हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, २२ मे, २०१२

राजीव इंदिरायुगीन भारतवर्ष

राजीव इंदिरायुगीन भारतवर्ष
राजीव गांधी ह्यांना सध्या भावपूर्वक श्रद्धांजली सध्या सर्वत्र वाहिली जात आहे.
कदाचित भविष्यात राजधानी राजीव गांधी टर्मिनल मधून दिल्लीकडे कूच करेल.
तेव्हा राजीव ह्यांच्या काळात भारतात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणे मला गरजेचे वाटले.
राजीव गांधी ह्यांचे थोडक्यात वर्णन माझ्या लेखी
लोकशाहीच्या नावाखाली एकाधिकारशाही राबविण्यात व सर्व सूत्र स्वतः कडे ठेवण्याचा अट्टाहास करणाऱ्या आईचा मुलगा शेवटी जे पेराल तेच उगवेल ह्या न्यायाने काळाच्या पडद्याआड गेला.
दिल्लीतून गल्लीची सर्व सूत्रे स्वतः चालविण्याचा अट्टाहास व स्वतःभोवती खुशमस्करे व जोडे उचलानार्यांची भाऊ गर्दी ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खास वैशिष्ट्ये

पंजाबात घडलेल्या रक्तरंजित घडामोडी त्यांनतर इंदिराजी ह्यांची हत्या व त्या नंतर झालेले शिखांचे हत्याकांड व आजही रस्त्यावर मोकाट फिरणारे आरोपी ह्या गोष्टी विसरता येत नाही. त्यांच्या युवानेते ते पुढे प्रगल्भ व अनुभवी नेते ह्या कारकीर्दीच्या टप्प्यात ह्या घटना घडल्या त्याचे पडसाद व जखमा आजही समाजात पूर्णतः भरल्या नाही आहेत.
स्वतः पंतप्रधान झाल्यावर आईच्या योजना पुढे राबवत दक्षिणेत एक नवा नवीन घाशीराम जन्माला घालण्याचे पवित्र कार्य राजीव ह्यांनी पार पाडले. व आपल्या स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचा अनाकलनीय निर्णय ( आज जर्मनीत अनेंक तमिळ निर्वासित आहेत. त्यांच्याकडून त्या काळात घडलेल्या अनेक घटना मी येथे लिहू शकतो पण लिहिणार नाही. कारण मनी रत्नं ने दिल दे मधून हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न केला पण भारतीय लोकांना तो पचनी पडला नाही.)
त्यावेळी
श्रीलंकेने प्रभाकारांशी त्यावेळी तह केला ( हा प्रभाकरन च्या कूट निधीचा परमावधी मानला जातो ) ह्यामुळे आपल्या सैन्याला नेमके आपण श्रीलंकेत का आहोत काय करत आहोत आणि पुढे काय करायचे ह्या बाबत प्रश्न उभे राहिले.
नेमका हाच प्रश्न मुशारफ ने दहशतवादी युद्धात अमेरिकेसोबत पाकिस्तानी सैन्य अफगाण मध्ये पाठविल्यावर पाकिस्तानी सैन्यात निर्माण झाला
व आज तागायत तो कायम आहे
. राजीव ह्यांच्यावर आधी प्राणघातक हल्ला होऊन सुध्धा ते तामिळनाडू येथील सभेत गेले कारण राजकारण हे ह्या परिवाराच्या रक्तात भिनले आहे. व फक्त मृत्यू त्यांना राजकारापासून विमुक्त करू शकत होता. बेनझीर ह्यांना सुद्धा त्यांचे राजकारण ब्रिटन मधून पाकिस्तानात घेऊन आले. अशी राजकारणी पार्श्वभूमी मुशरफ ह्यांना नसल्यामुळे ते पाकिस्तानात जीव धोक्यात घालून येत नाही आहेत. ते व अल्ताफ हुसेन लंडन मध्ये सुरक्षित जीवन जगत आहेत.
राजीव ह्यांच्या मृत्यू नंतर राजकारणातील एकाधिकारशाही ची प्रथा जाऊन कड्बोल्याचे अनेक पक्षीय सरकार स्थापन झाले ह्यामुळे दिल्लीतील बाबू मंडळींचे महत्व कमी होऊन विविध प्रांतातील नेते व जनता ह्यांची दखल घेतली जाऊ लागली.
एखादी ममता ,जयललिता सोनिया जींच्या पक्षाला खुलेआम आव्हान करू लागल्या. व सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी काँग्रेस ला आघाडी सोबत निर्णय घेणे भाग पडले.
राजीव ह्यांच्या मृत्युनंतर आपल्या परार्ष्ट्र धोरणाचे खर्या अर्थाने शिल्पकार नरसिंह राव ह्यांनी मनमोहन ह्यांच्या मदतीने देशाला मनमोहक स्वप्न दाखवले.( परकीय मिडीयाला भारत मोठी बाजारपेठ पर्यायाने जगतील मोठी लोकशाही व भविष्यातील महासत्ता असल्याचा साक्षात्कार तर सामान्य प्रगत देशातील जनतेला भारत साधू व वाघ सिंहाचा देश ते त्यांच्या नोकर्या हिरावून घेणारा देश अशी प्रतिमा निर्माण झाली )
आजतागायत अफगाण ,इराक ,इराण व पेलेस्तैन, श्रीलंकन मुद्यावर भारतने राजीव ह्यांच्या मृत्युनंतर कोणतीही आक्रमक व अनाकलनीय निर्णय घेतला नाही. म्हणून आमच्या राम नाईक ह्यांचे इराक मध्ये फुलांनी तर बुश साहेबांचे जोड्यांनी स्वागत झाले.
आज संगणक क्रांतीचे प्रणेते म्हणून राजीव ह्यांचे नाव घेतले जाते. पण मुळात मुक्त अर्थ व्यवस्था जी राजीव ह्यांच्या निधनानंतर काँग्रेस तर्फे राबविण्यात आली ती ह्या माय लेकांच्या हयातीत का बरे नाही राबविण्यात नाही आली.?
आज जगाला हेवा वाटेल असा मध्यम वर्ग का बरे त्यांच्या हयातीत निर्माण झाला नाही.
चीन आपल्यापुढे आहे ह्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भारताच्या १2वर्ष आधी चीन ने त्यांची आज आहे त्या अर्थव्यवस्थेची निव रचली. तेव्हा आपला शेजारचा कम्युनिस्ट देश स्वतःला परिवर्तीत करत आहे. तेव्हा आपण सुद्धा आपल्या देशाचे बेसिक धोरण तपासले पाहिजे असा विचार राजीव ह्यांच्या मनाला शिवला नाही.
नरसिंह राव ह्यांच्यावर त्यांनी सोनिया गांधी व पर्यायाने गांधी परिवाराला राजकारापासून वंचित ठेवले असा आरोप त्यांच्यावर केला जातो. पण जर त्यांनी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलीच नसती किंवा राजीव ह्यांचा मृत्यू झाला नसता व नरसिंह राव व मनमोहन हे राजकारणात आले नसते तर तीच जुनाट अर्थव्यवस्था व तेच जुनाट दूरदर्शन आपल्या नशिबी असते.
आज देशात २जि ते ४जि तंत्राञान ज्या अप्लावधीत आले ते पाहता भारतात दूरध्वनी आपल्यापासून सॅम पित्रोदा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली क्रांती ह्यामधील कालावधी लक्षात घेतला तर एक गोष्ट लक्षात येते. कि ५० निरकुंश सत्ता ( आणि बाणीचा काळ वगळता ) ह्या मायलेकांनी उपभोगली. मात्र देशात विकास कूर्मगतीने का निर्माण झाला.
त्याकाळात बांगलादेश निर्माण झाल्यावर अमेरिकन मदत आपल्याला बंद झाली व ७० ते ८० च्या दशकात निर्माण झालेली बेरोजगारी ,गुन्हेगारी , फुटीर चळवळी , परदेशात होणारे ब्रेन ड्रेन व ह्या सर्व गोष्टींमुळे जनतेला आलेले नैराश्य व समाजातील घसरते नितीमुल्ये ह्या सर्व गोष्टीबद्दल चर्चा न होता फक्त दूरध्वनीच्या क्रांत्या व गांधी परिवाराच्या नावाने रस्ते व अनेक कल्याणकरी योजना ज्यात अनेक नेत्यांचे व सरकारी अधिकाऱ्यांचे कल्याण झाले व होत आहे. ह्या सर्वांचा जमाखर्च कोण मांडणार.?
भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली त्याचा एक महत्वाचा बदल जो राजकारणात झाला तो म्हणजे अनेक नवीन शेत्रे जशी आयटी भारतात उदयास आली. व त्यामुळे व्यापारी व उद्योजकांचे राजकारणावर नियंत्रण आले. ह्यामुळे आज कोणत्याही पक्षात कोणताही नेते स्वताच्या मनात येईल ते निर्णय घेऊ शकत नाही. त्याला स्वतःचा मतदार व पक्षाला निधी देणारे उद्योजक ह्यांची मते महत्वाची वाटू लागली . भांडवल शाहीमध्ये ह्या गोष्टी सर्वच प्रगत देशात घडतात त्या भारतात घडू लागल्या.
नेमके हेच नेहरू ,इंदिरा व राजीव ह्यांना नको होते. टाटा असो किंवा अजून कोणताही उद्योजक आमच्यापुढे नाक घासत आले पाहिजे ही मानसिकता मग त्यांना बाळगता आली नसती.
अफगाण मधील तालिबान उदय , अमेरिका व पाकिस्तानी मैत्री व त्यामुळे पाकिस्तानचे अण्वस्त्र सज्ज होणे व त्याच सोबत पंजाबात व काश्मिरात दहशतवाद निर्माण होणे ह्या सर्व गोष्टी घडत असतांना भारताची स्थिती जागतिक राजकारणात केविलवाणी करण्यात तसेस शीत युध्ध्तात रशियाचे प्यादे म्हणून प्रगत देशांच्या काळ्या यादीत भारताला नेण्यात ह्या माय लेकांच्या महान धोरणांचा महत्वाचा वाटा होता. ह्यांच्या काळात माझ्या वडिलांची पिढी सरकारी नोकरी हाच जगण्याचा एकमात्र निकष मानून सुस्त झाली तर कर्तबगार माणसे अमेरिकी पोहोचली व आज माझी पिढी
मात्र भारत असो किंवा परदेश खाजगीकरण व ग्लोबलायजेशन च्या लाटेत समर्थपणे पोहत आहेत. भारतातील आजची पिढी व ह्या माय लेकांच्या काळातील पिढी ह्यांच्यातील मानसिकता व राजकीय ,सांस्कृतिक व आर्थिक सामाजिक बदल सांगतांना मी जर्मनीचे उदाहरण देईल. दुसर्या महायुध्धंतर जर्मनी दोन भागांमध्ये विभागल्या गेला . वेस्ट जर्मनी म्हणजे आजचा भारत जो भांडवल शाहीमध्ये प्रगतीची फळ चाखत होता . तर पूर्व जर्मनी म्हणजे ह्या माय लेकांच्या काळातील भारत जो साम्यवादी रशियाच्या प्रभावाखाली गरिबीत जखडल्या गेला होता.
आता देश एक व लोकही तीच फक्त पूर्व व वेस्ट अशी विभागणी झाली आणि ह्या जर्मन लोकांचे राहणीमान व मानसिकता पार बदलून गेली.
भारतात सुद्धा ७० ते ८० च्या दशकातील पिढी त्यांची मानसिकता व राहणीमान व महत्वाकांशा व इंदिरा व राजीव ह्यांच्या नंतर ची ९० ते आजची पिढी ह्यांच्यात जमीन आस्मानाचा फरक दिसून येतो.
ह्यांच्या काळात सोन्याच्या आयती संबंधी धोरणे किंवा भारतात त्याकाळात चैनीच्या मानल्या जाणार्या वस्तूंचे उत्पादन न केल्यामुळे स्मगलिंग फोफावले. व सिने उद्योग जो सर्व भारतीयांचे मनोरंजन करतो त्याला उद्योगाचा दर्जा न दिल्यामुळे हाजी मस्तान ते दाउद चा ह्या शेत्रात शिरकाव व त्यांना समाजात मिळणारी लोकप्रियता हा ह्यांच्या धोरणाची फळे आहेत.
कात्रोची ला वाचविण्यासाठी अमिताभ चा राजकीय बळी हे नुकतेच बोफार्स प्रकरणी नवीन थिअरी वृत्तपत्रातून वाचनास आली . ह्या सर्व प्रकरणात खरे खोटे कितपत असले तरी ह्या प्रकाराने देशाची अब्रू धुळीत मिळाली.

भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली त्याचा एक महत्वाचा बदल जो राजकारणात झाला तो म्हणजे अनेक नवीन शेत्रे जशी आयटी भारतात उदयास आली. व त्यामुळे व्यापारी व उद्योजकांचे राजकारणावर नियंत्रण आले. ह्यामुळे आज कोणत्याही पक्षात कोणताही नेते स्वताच्या मनात येईल ते निर्णय घेऊ शकत नाही. त्याला स्वतःचा मतदार व पक्षाला निधी देणारे उद्योजक ह्यांची मते महत्वाची वाटू लागली . भांडवल शाहीमध्ये ह्या गोष्टी सर्वच प्रगत देशात घडतात त्या भारतात घडू लागल्या.
नेमके हेच नेहरू ,इंदिरा व राजीव ह्यांना नको होते. टाटा असो किंवा अजून कोणताही उद्योजक आमच्यापुढे नाक घासत आले पाहिजे ही मानसिकता मग त्यांना बाळगता आली नसती.
अफगाण मधील तालिबान उदय , अमेरिका व पाकिस्तानी मैत्री व त्यामुळे पाकिस्तानचे अण्वस्त्र सज्ज होणे व त्याच सोबत पंजाबात व काश्मिरात दहशतवाद निर्माण होणे ह्या सर्व गोष्टी घडत असतांना भारताची स्थिती जागतिक राजकारणात केविलवाणी करण्यात तसेस शीत युध्ध्तात रशियाचे प्यादे म्हणून प्रगत देशांच्या काळ्या यादीत भारताला नेण्यात ह्या माय लेकांच्या महान धोरणांचा महत्वाचा वाटा होता. ह्यांच्या काळात माझ्या वडिलांची पिढी सरकारी नोकरी हाच जगण्याचा एकमात्र निकष मानून सुस्त झाली तर कर्तबगार माणसे अमेरिकी पोहोचली व आज माझी पिढी
मात्र भारत असो किंवा परदेश खाजगीकरण व ग्लोबलायजेशन च्या लाटेत समर्थपणे पोहत आहेत. भारतातील आजची पिढी व ह्या माय लेकांच्या काळातील पिढी ह्यांच्यातील मानसिकता व राजकीय ,सांस्कृतिक व आर्थिक सामाजिक बदल सांगतांना मी जर्मनीचे उदाहरण देईल. दुसर्या महायुध्धंतर जर्मनी दोन भागांमध्ये विभागल्या गेला . वेस्ट जर्मनी म्हणजे आजचा भारत जो भांडवल शाहीमध्ये प्रगतीची फळ चाखत होता . तर पूर्व जर्मनी म्हणजे ह्या माय लेकांच्या काळातील भारत जो साम्यवादी रशियाच्या प्रभावाखाली गरिबीत जखडल्या गेला होता.
आता देश एक व लोकही तीच फक्त पूर्व व वेस्ट अशी विभागणी झाली आणि ह्या जर्मन लोकांचे राहणीमान व मानसिकता पार बदलून गेली.
भारतात सुद्धा ७० ते ८० च्या दशकातील पिढी त्यांची मानसिकता व राहणीमान व महत्वाकांशा व इंदिरा व राजीव ह्यांच्या नंतर ची ९० ते आजची पिढी ह्यांच्यात जमीन आस्मानाचा फरक दिसून येतो.

४ टिप्पण्या :

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. उपसंहार
    ह्या लेखामागील उद्देश एवढाच आहे की
    कि सध्या रिप राजीव व ह्यामागे राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरु आहेत.
    मात्र
    थोडक्यात सांगायचे तर श्रीलंकेतील निरपराध तमिळ नागरिक . दिल्लीमधील दंगलीत मारल्या गेलेले शीख बांधव ., संयुक्त महाराष्टाच्या चळवळीतील हुतात्मे
    आणि मोहनदास गांधीच्या मृत्युनंतर त्यांच्या अहिसंक तत्वाला हरताळ फासून झालेली ब्राह्मणाची हत्या हे सर्व निरपराध बळी ह्या परिवाराच्या माथी आहेत.
    मात्र आमच्या समकालीन युवराजांच्या पक्षाकडून जेव्हा मोदींना जेव्हा क्रूर कर्मा वैगैरे प्रकारची विशेषण लावली जातात. तेव्हा मात्र गंमत वाटते.
    युवराजांनी मुंबई येऊन लोकल ने प्रवास केला तेव्हा त्यांनी तिकीट काढले हे आम्ही टीवीवर पहिले. मात्र बहुदा त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा मंथली पास असावा म्हणून त्यांची तिकिटे मात्र काढली नसावीत.
    आजही एखाद्या गावात ज्याचे एका गरीब कुपोषित बालकाला उचलून घ्यायचे. किंवा त्यांची झोपडीत एक दिवस राहायचे असे कालबाह्य फंडे वापरून निवडणुका जिंकता आल्या असत्या तर अखीलेख च्या एवजी राहुल नाव उत्तर प्रदेशात सर्वमुखी झाले असते.
    युवराजच्या तळमळ ,गरिबांसाठी असलेली बांधिलकी व आपुलकी व विरोधी पक्षावर नाकर्ते पणाचा आरोप करतांना आपल्याकडे जनतेच्या भल्यासाठी काय योजना आहेत त्याचे प प प कधीच तयार असते. मात्र भारतीय जनतेला बहुदा हिर्याची पारख नसावी. असे मला वाटते.

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी मनातले विचार समोर मांडलेत ,जणू मीच माझे लेखन वाचत आहे .आणखी काय बालू ?

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद विजयजी

    आर्थिक उदारीकरण हे ह्या चीन प्रमाणे आपण एक दशक आधी सरू केले असते तर
    ८० च्या दशकात बेरोजगारी व त्यातून मुंबईत संघटीत गुन्हेगारी किंवा एका पिढीत संपूर्ण भारतात मरगळ आली नसती.
    परराष्ट्र धोरणात जिया हूल हक बरोबर १९८८ साली झालेल्या क्रिकेट दिप्मोसली मध्ये
    त्यांचे धोरण समजण्याच्या पलीकडे होते.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips