हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, ३० जून, २०१२

फुटबॉल वल्ड कप २०१० , कलोन मधील मंतरलेले दिवस भाग २

त्या रोमहर्षक क्षणाची चित्रफीत (  आता ह्यात मी ती शिट्टी कर्कश का वाजवत आहे अशी विचारणा करू नका कारण खूप दिवसांनी ती माझ्या तोंडात आली होती. )

२००६ चा लंडन मध्ये आम्ही सामने पहिले ते पब मध्ये. तेव्हा आठवते पोलंड विरुद्ध जर्मनी असा सामना रंगत आला असताना बहुसंख्य पोलिश घोळक्यात आम्ही जर्मन संघासह पाठिंबा देणारे अल्पसंख्य होतो त्यामुळे घोषणा बाजीत कमी पडत होतो .शेवटी इतकावेळ गप्प बसलेल्या मला त्या जर्मन बांधवांचे दुखः पाहवलं नाही. मग आवाज कुणाचा.... च्या तालावर मी चालू झालो बाकी एविबिपी मध्ये कधीकाळी कार्यरत असल्याचा दांडगा अनुभव माझ्या नरड्यात होता. तेव्हाही कर्मभूमी युके व भावी जावई म्हणून जर्मनी हे समोरासमोर येऊ नये अशी प्रार्थना केली होती .नाही तर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था झाली असती. .बाकी क्रिकेट च्या वेळी आपली भूमिका स्पष्ट असते .त्यावेळी अंगात भुवन संचारला असतो


 .पण युके मधील दुसर्या पिढीचा वारसा मोंती पानिसर जेव्हा इंग्लिश संघातून क्रिकेट खेळतो. तेव्हा मात्र ह्या कन्फ्यूज देसी लोकांची तारांबळ उडते. कि पाठिंबा हरभजन ला द्यायचा कि मोन्ति पानिसारला .अर्थात बहुसंख्य पाठिंबा देतात ते हरभजनला .म्हणून नसीर हुसेन कर्णधार होता. तेव्हा त्याची हे इंग्लिश पासपोर्ट धारी देसी लोक हुर्य उडवत .हे पाहून वाईट वाटे.. पण गंमत अशी वाटे कि वरून चर्चिल चा आत्मा काय तळमळत असेल हे सर्व पाहून. .पण आता भूमिका स्पष्ट होती .माझी कर्मभूमी जर्मनी असल्यामुळे त्यांना पाठिंबा हा नैतिकता व ( बायकोच्या घरचे मला कुटुंबांतील सदस्य म्हणून मानतात हे मायेचे पाश ) ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून जर्मनीला पाठिंबा मनापासून होता

 .बाकी आपले शेजारी हिरवे भाई मात्र येथे राहून सर्व निष्ठा मात्र कट्टर पंथीयांची वाहतात हा अनुभव मला आला होता .ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट हाच त्यांचा खाक्या असतो .त्यामुळेच जेव्हा जेव्हा पत्नीसोबत मी जर्मन दुकान उपाहारगृह व मॉल कुठेही जातो .तेव्हा मला पाहून प्रथम कुठून आलात असा चेहऱ्यावर भाव काही लोकांच्या असतो .पण इंडिया हे शब्द त्यांच्या कानी पडताच त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव मी लगेच ताडतो. मग त्याच्या वागण्यात आपुलकी दिसते .फार पूर्वीपासून ह्या देशातील लोकांना भारत व हिंदू ह्या शब्दांनी गारुड केले आहे .असो .मग जर्मन सेना प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत आगेकूच करत होती .व तो दिवस उजाडला .समोर उभे येऊन ठाकले इंग्लिश आरमार ज्यात एन जवानीत अर्ध चंद्र झालेला व ओढ गस्तीला आलेला व प्रीमियम लीग खेळून थकलेला रुनी व त्याचे साथीदार होते .तर जर्मन आपल्या लाडक्या कर्णधार बलाक ला मिस करत होते .आम्ही सुट्टी घेऊन हा सामना अतिभव्य पडद्यावर पहायचे ठरविले
.
 .हे कलोन शहराच्या च्या एका वैशिष्ट्य पैकी एक की हि लोक भयंकर उत्साही.

 लोकांचे तांडे स्टेडीयम कडे यायला सुरवात झाली.

जर्मन लोकांचा आवडते खाद्य पदार्थ  ब्रेसल
 .आफ्रिकेतील सामन्यातील थरार कलोन मध्ये प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी जी शक्कल लढवली होती. ती व्यावसायिक दृष्ट्या एकदम किफायती . होती .मुळात ठिकाण होते आईस हॉकी चे आंतराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्टेडियम (मागच्या महिन्यात तेथे आईस हॉकी चा वर्ल्ड कप झाला होता व संघ होते जर्मनी कॅनडा व आईस लेंड व आदी देश) तर ह्या भव्य स्टेडियम मध्ये प्रवेश मोफत होता. .त्यामुळे 10000प्रेक्षक उपस्थित होते. बाकी हॉलिवूड सिनेमातून आईस हॉकीचे सामने पाहतो. तेव्हा दाखवतात .तसे बंदिस्त स्टेडियम असून वरचे छत ओपन होऊ शकत होते .फक्त आत येताना खाद्य व द्रव पदार्थ न्यायला बंदी होती. .हीच खरी मेख होती .थोड्या चढ्या भावात ह्या गोष्टी विकून त्यांनी आपला नफा कमावला होता.

 .अर्थात स्टेडियम च्या चारीबाजुला मोठ्या स्क्रीन होत्या

सामना सुरु होण्याआधी गाणी सदर केली मात्र बहुतेक गाणी ही स्फुर्तीगीते होती: उगाच शिनेमा किंवा खाजगी अल्बम मधील नव्हती: सुपर डोईच लांड , सुपर डोईच लांड.
ओले , ओले  ह्या ओळीने सुरु झालेल्या गाण्याने तर कहर केला.


. खाली प्रत्यक्ष मैदानात एक स्टेज उभारले असून तेथे  जर्मन गाणी वाजवून उत्साह निर्मिती करत होता.



 ,मग स्थानिक कलावंताचा बेंड आपली कला पेश करत होते ..तीन चार बिग ब्रदारचे स्पर्धक सुद्धा आले होते. (ह्याचे बिग ब्रदर एक वर्षासाठी असते .पूर्णं एक वर्ष ) सामना ४ वाजता स्थनिक वेळेनुसार सुरु होणार होता. तरी आम्ही दोन वाजल्या पासून रांगेत होतो. ३ ला आत सोडल्यावर आम्ही पळत जाऊन मोक्याची जागा पटकावली. .येथे मुंबईतील लोकल मध्ये चढून जागा पटकावण्याचा अनुभव कमी आला .त्या आधी फेस बुक वर युके मध्ये असणारे माझे सहकारी ज्यांच्याबरोबर मी तेथे शिकलो. नोकरी केली .त्याच्याबरोबर फेस बुक वर आमचे घोषणा युद्ध सुरु होते .एका उत्साही मित्राने चक्क दुसर्या महायुद्धाची पुनरावृत्ती करू .असे आवेशात लिहिले होते (पुढच्या वर्षी तो इंग्लिश पासपोर्ट साठी अर्ज देणार होता. ) मी पण लगेच आधी मंदीतून बाहेर या असा शेलका शेरा दिला. होता. निर्मित होते जर्मनीने मंदीतून बाहेर पडत असल्याचा इशारा दिला होता.

 .तर प्रत्यक्ष सामने सुरु झाले .त्या आधी आम्ही एक लिटरचा महाकाय बियर ग्लास घेऊन बसलो होतो व ग्लासात होती स्थानिक कलोन ची बियर कुल्श ,एक लिटरचा महाकाय ,एकच प्याला 


आमचे कुटुंब ( कथारीना मार्झ)
. सामना म्हणावा तसा रंगला नाही. कारण सुरुवाती पासून जर्मनी गोल चढवत गेला .प्रत्येक गोल सोबत एक लीटर डाउन होत होतो .. लोक तर नुसता कल्ला करत होते घोषणा देत होते ..त्यांना एक चेव चढला होता .आणि बियर बरोबरच कदाचित इतके दिवस पराजित झाल्याचा शिक्का घेऊन जोमाने प्रगती करत युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असे मनाचे बिरुद मिरवणारे जर्मन आपली खुन्नस काढत होते .माझ्या डोळ्यासमोर जालियानवाला पासून अनेक विचार क्षणार्धात येऊन गेले ..बियर संगीत वूवूझेला व संगतीला समूहातील बेभान घोषणा ह्यांचा उन्माद चढला होता. शेवटी विजय घटिका आली .आणि मग स्टेडियम चे छत उघडले व आतिषबाजी सुरु झाली

छप्पर उघडल्या गेले व आतिषबाजी दणक्यात करण्यात आली.
 .ह्यात महत्व ाची गोष्ट म्हणजे संपूर्ण स्टेडियम मध्ये एवढ्या मोठ्या जमावा साठी अगदी मोजके सुरक्षा कर्मी तैनात होते .त्यांना सुद्धा फारसे काम करावेसे लागले नाही कारण सार्वजनिक ठिकाणी वागण्याची शिस्त ह्या लोकांना शाळेतच मिळते .रांगेचा फायदा सर्वाना असे न लिहीता सर्व रांगेतून बाहेर पडत होते .मात्र बियर ग्लास ची अमानत रक्कम २ युरो हि ग्लास परत देऊन घ्यायची असते .ती देण्यासाठी प्रचंड गर्दी असल्याने व तरुण मंडळी मात्र रस्त्यावर जाऊन दंगा करायला एवढी आतुर झाली होती. की हे ग्लासेस खाली टाकून निघून गेले .मी खाली उतरताना किमान ५ ग्लास वेचले. (आमच्या दोघांच्या ग्लासा शिवाय ) प्रत्येक ग्लास म्हणजे २ युरो म्हणजे लक्ष्मी .मी बायकोला म्हंटले आमच्या संस्कृतीत लक्ष्मीला पायदळी नाही तुडवत .मी त्या ग्लासांना एका मिनीटात त्यांच्या स्वगृही पोहचवतो . असे म्हणून दहा युरोची नोट घेऊन परत आलो ..नाही तरी खाद्य व द्रव पदार्थावर २० युरो खर्च झाला होता .बाकी रात्री कलोन शहरात आतिषबाजी चालली होती.


.लोकांचे थवे त्यात महिला व माणसे समप्रमाणात होते ते रस्त्यावर जल्लोष साजरा करत होते. .गाड्यातून झेंडे फडकवत जात होते .आम्हाला काही तर ओळख ना पाळख पण रस्त्यात भेटून गळा भेटी करत होते

अशीच एक चटकचांदणी ,चतुर कामिनी आपल्या नवर्या सह आम्हाला  रस्त्यात भेटली.     आणि अशी दिलखुलास पोझ देत आमचा आनंद द्विगुणीत केला.
..आम्ही एका बार मध्ये थांबलो एका वयोवृद्ध स्त्री पुरुषांनाच्या समूहाने आमचा अवतार पाहून कदाचित खुश होऊन निमंत्रण दिले . .मी परकीय असून सर्वांगावर जर्मन निशाण ्या घेऊन होतो. ह्याचे त्यांना खूप कौतुक वाटले .आस्थेने चौकशी केली .भारतातून म्हटल्यावर एकच प्याला मोफत पाजला .

.रात्रीचे कलोन खूपच चिकणे दिसत होते ,मग रायन नदी काठी बसून गप्पा मारून जर्मन स्ट्रीट फूड खाल्ले नि घराकडे वळते झालो .

 त्या रोमहर्षक क्षणाची चित्रफीत

३ टिप्पण्या :

  1. निनाद मित्रा, लेखाबद्दल लिहायला मज पामराकडे शब्दांची खूप कमी आहे. सगळ कस छान छान जमतंय तुला.
    लेख पुन्हा एकदा वाचला, कंटाळा न येता...तुझे नेहमीचे फटके परत अनुभवले, जसे सचिन ला पुन्हा बघताना एक आनंद असतो तसाच होतो मला तुझे लेख वाचतांना.

    एक गोष्ट मात्र नक्की, तुझा प्रामाणिकपणा माल खूपच भावतो.

    आशीर्वाद देण्या-इतपत पात्रता नाही, परंतु
    ||अष्टसहस्त्रौ लेखावतो भवः||
    अश्या तुला शुभेच्छा चिंतितो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कृपया काना मात्रा देणे घेणे. 'माल' च्या ऐवजी 'मला' असे वाचणे.
      उसंडू/मुरावी.

      हटवा
  2. पराग मित्र माझे लेखन पुन्हा वाचल्याबद्दल आभार.
    एकदा का माझा स्टोक मधील जुन्या पोस्ट संपल्या की मी माझ्या युरोपियन भटकंती वर लिहीन.
    युरोप म्हणजे दुसरा भारत
    प्रत्येक देश म्हणजे आपले एक राज्य म्हणजे तेवढीच लोकसंख्या व आकारमान.
    आणि प्रत्येक देशाची भाषा वेगळी परंपरा ,अस्मिता ,आदराची स्थान , खानपान संस्कृती ह्यांच्यात एवढी विविधता आढळते.
    कधी प्रगत ,तर कधी अप्रगत तर कधी विकसनशील देशात भटकंती करतांना अनेक रोमांचक अनुभव येतात.
    त्यांनी आता कुठे युरोपियन देशांची मोळी बांधत युरोपियन युनियन बांधली आहे.
    आपण विविध राज्ये जणू विविध रंगांची ,गंधांची फुले एकाच हारात गुंफली होती.
    तेही कितीतरी वर्ष आधी.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips