हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार महापौर कोणाचा

.ह्या आधी   
महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार ह्या लेखात निवडणुकी च्या निकालाबद्दल माझी मताची पिंक टाकून झाली आता सत्ता कोणाची महापौर कोणाचा  ह्यावर टिप्पणी
करतोय.

कोंग्रेज ने घातलेली आत मान्य करून सेनेने मुंबईत आपला महापौर बसवला तर
राष्ट्रवादी राज्यात व केंद्रात मंत्रीपदे घेऊन बसतील
आणि सेना राज्यात व केंद्रात विरोधात बसतील
आणि उत्तर प्रदेशात अखिलेश राहुल दोस्ती रंग लाई तर
राहुल व उद्धव ह्यांची दोस्ती सुद्धा भविष्यात पाहण्यात येईल
अश्यावेळी मनसे राष्ट्रवादी व भाजप एकत्र मोट बंधू शकतात.

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार

.
हा लेख लिहितांना आधी मी परत एकदा ते गाणे तू नळीवर ऐकले
उठा उठा आभाळ फाटले ....
सध्या मनसे च्या सर्व जागा सेनेने पटकावल्याने तसेस नाशिक व मुंबई मधील घसरगुंडी पाहता आभाळ खरोखर फाटले आहे ह्याची प्रचिती आली.    ह्या आधी मी     
मुंबई महानगर पालिका निवडणूक फुल टु घुमशान , दंगल , धर्मयुद्ध भाग एक
ह्या लेखातून होणाऱ्या निवडणुकांवर माझे मतांचे शिंतोडे उडवले होते ,त्यांचाच पुढचा भाग आज खरडत आहे.

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

ओबामांची कृष्णकृत्ये त्यावर ट्रम चा उतारा अमेरिकी राजकारणाची परवड

अनेक अर्ध हळकूंडाने पिवळे झालेले डोनाल्ड ट्रम ह्यांना त्यांची राजकीय कारकिर्द चालू होण्याच्या पूर्वी दूषणे देत आहेत.
ह्यावरून मराठीतील एक विनोद आठवला
लहान मुलाला वडील जोरजोरात मारत असतांना त्यांचे शेजारी घरी येतात व वडिलांना मुलाला मारण्याचे कारण विचारतात.
वडील सांगतात कि मुलाला निकाल उद्या आहे , ह्यावर शेजारी विचारतो निकाल उद्या आहे तर आज का मारत आहात ,त्यावर वडिलांचे उत्तर असते कि उद्या मी बाहेरगावी चाललो आहे तेव्हा आजच मारून घेत आहे.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

मुंबई महानगर पालिका निवडणूक फुल टु घुमशान , दंगल , धर्मयुद्ध भाग एक

.
 राज साहेबांचे भाषण ऐकले ,त्याआधी अवधूत चे गाणे ऐकले
भाजपाची दुसरी टीम आल्याचा सेनेच्या आरोपाचे मळभ दूर सारण्यासाठी भाजपवर मनोसोक्त टीका झाली ,
त्यातून नेहमीचे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न  हा आरोप करण्यात आला
मुळात मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करावयाचे झाले तर ते केंद्र व राज्य सरकारच्या परवानगी ने होऊ शकते आणि दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips