हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

प्रजासत्ताक दिन माझे मनोगत (माझ्या बालपणीचा भारताचा ते इंडियाचा प्रवास ))

इंग्रजांच्या काळात सर्वाना शिक्षणाची समान संधी व अश्या अनेक गोष्टी भारतीय समाजात नव्या होत्या (ह्या त्यांनी अर्थातच स्वताचा राज्यकारभार सोयीने व्हावा म्हणून केल्या )पण .भारता स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी भारतीय जनतेपैकी किती लोक साक्षर होती ?
साक्षर लोकांमधील किती लोक प्रगल्भ होती? .म्हणजे स्त्री पुरुष समानता .आदि मुद्यात .
देश स्वतंत्र झाला तेव्हा सत्ताधारी पक्षाला प्रबळ विरोधक नव्हते .हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नव्हते .युके मध्ये हुजूर मजूर तर अमेरिकेत रिपब्लिक व डेमोक्रेटिक असा प्रकार भारतात अनेक दशके नव्हता
.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या डोक्यात सत्तेचा कैफ गेला .शीण विरोधी पक्ष लोकांमध्ये लोकप्रिय न होता विविध लेबेले सत्ताधारी पक्षाकडून स्वीकारून जनतेपासून नि सत्तेपासून लांब असायचा
दूरदर्शन चे एककलमी कार्यक्रम (कोणी मेले कि ७ दिवस सुतकी चेहेर्याचे सतारवादन ) हे त्यांच्या निरस नि निसत्वतेचे मासलेवाईक उदाहरण .

लोकसंख्येचा स्फोट व त्यामानाने न वाढलेला रोजगार ,पहिल्या .हरित क्रांतीनंतर ठप्प पडलेला शेती व्यवसाय पर्यायाने अन्न धान्यांच्या कमी उत्पादनाने वाढती महागाई (त्यात काळाबाजार करणारे आले )अडाणी जनतेला नवे खादीधारी संस्थानिक लाभले. ज्यांची पिढ्यानपिढ्या चाकरी करणे व भावनिक मुद्याला भूलणे ह्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता .

गावातून शहराकडे लोकांचा वाढते प्रमाण वाढले (त्या प्रमाणात शहर नियोजन हा प्रकार गोर्या साहेबांकडून न शिकल्यामुळे काळ्या साहेबांनी मुंबई सारख्या शहराची लक्तरे होऊ दिली .तिला धारावीचा मुकुट मणी चढवला .आशियातील सर्वात भव्य दिव्या असे गोरगरीबांसाठी करमुक्त संकुल अशी व्याख्या बनली .)
भारतात तुरळक अपवाद वगळता नवीन शहरे नव्या शतकातील संकल्पनेनुसार बनली नाहीत .मोहोन्द्जाडो चे बांधकाम पाहून थक्क होणारे जग त्यांच्या वंशजांकडून भकास शहर निर्मितीचे प्रकल्प पाहून अधिकच थक्क होत होते .
७० ८० च्या दशकात परिस्थितीने मुल्ये व आदर्श ह्यांची धूळधाण उडवली .रोटी कपडा मकान मधील नायक आपली पदवीचा चिटोरा उद्वेगाने फेकून देतो. हे दृश्य त्याकाळातील बेरोजगार आणि असंतुष्ट तरुणाचे प्रातनिधिक वर्णन आहे. .तर एकेकाळी महिनाभर वसंत उत्सव साजरा करणाऱ्या भारतीयांचा वंशज ह्या काळात रोटी कपडा मकान ह्या साध्या मुलभूत गरजासाठी तारुण्य खर्ची करत होता .तारुण्याची आहुती देऊन (तेरी दो टकेकी नोकरी / मेरा लाखोका सावन जाये .) पोटासाठी वणवण करत होता. काय विरोधाभास आहे नाही .
जागतीकरण ९० च्या दशकात आले .उच्च मध्यमवर्ग झपाट्याने निर्माण झाला .पण तळागाळातील जनतेला फार्म विले अजून माहित नाही .कारण भारनियमन हे त्यांच्या एकूण जगण्यावर विकासावर लागू झाले ..
शहर व गावातील जनतेतील दुरी वाढत गेली (दे धक्का मधील मक्याचा स्पर्ध्धेच्या शेवटी असलेला संवाद सर्व काही सांगून जातो .) टिंग्या ह्या सिनेमाची गोष्ट भारत नावाच्या खेड्यांच्या राष्ट्रात घडली असे शहरातील
इंडियात राहणाऱ्या मुलांना वाटू लागले .तर नवल ते काय .
शिक्षण शेत्रात नवीन बदल नव्या काळानुसार करणे अशुभ मानले गेले .इंग्रजांच्या काळात नोबेल मिळवणारे भारतीय स्वतंत्र भारतात नोबेल का नाही ? ब्रेन डेन का झाले? मुलभूत संशोधनाकडे न वळता विद्यार्थी वर्षभर घोका नि परीक्षेत ओका ह्या प्रणालीचा गुलाम झाला..त्याचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन का बदलला अश्या शुल्लक प्रश्नाकडे ना सरकारला स्वारस्य आहे ना जनतेला .कला /वाणिज्य /विज्ञान ह्या शाखांकडे अनुक्रमे ओढा असणारे मध्यमवर्गीय ३ पिढ्यांचा प्रवास हा पोट भरण्यापुरता होता
.शिक्षणाचा उद्देश पुरवू सुशिक्षित आणि सुसंस्कुत होणे असा होता..स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा उपयोग नोकरी ह्या एकमेव ध्येयासाठी झाला .त्याने शिक्षणाचा बाजार मांडल्या गेला .गुरु पौर्णिमा हा सण मराठी शाळापुरता व शाळेपुरताच मर्यादित राहिला .
सीमेवरील युद्ध सामान्य जनतेपर्यत पोहचले .ते दहशतवादाच्या रुपात .
सीमेपलीकडील लाल भाई विलक्षण वेगाने प्रगती करत भारताच्या सीमावादावर दुराग्रही भूमिका घेत आहेत.पाक बांधव आपल्या देशाची लोकसंख्या कमी व्हावी म्ह्णून हरप्रकारे उपाययोजना आखत आहेत..
नेपाळ व म्यानमार ला लाल तर बांगलादेश ला हिरवा तर श्रीलंकेला दोघाचाही वेढा पडला आहे .त्यामुळे प्रत्केक सीमेवर रात्र वैर्याची आहे .
भारताची सजलेली नटलेली बाजारपेठ प्रगत जगाला उपभोगला हवी आहे. त्यांना अचानक भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
.
अश्यावेळी प्रजासत्ताक दिनी सचिनला भारत रत्न न मिळाल्याची बातमी वाचली .
कायदा राबवणारे लोकप्रतिनिधी ह्यांचे जिंवत पाणी दहन वाचले . पुरोगामी होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात निवडणुका विकासाचे मुद्दे वगळता ,जात धर्म आणि कोणत्या मतदार संघात कोणत्या जातीचे ,पंथाचे ,धर्माचे वर्चस्व आहे ह्यावरून लढल्या जात आहेत?
आरक्षण आणि पुतळ्याचे राजकारण म्हणजे उभारणे आणि तोडणे जोरात चालू आहे.
सहज तू नळीवर "उषाकाल होता होता" लावले.
.
समूह गीताच्या पाश्व भूमीवर वेडा झालेला अगतिक निळू फुलेंचा पत्रक्रार पहिला .
माझी तशी अवस्था होऊ नये म्हणून उपभोग्य संस्कुतीत मग्न होण्यासाठी म्युनिकच्या रात्रीच्या मोहक नगरीत भटकती केली .
आता हा लेख टंकताना रात के हम सफर ....
तू नळीवर पहात शयन कशाकडे चाललो आहे .
( सदर लेख हा ३ वर्षापूर्वी टंकला होता. आता परीस्थित फारसा बदल झाला नाही आहे. आणि होईल अशी भाबडी आशा सुद्धा नाही आहे.
कारण " जे कधीच नव्हते त्याची आस का धरावी" ह्या वाक्याच्या अर्थ एव्हाना मला चांगलाच उमजला आहे.

२ टिप्पण्या :

 1. अभिनंदन! नवीन लिखाणासाठी शुभेच्छा.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. काका धन्यवाद
   ह्या विश्वात मी नवखा आहे. तेव्हा जाणत्या लोकांकडून सल्ला मार्गदर्शन
   अपेक्षित आहे. कुठलाही संकोच न बाळगता ह्या मराठी ब्लॉगविश्वातील सवंगड्यांनी माझ्या लिखाणावर म्हणजेच माझ्या विचार व अनुभवांवर व्यक्त व्हावे.
   हीच मनी कामना बाळगून आहे

   हटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips