हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, २ मार्च, २०१७

शिवा , दिल्लीकर महाविद्यालयीन तरुणाई , गुरमीत ते मोहनदास

.लहानपणी शिवा पहिला , नागार्जुन सारखी सायकली चेन काढण्याचा निष्पळ प्रयत्न करून पहिला पण जमले नाही.

कॉलेजात अभाविप व भावीस ह्या हि युती पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा राडा पहिला , त्यात सहभागी होतो , पुढे मुंबईत सर्व विद्यार्थ्यांवर अनंत उपकार करणारा निर्णय झाला , महाविद्यालयीन निवडणुकांच्यावेळी वर बंदी घातल्या गेली.त्यामुळे विद्यार्थी संघटनांचे  कॉलेजात लक्ष दारुड्या बाबतचे आपल्या कुटुंबाकडे जेवढे असते तेवढेच राहिल्या लागले.
जागतिकीकरणाचे युग आले , संधीची अनेक कवाडे विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली.
पालकांकडे थोडा बहुत पैका आला , विद्यार्थ्यांना चंगळवाद  आणि करियर  ह्यांच्यात समतोल ठेवत पैलतीर खुणावू लागला ,साता समुद्रापार  वसती करण्याचे मनी  ठसले.
आता मुंबई करांना  कॉलेज म्हटले कि आठवते पुरानी जीन्स
कॉलेज म्हटले कि आठवते दुनियादारी
कॉलेज म्हटले कि आठवते तनहा दिल ,तनहा सफर
असे भाग्य दिल्लीकर महाविद्यालयीन तरुणाईच्या वाट्याला सुद्धा येवो.

 त्यांच्या युनिव्हर्सिटी मध्ये डाव्यांचे  अड्डे आहेत
डाव्यांच्या विचारसरणी मानतो असे म्हटले कि आपसूकच अंगावर बुद्धिजीवी पुटे चढतात
लखू रिसबूड ला चष्मा लागला आणि तो बुद्धिजीवी झाला तसे अनेक उच्चं शिक्षित लोकांना पोथीवाद सांगण्यापुरता का होईना स्वीकारावा लागतो
ह्या पोथ्यांमधील तत्वे प्रत्यक्ष समाजात कोणत्याही कालखंडात कोणत्याही राष्ट्रांच्या मध्ये यशस्वी राबविता आली नाही
ती भविष्यात कुठे राबविली जातील ह्याची शाश्वती नाही
अश्यावेळी एकेकाळी आपल्या लोकांनी पुष्पक विमान बांधले तेव्हा आपल्याला विमान बांधता येत होते हे सांगणे जेवढे अतिरंजित व कपोलकल्पित वाटते तेवढाच हा पोथी वाद वाटतो ,
क्रूर हत्या , मानवी मूल्यांची परवड , एकाधिकारशाही , आणि समाजाचे दमन
ह्या तत्त्वावर कम्युनिस्ट जगतात.  रशिया व चीनमधील जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांचे मानवाधिकार ह्याबद्दल बोलणे खुंटले ,
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी दोन भागात विभागाला.
भांडवलदारांच्या वेस्ट जर्मनीचे वैभव पहा आणि पूर्व जर्मनीची पूर्वी होती टी हालत पहिली कि मिडास राजाच्या विपरीत ह्या लाल सलाम वाल्यांची करणी आहे ह्यांचा हात लागला कि झाली माती .
रशिया दुभंगला  आणि त्यांच्या मुली दुबई च्या बाजारात आल्या
अलीकडे त्या गोव्याला विसावल्या आहेत
हे पाहून मार्क कबरीतून धन्य झाला असेल.
आज कम्युनिस्ट मगर मिठीतून  निसटून भांडवलदारांच्या इयू  संघटनेच्या कळपात  शिरलेले
पूर्व युरोपियन नागरिक मला जर्मनांची भेटतात , कम्युनिस्टांनी देशाचे समाजाचे कसे नुकसान केले आता त्यांना कसा मोकळा श्वास घेता येतो ह्या बद्दल कळते.
हे दिल्लीचे विद्यार्थी युनिव्हर्सिटी मध्ये सरकारी पैशावर नक्की काय करतात.
अभ्यास कधी करतात.
भारतात धर्मांध लोकांच्या पेक्ष्या  कम्युनिस्ट विचारसरणी  चा धोका अधिक आहे.
ही विषवल्ली मुळापासून उखडली गेली पाहिजे.
भारतीय नागरिकांची गंमत वाटते
प्रसार माध्यमांच्या एवढ्या आहारी केले आहेत कि  दिल्ली मध्ये उजव्या व डाव्या विद्यार्थी संघटनेच्या मध्ये राडे झाले तर त्याबद्दल एवढी चर्चा केली जात आहे
आणि तेथे केरळ मध्ये डाव्या आणि उजव्या संघटना एकमेकांच्या नेत्यांचे खुलेआम मुडदे पाडत  आहेत , संघाच्या ८ नेत्यांची हत्या केरळात झाली , त्याला प्रत्युत्तर देण्यात आले
, नुकतंच केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा फतवा निघाला , आणि त्यावर मात्र कुणीच काहीही बोलत नाही आहे
हे म्हंजे डोनाल्ड ने ७ मुस्लिम देशांचा व्हिसा रद्द केला तर प्रसार माध्यमांनी पर्यायाने त्यांच्या आहारी गेलेल्या लोकांनी शिमगा सोशल मीडियावर साजरा केला
मात्र ओबामा काळात ह्या ७ देशांच्या वर बुश कारकिर्दीत झाले तसे बॉंब हल्ले झाले , माणसे मेली , निर्वासित झाली त्यावेळी ही सोशल मीडिया वरील जनता रियल्टी शोज आणि डेली सोपं मध्ये रमली होती
गुरमीत  कौर हिच्या वडिलांना पाकिस्तान व युध्दाने नाही तर दहशतवादाने मारले तेही मुस्लिम दहशतवादाने
आणि तो संपविला शिवाय चर्चा नाही हे भारताचे धोरण आहे
अवांतर
सध्या दिल्ली मध्ये जे घडले त्यात मी ह्याला खूप मिस केला
तूर्तास एवढेच
अतिअवांतर
इन्फोसिस चे माजी जेष्ठ कर्मचारी मोहनदास  पै ह्यांनी दिल्ली प्रकरणावर जो लेख लिहिला आहे व त्यात प्रसार मध्यमानावर जे ताशेरे ओढले आहेत ते  वाचण्यासारखे आहे.
एन डी टीव्ही ला झक  मारत तो लेख छापावा लागला.

५ टिप्पण्या :

 1. कम्युनिस्ट अजून कळळे nahiyet lokana

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद, अनामित आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
   लाल सलाम वाल्या लाल भाईंच्या मुळे भारताचे जेवढे नुकसान झाले तेवढे तर२०० वर्षाच्या राजवटीत इंग्रजांच्या झाले नव्हते.हे माझी केजीबी हेर जो पुढे अमेरिकेत स्थायिक झाला त्याने अमेरिकन प्रशासनाला दिलेल्या केजीबी च्या ब्रिफ मधू कळून येते ,सदर हेर युरी हा भारतात अनेक वर्ष काम करीत असल्यामुळे त्याच्या कडून भारतातील केजीबीच्या कारवाईवर सचित्र प्रकाशझोत पडतो.https://www.youtube.com/watch?v=VDwibIy-3QM

   https://www.youtube.com/watch?v=KoqRbmL1Glw


   https://www.youtube.com/watch?v=y3qkf3bajd4

   हटवा
 2. निनाद, आपल्या ब्लॉगमधील सर्व लेख वाचले, खूप आवडले. बरिचशी नविन माहिती मिळाली ती सुध्दा मस्त मराठीमधून !
  धन्यवाद. शक्य असेल तर जर्मनीतील इतर शहरांची पण माहिती लिहा, आणीअसेच छान लेख पुढे सुद्धा यावेत हिच सदीच्छा !

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. उशिरा प्रतिसादासाठी क्षमस्व मनोज
   माझा नक्कीच तास प्रयत्न राहील

   हटवा
 3. Seriously, that story germane to Diet Pills is a cautionary tale. It is a major influence on me. I, passionately, have to appreciate Weight Loss Gummies. Do you have to look conniving? Obviously, all roads lead to Diet Pills. I am flabbergasted by their legendary Keto Diet. It was rewarding or that ought to be as bright as day to you now. You may need to do your own research to discover the answer.

  https://www.offerplox.com/weight-loss/active-keto-capsules/

  https://www.offerplox.com/cbd-products/earthmed-cbd-gummies/
  https://www.offerplox.com/wellness/glucotrust-reviews/
  https://www.offerplox.com/weight-loss/slimming-gummies/
  https://www.offerplox.com/weight-loss/livpure-reviews/
  https://www.offerplox.com/lifestyle/billionaire-brain-wave-program/

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips