हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, १३ जून, २०१२

दोन बातम्यांवर मुक्त प्रकटन ,राष्टपती मनमोहन , शांघाय च्या निमित्ताने उरातील सल

मनमोहन ह्याच्या कारकिर्दीची अखेर व्हावी आणि त्यांचा पुढील ५ वर्ष गुळाचा गणपती करावा म्हणजे त्यांच्या आंतराष्ट्रीय नावाचा देशाला व पक्षाला फायदा
व संकट विमोचन अशी ख्याती असलेले मुखर्जी ह्यांच्या हाती पंतप्रधान पद ( ज्यासाठी त्यांनी कधीपासून देव पाण्यात घातले आहेत.)  व अर्थमंत्री पदी अलुवालीया
(  विकीलीक्स नुसार अलुवायीया ह्यांना अर्थमंत्री न केल्याबद्दल सखेद आश्यर्य व्यक्त करणारी तार भारतातील अमेरिकन दूतावासातून गेली होती. )
थोडक्यात काय एकमेका सहाय्य करू ",एवढे  धरू सुपंथ असा राजनैतिक डाव मांडला जात आहे".
मनमोहन ह्या पदासाठी सर्वथा योग्य आहेत.

ह्या पदासाठी आवश्यक ते सर्व गुण त्यांच्याकडे आहे. व ह्या पदासाठी लागणारा अनुभव ( काही दुष्ट लोक काय ते रबर स्टेप )  त्यांनी पंतप्रधान  असतांना कमावला आहे.
आत मात्र असे जर खरच घडले तरं आक्रीत काहीच होणार नाही. सबंधित व्यक्ती संबधित पदासाठी योग्य आहेत. आंतराष्ट्रीय राजकारणात त्यांचे नाव आहे.
एका आंतराष्ट्रीय परिसंवादात आलुवायीया ह्यांना एका थोर अर्थतज्ञाने  आम्ही ह्यांना   जागतिक बेन्केचा अध्यक्ष होण्यातही कधीपासून विचारतोय, हे   हे नाही म्हणत आहेत"असे सांगितले होते.  अर्थकारणात गती व अमोघ वक्तृत्व हे आलुवायीया ह्यांचेवैशिष्ट्ये

माझ्या मते मनमोहन पेक्षा आलुवायिका दर्जेदार अर्थतज्ञ आहेत.
कारण त्यांचा जागतिक बेन्केचा अनुभव व भारताच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या निर्मितीचे साक्षीदार असे अजून बरेच काही त्यांच्या पोतडीत जमा आहे. .

शांघाय च्या निमित्ताने मनातील सल
मुंबई चे शांघाय करू ( जसा कोकणचा केलिफोर्निया )
अशी माजी मुख्यमंत्र्यांची घोषणा गाजली होती.
शहरातील अनधिकृत झोपडपट्या व तेथील अनधिकृत रहिवाश्यांना काही लाख व कोटी देऊन अहिंसक मार्गाने कटवायचे ( कशाला उगाच राजकीय पक्षाला हाताशी धरा मग संघटीत गुन्हेगारी टोळ्या आल्या मग वृत्तपत्रात एखादी बातमी मग त्यावर कमिटी ह्यापेक्षा कोर्पोरेट ला हा मार्ग सोयीचा वाटतो. डायरेक्ट झोपडीतील माणसाला एवढे पैसे दिल्यावर ...... तो जागा काय मुंबई सोडून जायला तयार होतो.)
तेथे मोठमोठाले इमले बांधणे मुंबईत सुरु आहे

( साला आमची हक्काची ,अधिकृत बटाट्याच्या चाळीला कोण मुंबईत विचारत नाही.

पण कुर्ला बांद्रा संकुलात एक अनधिकृत बांधकाम असललेल्या वस्तीवर एका बड्या कंपनीला कार्यालय बनवायचे होते.
म्हणून त्यांनी त्या झोपडपट्टी मधील लोकांना ३० ते ४० लाख वाटले ( घरटी)
तेथील एक बाई आमच्या येथे धुणी भांडी करायची ती आता कुटुंबासह नवी मुंबईत
नव्या घरात राह्यला गेली.
आता ती कंपनी प्रतिष्ठीत होती म्हणून पैशावर निभावून नेले.
आमच्या चाळीपासून काही अंतरावर सिमी चे मुख्यालय होते. तरं हाकेच्या अंतरावर
भटकळ बंधू रहात होते. ह्याची माहिती अनुक्रमे त्या कार्यालयाला टाळे लागल्यावर व ह्या बंधूचे नाव पेपरात अनेक बॉंब स्फोट प्रकरणात यायला लागल्यावर कळले.
त्याच्या हस्तकांना आपली चाळ नावाची वाचाळ वस्ती विकायची नाही हा वज्र निर्धार
आमच्या तमाम चाळकरी लोकांनी केला आहे. मग अगदी कोटी दिले तरी बेहेत्तर
मी आई बाबांना जर्मनी ला कधीचे बोलावत आहे. मात्र वाडवडिलांची जागा सोडून त्यांना यावेसे वाटत नाही ) सदर सिनेमा शांघाय मध्ये  हीच वस्तू स्थिती फिल्मी प्रकारे दाखवली आहे.

हाश्मी साहेबांचा भट्ट केंप बाहेरचा हा महत्वाचा सिनेमा. सगळ्यात म्हत्वाचे काही प्रसंगात त्याचा अभिनय हा जिवंत व उस्फुर्त असतो.
ह्या वर्षी त्याला एखादा तरी पुरस्कार मिळेल. ( ह्यासाठी फार फार तर स्टेज वर थोडे नाचकाम करावे लागेल )

अवांतर

अभय चा शांत व संतुलित अभिनय पाहता त्याचे आडनाव खरेच देओल आहे का असा कधी काही प्रश्न पडतो.
कल्की मला मला तर ती ड्रायकुला पिडीत शोषित तरुणी वाटते.
एकंदरीत ह्या सिनेमाचे निमित्ताने मुंबई चे शांघाय ह्या संकल्पनेची परत एकदा चाचपणी करण्याची वेळ आली आहे.
झोपडपट्टी वासियांना मोफत घरे.
आणि पोलिसांना ,गिरणी कामगारांना , मुंबईतील अधिकृत जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत जीव कुंठीत घेऊन जगणार्या लोकांचे काय ?
भारत माता की जय  


६ टिप्पण्या :

 1. निनाद मित्रा, 'शांघाय' कुठे बघितला? तबकडीवर कि आंजा वर? मी काही दिवसांपासून शोधतोय. खूप उत्सुकता आहे म्हणून बघुयात. तसेही 'प्लेयर्स' नंतर काही बघण्याचा योग आला नाहीये किंवा बघावेसे काही सापडले नाही.

  आई वडिलांच्या बाबतीत म्हणशील तर तीच कहाणी आमच्या कडे आहे. त्यांना यायचे नाही..एकदम ठ्ठाम्म. एकतर मराठी आणि त्यात आणखीन :-) मग ....उलटपक्षी आमचा तिकडे परतायचा विचार उपट- सुम्भा सारखा मध्ये मध्ये डोके वर काढत असतो. खूपच काही miss करतो ना.....

  आणि आता लेखाकडे. तो नेहमीसारखाच 'चौफेर'.. आवडला...थोडक्यात मस्त.

  लिंक दिलेली पण चांगली....उपयोगी.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. आमच्याकडे एक पाकिस्तानी इसम काम करतो तो बॉलीवूड व खानावळी चा
   भयानक पंखा आहे.
   त्यांच्याकडे तबकडी होती.
   म्हणून हा शिणेमा पहिला.
   मी तरी भारतात परत येऊन माझ्या शेत्रातील एका बांधवाची नोकरी हिसकून घेणार नाही.
   खूप काही मिस करतोय हे निखलास सत्य आहे. पण एक सांगू का
   भारता बाहेर राहिला सुरवात केली तेव्हापासून भारताला मिस करायला लागलो व देशाविषयी भावना प्रबळ झाली.
   भारतात निर्बुद्ध राजकारण्यामुळे आणि त्यांच्या जातीय राजकारणामुळे आपल्या संवेदना जाणीवा पार बधीर झाल्या असत्या.
   शाळेत तिसरीत इतिहासाच्या पुस्तकात एक धडा होता
   व्यापारी म्हणून आले , नि राज्यकर्ते झाले.
   आज अजून १०० वर्षांनी जगातील प्रगत देशात
   इतिहासाचा पुस्तकात असे शीर्षक असेल
   नोकरी करायला आले , नि राज्यकर्ते झाले.
   आता बॉबी जिंदाल उपाध्याक्षाची निवडणूक लढत आहे.
   पाहूया काय होतय

   हटवा
 2. आता प्रत्येक चित्रपटात कल्कीला वेड्यासारख्या भूमिकेत पहायची सवय झाली आहे..

  उत्तर द्याहटवा
 3. @राहुल
  मला खरे तर आजकाल ह्या अभिनेत्री व मोडेल ह्यांच्यात आपली हाडे वर आलेली व
  कुपोषण झालेली त्यांची शरीरे पाहवत नाही.
  आमच्या हॉटेलात जगभरातील नामवंत मोडेल्स आणि अभिनेत्र्या स्वादिष्ट सुरेख अन्न उपलब्ध असतांना उगाच स्वतः ची उपासमार करून घेतात. आणि मग सदैव चिडचिड्या राहतात.
  त्यांचा त्यांच्या रूम मधून मला फोन आला तर हॉटेलात भर थंडीत मला घाम फुटतो.

  उत्तर द्याहटवा
 4. आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधतो. मुळात हे राष्ट्रपतीपद सध्या इतके प्रतिष्ठेचे का झाले आहे ? उत्तर २०१४ च्या निवडणुकांमध्ये दडले आहे. दोन्ही आघाड्यांना एक गोष्ट साफ माहीत आहे की संपूर्ण बहुमत अशक्य आहे. तेव्हा घोडेबाजार तेजीत राहणार व अश्यावेळी राष्ट्रपती मोलाची कामगिरी बजाऊ शकतो. कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी पहिले पाचारण करणे व संकट विमोचानांची ह्या पदामागे नियुक्ती ह्या दृष्टीने मह्त्त्वाची ठरते व किंबहुना ह्यासाठी कलाम ह्या प्रकारापासून अलिप्त आहेत.

  मात्र ह्या गडबडीत सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता नवीन अर्थमंत्री कोण तो १४ पर्यत भारतीय अर्थव्यवस्था , आमच्या युरोझोन ची पडझड व अमेरिकन आर्थिक दोस्तांना कसा पार पडणार . मोटेंक सिंग आलुवायीया ह्या घडीला प्रबळ दावेदार आहेत. मागे त्यांचे नाव जवळजवळ नक्की होऊन अचानक मुखर्जी ह्यांची वर्णी कशी लागली ह्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी अमेरिकन सरकार व अमेरिकन भारतीय दूतावास ह्यांच्यात व्यनी करण्यात आले. इति आसंज , विकीलीक्स

  आघाडीचा आता पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण ? महात्वाकांशी प्रणवदा ह्यांची तर बोळवण करण्यात येत आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. प्रणव ह्यांना हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लॉबी कार्यरत आहे ह्यात वाद नाही. ह्या मागील एक कारण म्हणजे मोंटेक सिंग ह्यांची अर्थाशात्रात पी एच डी व जागतिक बँकेतील अनुभव व भारताचे आर्थिक धोरण नव्याने बनविण्यात मनमोहन ह्यांचा उजवा हात असणारे मोंटेक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या हुशारी व अमोघ वतृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. माझ्या मते भारताचे अर्थमंत्री हे पद कोण राजकारणी माणसाला न जाता ह्याच शेत्रातील सुयोग्य व्यक्ती च्या हातात जाणे हे भारताच्या व जगाच्या दृष्टीने योग्य आहे.

  आणि मुखर्जी ह्यांच्या राजकारणाचा अनुभव त्यांना राष्ट्रपती पदावर नक्कीच कमी येईल सध्या चीन विरुद्ध समुद्रात अमेरिकेने शीत युद्धाला सुरुवात केली आहे. चीन विरुद्ध व्हिएतनाम , मलेशिया , दक्षिण कोरिया व जपान उभे थकले असून अमेरिकेचा बिनीचा मोहरा त्याचा नैसर्गिक मित्र भारत ह्यात आघाडीवर आहे. अश्यावेळी भारताचे ह्या सर्व देशांची मैत्रीचे ,व्यापाराचे , संरक्षणाचे करार होत आहेत. व संबंध वाढत आहेत , म्यान मार सहित इतर शेजारील राष्ट्रांची सुद्धा असे करार होत आहे. अश्यावेळी ह्या राष्ट्रांना भेट देणे व त्यांच्या व्यापारी व इतर गटांना भेटणे हे राष्ट्रपती म्हणून प्रणव जास्त योग्य प्रकारे करू शकतील. अमेरीका जागतिक राजकारणात भारताने सक्रिय व अधिक मह्त्त्वाची भूमिका घ्यावी म्हणून कधीच पाठी लागला आहे. तेव्हा प्रतिभावान राष्ट्रपती पेक्षा प्रणव मुखर्जी कधीही योग्य

  त्यांचे बाळासाहेबांशी मैत्रीचे संबंध पाहता सत्ता बनविण्याच्या वेळी हि मैत्री लाभदायक ठरू शकते. पुढच्या निवडणुकीत मनसेला युतीत घ्यावे ह्या मुद्दयावर भाजपात कधी नव्हते मोदी व गडकरी ह्यांचे एकमत आहे. तेव्हा नवीन समीकरण ासाठी आम्ही सज्ज आहोत हा शिवसेनेचा इशारा आहे. किंवा मुखर्जी निवडून येणार ह्यांची खात्री असल्याने उगाच विरोध करण्यापेक्षा पाठिंबा देणे कधीही उत्तम हा विचार मागे असू शकतो.

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips