हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

हिटलर आणि जर्मनी ( मनमोकळे विचार

  सदर लेख हा अमुक एका विषयाला वाहिला नसून मनात उसळणाऱ्या विचारांना शब्दात उतरवण्याचा एक शीण प्रयत्न आहे.?

माझी पत्नी कथारीना जर्मन असून आम्ही जर्मनीत स्थयिक आहोत.
आज फेसबुक वर माझ्या  पत्नीच्या एका नेपाळी मित्राने ( जो अबुधाबी मध्ये तिच्या सोबत काम करता होता ) त्याने नाझी पक्षाचे चिन्ह स्वस्तिक टाकले. माझ्या पत्नीच्या मित्रांच्या यादीत तिचे वडील पण आहेत. त्यामुळे त्यांना हे कळताच त्यांनी तिला फोन करून त्या मित्राला तिच्या यादीतून काढण्याचे फर्मान काढले. म्हटलं तर फतवा काढला. माझ्या बायकोने तिच्या आईवडिलांना समजून सांगितले की ""तो मुलगा समंजस आहे. आणी दर आठवड्याला तो आपल्या प्रोफाईल वरील चित्र बदलतो". त्याच्या अल्बम मध्ये झोंबी चे चित्र आहे. ह्याच्या अर्थ तो काही नर भक्षी नाही. पण  .ह्याचा काहीही उपयोग झाला नाही.  दुसर्या महायुद्ध च्या नंतर दोस्त राष्ट्रांनी ह्यांच्या शिक्षण व्यवस्थेत मेकेलो च्या धर्तीवर अशी तजवीज केली की हिटलर ह्या नावाने जुन्या जर्मन खोडांना कापरे भरते.


मी काही कट्टर हिटलर समर्थक नाही. व त्याने केलेल्या निरपराध रोमेनियन व ज्यू लोकांच्या कतले आम चे समर्थन करत नाही.
पण राजहंस जसा दुधातून पाणी वेगळे करून पितो ह्या दंतकथेतील मतीतार्थानुसार
एखद्या व्यक्तीच्या दुर्गुण वगळून काही चांगल्या गोष्टींचे अनुकरण राहूद्या पण निदान चांगल्यास चांगले म्हणायला काय हरकत आहे. माझ्या पत्नीने शेवटी तुमच्या सांगण्यावरून मी माझा मित्र परिवार वाढवणार अथवा कमी करणार नाही. विशेतः जेव्हा एखादी गोष्ट माझ्या मनाविरुध्ध मुळीच करणार नाही.
शेवटी वादावादीत ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष न लागता फोनो फोनी थांबली.

आता हिच्या पालकांमध्ये व आपल्या माननीय मंत्री महोदय अय्यर ह्यांच्या मध्ये काय फरक आहे? त्यांना सावरकाराची प्रखर देशभक्ती किंवा लंडन मधून सशत्र क्रांतीचा प्रयत्न व अंदमान आणि काळ्या पाण्याची शिक्षा किंवा बोटीतून सुटकेचा थरारक प्रयत्न अजिबात दिसत नाही. ह्यांना फक्त ते गांधीवधातील एक संशयित आरोपी वाटतात.( भले कोर्टाने त्यांना निर्दोष  सोडून दिले )

आजही आपल्या देशात गोडसे ची भूमिका असणारे नाटक विरोधाला न जुमानता चालते हे सुधृढ लोकशाहीचे लक्षण मला वाटते. येथे जर्मनीत मात्र हिटलर नाव सुद्धा कोणीही उच्चारत नाही. भारतात हिटलर काही लोकांना आवडतो. त्यांचे आत्मचरित्र मुंबईत रस्त्यावर व इतर ठिकाणी विकले जाते. किंबहुना भारतातील सर्वात खपाचे परदेशी पुस्तक म्हणून त्याचा उल्लेख होतो. महात्मा गांधीच्या देशात असे आक्रीत घडते ह्यावर सामान्य जर्मन जनतेचा विश्वास बसत नाही.( भारत म्हणजे गांधी अशी प्रतिमा येथे परकीय प्रसार माध्यमांनी रंगविली आहे.)
नियतीची विडंबना अशी की आजमितीला भारतात खोर्याने हिसंक गुन्हे घडतात.

ह्यात बलात्कार ते खून, भ्रूणहत्या आदी गुन्हे येतात आले तरी परदेशात आपली प्रतिमा गांधीचा देश अशी आहे. मात्र त्यामानाने सुस्थितीत असणारा जर्मन देश म्हटला की जगातील कोणत्याही देशातील व्यक्तीच्या मुखी चटकन हिटलर चे नाव येते. हा विरोधाभास आणि अश्या अनेक विरोधाभासाने , विसंगतीने ठासून भरलेले आपले जीवन हे प्रखर  वास्तव सत्य आहे. आहे.

खुद जर्मनीत
इतिहासाच्या वाहिनीवर सैदैव दुसरे महायुद्ध व हिटलर गाथा चालू असते. येथील पुरातन वस्तूसंग्रःलायात सुद्धा महायुद्ध व हिटलर निगडीत गोष्टी देशी व परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत.

आपले ज्यू राष्ट्राशी व्यापारी ,सांस्कृतिक ,सामरिक , राजनैतिक , सांस्कृतिक संबंध आहेत.  व दहशतवादाच्या विरुध्ध आपली सामाईक भमिका आहे. आणी जगभरात ज्यू लोबी प्रबळ आहे. तेव्हा मला हिटलर विषयी काय वाटते ह्याहून महत्वाचे माझ्या देशासमोर,  माझ्यासाठी आज माझ्यासमोर इस्लामी दहशवाद व त्याचा मुद्दा आणि त्याविरुद्ध ज्यू राष्ट्राची आपली मैत्री महत्वाची वाटते. तेव्हा नुकतेच माझ्या पत्नीची समजूत काढून त्या मित्राला तिच्या यादीतून बाहेर काढले.

माझ्या मते लोकशाही ची व्याख्या म्हणजे व्यापारांनी व्यापारासाठी चालवलेला व्यापार होय.
आज आपण आहोत बाजारपेठ आणि त्यातील ग्राहक व आपल्यापुढे आहेत विक्रेते ,भांडवलशाहिचे ठेकेदार. आणि तेव्हा तत्वे आणि मुल्ये बासनात गुंडाळून चंगळवादी संस्कृतीत समरस होणे हाच एक पर्याय माझ्या समोर आहे.

आज माझ्या परदेशी गोर्या मित्र परिवारात मी भारत गांधी ,अहिंसा ह्यावर सडकून बोलतो. माझ्यात आणी पाकिस्तानी ( त्यांच्या लेखी एकजात दहशवादी )  मध्ये मुलभूत फरक निर्माण करतात .त्यांच्या लेखी भारतीय म्हणजे योगां , अध्यात्म., कामसूत्रे , गांधी , बुद्ध , आणि आयटी ह्यांचा वारसा चालवणारे निष्ठावंत पाईक.   मग मी पण तुमचा देश आणि अमेरिका कशाला उगाच अफगाण मध्ये युद्ध करत आहात. ओबामा ह्यांनी पदयात्रा करत तोरबोरा मध्ये जायचे नी मुल्ला ओमार चे हदया परिवर्तन करून आणायचे असे बसल्या जागी सल्ले देतो. नाही तरी ओबामा ह्यांनी गांधी ह्यांच्या फोटो आपल्या कार्यालयात लावला नी दुसर्या दिवशी अफगाण मध्ये अधिक सैन्य पाठवले.

1 टिप्पणी :

  1. उद्या जर्मनी मधील सर्वात मोठ्या छळ छावणीत भेट देणार आहे. येथे ज्यू समाजाचे सर्वात जास्त बळी गेले. मानावेतेला काळिमा फासणारे हे नराधम कृत्य ज्या फासिस्त राजवटीत घडले तशी प्रवृत्ती भविष्यात जर्मनीत निर्माण होऊ नये म्हणू येथे सरकारने कोणत्या खबरदार्या घेतल्या आहेत त्याची सुद्धा माहिती देईन.
    त्याबद्दल माहिती सचित्र पोस्टातून देईन
    आशा करतो तुम्हाला हे पोस्ट देखील आवडेल, त्याबद्दल माहिती सचित्र पोस्टातून देईन

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips