हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

ओबामांची कृष्णकृत्ये त्यावर ट्रम चा उतारा अमेरिकी राजकारणाची परवड

अनेक अर्ध हळकूंडाने पिवळे झालेले डोनाल्ड ट्रम ह्यांना त्यांची राजकीय कारकिर्द चालू होण्याच्या पूर्वी दूषणे देत आहेत.
ह्यावरून मराठीतील एक विनोद आठवला
लहान मुलाला वडील जोरजोरात मारत असतांना त्यांचे शेजारी घरी येतात व वडिलांना मुलाला मारण्याचे कारण विचारतात.
वडील सांगतात कि मुलाला निकाल उद्या आहे , ह्यावर शेजारी विचारतो निकाल उद्या आहे तर आज का मारत आहात ,त्यावर वडिलांचे उत्तर असते कि उद्या मी बाहेरगावी चाललो आहे तेव्हा आजच मारून घेत आहे.

डोनाल्ड ट्रम जगाचे अमेरिकेचे वाटोळे करणार हे गृहीत धरून काही नाव राजकीय फेस बुकी विचार जंत डोनाल्ड च्या नवे चार शब्द खरडून पराक्रम गाजवत आहेत , मुळात जागतिक राजकारणाचा कणभर मागोवा घेतला तर
मोठ्या आशाने ज्या ओबामाला जनतेने निवडून दिले त्याने त्यांच्या धोरणांनी जागतिक शांततेचे कंबरडे मोडले , ह्यासाठी त्याला आधी शांततेचे नोबेल देण्यात आले होते.
बिछान्यावर अर्धवट संभोग आणि जगात अर्धवट राहिलेले युद्ध दोन्ही बाजूंना असमाधान व त्रासदायक अनुभव देऊन जाते , मुळात इराक व अफगाणिस्तान मधून सैन्य माधारी आणण्याचे गाजर निवडणुकीपूर्वी देणारा ओबामाने प्रत्यक्षात हिलरी च्या साथीने लिबिया इजिप्त आणि आता सीरिया मध्ये नवीन युद्धाची आघाडी उघडली
हे करतांना अमेरिकेने सर्व जागतिक संघटनांना फाट्यावर मारून आपल्या युरोपियन सहकाऱ्यांच्या सोबत अरब जगतात हैदोस घातला , तेथील बंडखोरांना शस्त्रे व पैसे पुरवला , आता विचार करा युरोप व अमेरिकेतील काही असंतुष्ट गटांना रशिया व सौदी ने पैसे व शास्त्रे पुरवली तर अमेरिका व त्यांचे युरोपियन साथीदार कसे वागतील ,
ओबामा व हिलरी ह्यांनी सिरीयात बंडखोरांना असाद च्या विरोधात शास्त्रे पैसे पुरवले , हे कोणत्या नीतिमत्तेच्या व आंतरराष्ट्रीय कायद्यात बसते , आता असद च्या मदतीला रशिया व इराण आले ,

आणि सीरियन भूमी दोन गटांच्या राजकारणाने रक्तरंजित झाली
इराण च्या शह देण्यासाठी इराक यामध्ये नव्याने उदयास आलेल्या आय एस आय एस ह्या दहशतवाडी संघटनेला उदय होतांना त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले हा गट सीरिया मध्ये जाऊन बंडखोरांच्या साथीने लढू लागला .
आता त्याचेवेळी ह्या गटाने युरोपात दहशतवादी हल्ले केले ,
गंमत अशी झाली ,
असद च्या मदतीसाठी रशिया ने आय एस आय एस ह्या दहशतवादी संघटनेच्या विरोधात दंड थोपटले तेव्हा
अमेरिकेला आता असद च्या विरुद्ध सिरीयात लढायचे कि आय एस आय एस च्या विरोधात ह्या बाबत संभ्रम निर्माण झाला.
ओबामा व हिलरी ने जो युद्ध खेळ नाटोच्या साहाय्याने सुरु केला त्याला रशियाने पुरेपूर साथ दिली ह्यात झाले काय
तर लाखो सीरियन बायका वृद्ध लहान मुले मारल्या गेली , निर्वासित झाले , आमच्या जर्मनीत त्यांना स्वागत करण्यात आले 

गंमत अशी आहे कि हि लोक निर्वासित का झाली कशी झाली ह्याकडे दुर्लक्ष करत युरोपियन व अमेरिकन आणि उर्वरित जगातील दीडशहाण्या लोकांनी निर्वषितांचे पुनर्वसन कसे करावे ह्यावर चर्चा सत्र सुरु केले ,
पण मुळात युद्ध थांबले तर निर्वासित बनणे थांबेल हे साधे सूत्र कोणीच विचारत घेत नव्हते.
 ट्रम ह्याने निवडणुकीच्या काळात केलेल्या विधानावर आसूड ओढणारे ढोंगी मतलबी लोक
जेव्हा त्याने इराक मध्ये बुश जात होता तेव्हा ह्या कृतीला विरोध केला होता हे अनेकजण सोयीस्कररीत्या विसरतात ,
ज्या सीरियन बंडखोरांना आपण ओळखत नाही आणि ते असद पेक्ष्या कमी का जास्त नालायक आहेत हे अजून आपल्याला माहित नाही अश्या लोकांना आपण पैसे का पुरवत आहोत असा रोकडा सवाल करणारा डोनाल्ड अनेकांना खुपलं तर त्यात नवल ते काय ,  प्रेसिडेंट होण्याच्या आधी आणि नंतर ट्रम  ह्यांचे अत्यंत वास्तवदर्शी मुलाखत अमेरिकन युद्धखोर वृत्तीवर प्रकाश टाकतो .
ह्यावर सगळे दीडशहाणे  अगदी दवे सुद्धा ह्यावेळी तोंडात मिठाची गुळणी घेऊन आहेत.
, सद्दाम च्या पाडावानंतर आजतागायत इराक उद्ध्वस्त होत आहे ,माणसे मरत आहेत, सद्दाम नंतर अमेरिकेने जे सरकार इराक मध्ये आणले ते अपयशी व नाकर्ते ठरल्याने आय एस आय एस चा उगम झाला व त्यांनी युरोपला लक्ष्य केले व मिडिल ईस्ट ला अशांत ठेवले आहे.

ओबामाने पाकिस्तान विर्रुद्ध काहीही ठोस कारवाई केली नाही त्यांना पैसे व शस्त्रे देत राहिला त्यांच्याकडून होणार विश्वासघात सहन करत राहिला हे सर्व बुश ने सुद्धा केले मग ओबामा चे नवल व लक्षात राहील ते कर्तृत्व काय
ओबामा ने भावपूर्ण भाषणे ठोकली कि जनता भुलायची मात्र त्याने अमेरिकेत जो सावळागोंधळ घातला
त्यांचा परिणाम म्हणून ट्रम निडणून आला
भारतातील किती विचारवंतांनी व प्रसारमाध्यमांनी  ओबामाच्या कारकिर्दीचे  मूल्यमापन केले , काही दीड शहाणे लोक
वादी संपादक तर मिशेल ओबामाचे कोडकौतुक करत तिला पुढची प्रेसिडेंट च्या उमेदवारीसाठी साठी ती कशी योग्य आहे ह्यावर लेखाच्या जिलब्या पाडत आहेत.
ओबामाच्या राज्यात अमेरिकेत कृष्णवर्णीय समाजाचा किती उत्कर्ष झाला त्यांचे राजकीय सामाजिक आर्थिक सत्र उंचावला का
तर उत्तर नकारार्थी आहे, ट्रम ह्याने राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकेत समाज दुभंगला होता हे वास्तव मान्य करण्यास हॉलिवूड सह अमेरिकन प्रसार माध्यमे तयार नव्हती , ट्रम हे निमित्त आहे ह्या मुळे अमेरिकन समाजाचा
खरा चेहरा जगासमोर आला.

ह्यापुढे कोणीही अमेरिकन सत्ताधीश भारतात येऊन भारतीय लोकांना मानवी मूल्ये आणि कायदे ह्यावर प्रवचन झोडु शकणार नाही,
काश्मीर मध्ये काय चालले आहे ह्याबद्दल उचक पाचक करणार नाही.
ओबामाच्या कृष्ण कृत्यांचा व अपयशी राजवटीचा लेखाजोगा मांडण्याचे धारिष्ट्य गार्डियन्स ने दाखवले
त्यांचा मराठी अनुवाद येथे उपलब्ध आहे ,-

डोनाल्ड ने येत्या ५ वर्षात अजून एक अरब राष्ट्र उद्ध्वस्त केले नाही आणि  काही लाख लोकांना निर्वासित करण्याचे पाप आपल्या माथी मारले नाही तरी मी त्याला ओबामा पेक्ष्या जास्त यशस्वी मानेन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips