल मी पण वाजवीपेक्षा पेक्षा खूपच ज्यास्त अभिमानी आहे. आणि देशाबद्दल म्हणशील तर भारत एक महान देश होता ह्याबद्दल दुमतच नाहीये. अगदी, ख्रिस्तपूर्व काळापासून खूपच भरभराट. आणि त्याचे पुरावे सर्व जगभर आहेतच. त्याबद्दल मी वेळ आली होती तेव्हा, पोटतिडकीने अमेरिकन किंवा, इटालियन बरोबर वादविवादात अगदी सर्वमान्य उदाहरणे देवून जिंकलो सुद्धा आहे.

   पण आतमध्ये मी हे सत्य जाणून आहे कि.
   तो काळ वेगळा होता

   तो काळ म्हणजे अगदी दहा हजार वर्षापासून तर अगदी आता आता स्वातंत्र्य मिळेस्तोवर.

   ती लोके वेगळी होती
   वेगळी म्हणजे काय तर ती माणसे होती.देवत्वासमान. पण ती आपली पूर्वज होती. त्यांच्या जीवावर आम्ही जगतोय. त्यांचा कमावलेला इतिहास सांगून, माझा देश महान आहे सांगत असतो. पण मान्य करत नाही कि माझा देश महान होता आणि आता नाहीये. स्वप्नरंजन दुसरे काय?

   आता काय काही मनुक्ष आणि बाकी सगळी जनावरे.

   प्राण्यात, वाघ अथवा सिंह भूकेव्यतिरिक्त शिकार करत नाही.
   इथे तर ७०० पिढ्या जगतील एव्हढी संपत्ती फक्त पाच वर्षात प्रत्येकाला गोळा करायची घाई असते.

   आता तर देशाची सीमा हि पुसत झाल्यात आणि कुणीही उठतो तो हा भूभाग माझा म्हणतो. सियाचीन असो कि काश्मीर चा विशालकाय भाग
   किंवा पुण्यातले असो कि मुंबईतले, 'भू'चा 'श्री' खंड स्वाहा करून केंव्हा ढेकर देवून आहा करतील ह्याचा पत्ताच लागत नाही.

   तशी मला आणखी एक शोध लागलाय. आपल्या लोकांच्या DNA चा अभ्यास केल्यावर त्याना एक वेगळा सहाव्या नंबरचा जीन्स बर्याच लोकांमध्ये दिसून आला. आणि त्या जीन्सला शंध असे नाव आहे.

   एकंदरीत बलात्कार, भ्रष्टाचार ह्यापेक्षाही खूपच मोठी समस्या आहे कि आपण
   आपण संस्कृती विसरत वाटचाल करीत आहोत. माणुसकी हरवत चाललोय.

   सुशिक्षित पण असंस्कृत.

   पण प्रत्येकाने जागर केलाच हवा, आणि त्यासाठीच तर तुझे अभिनंदन. एक चांगली आणि उदात विचारसरणी पेरत , प्रसारित करत तू इमाने इतबारे चालत आहेस आणि हे कार्य करत रहावास हीच शुभेच्छा.

   हटवा
 3. पराग अगदी सडेतोड लिखाणाद्वारे तुझे मनोगत मांडले आहे.
  प्राचीन भव्य इतिहास व पूर्वजांनी उभारलेली शिल्पे त्यांचा वारसा व परंपरा हे परदेशी पर्यटक पाहायला भारतात येतात.
  मात्र सध्याच्या काळात मुल्यशिक्षण आपल्याला बालपणापासून शिकवले गेले नाही, म्हणूनच असंस्कृत जगणे आपण जगलो.
  मी स्वतःला उल्लेख ह्यासाठी केला की भारतात असतांना रांग न लावणे , जमेल तेव्हा कायदा मोडणे म्हणजे सिग्नल तोडणे. इत्यादी ..
  राजस्थान दौरा मी केट व तिच्या बहिणी बरोबर केला तेव्हा लोकांच्या नजरा त्या दोघींना खुपल्या माझी मन शरमेने खाली गेली,

  परदेशी युवतींवर देशभरात बलात्कार हे उत्तर भारतात जास्त होतात हे नेट वाचले होते , एका अनामिक दडपण उरी बाळगून मी हा दौरा पार पाडला

  उत्तर द्याहटवा
 4. का तारीख पे तारीख मिळणार
  पण इन्साफ नाही मिळणार ....

  या प्रश्नाचे उत्तर खरे तर सगळ्यांनाच माहित आहे. :(

  आजच पेपरमधे वाचले की त्याच बसखाली चिरडून मारण्याचाच प्लान होता... :( :(

  उत्तर द्याहटवा
 5. भानसा आपले पंचतारांकित नगरीत मनापासून स्वागत
  दामिनीची केस जशी कोर्टात दाखल होईल तेव्हा अजून अनके सत्य बाहेर येतील.
  दिल्लीत मुलींवर बलपूर्वक अत्यचार करण्याची संस्कृती आहे.
  मला सगळ्यात जास्त राग ह्या गोष्टींचा आला कि हे आरोपी काही बड्या बापांची धेंडे नाही ,
  पण आपण बलात्कार करून निसटून जाऊ ही धारणा मनात ठेवून त्यांनी हे कृत्य केले ह्यात लैंगिक वासना शमाविण्यापेक्षा तिला ज्या प्रकारे इजा झाली ते पाहता विकृती जास्त दिसून आली. ह्यातून कायदा व सुव्यव्स्थेबाबत त्यांना अजिबात फिकीर नसल्याचे दिसून येते.

  दिल्ली व भारतातील इतर महानगरातील तरुणाई ह्यासाठी रत्यावर आली.
  दहशतवाद परवडला त्यात पाकिस्तानला नावे तरी ठेवता येतात, पण असे प्रकार ज्यात आपल्या अवती भवति च्या मंडळी अचानक अशी कृत्य करतात तेव्हा दोष कोणाला द्यावा हा प्रश्न पडतो.

  उत्तर द्याहटवा
 6. ekdum mast likahn ha vishay ekdum uttam nivadla ahe

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips