हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

यश चोप्रा एक इत्तेफाक

माझी पिढी यश जी ना किंग ऑफ रोमान्स समजते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली अशी सुतकी भाषा मी वापरणार नाही कारण सदाबहार व मानाने चिरतरुण असलेल्या ह्या ८० वर्षाच्या  युवकाचा तो अपमान ठरेल. त्यापेक्षा आजच्या पिढीला माहीत नसलेले यश जी मी त्यांच्या माझ्या आवडत्या सिनेमा द्वारे दाखवू इच्छितो.

 रहस्य कथा बहुतेक सर्वांना आवडतात.   

१९६९ साली ज्या काळात संगीतमय सिनेमांचे सुवर्ण युग होते. त्याकाळात त्यांनी संगीत विरहित हॉलिवूड पद्धतीचा संस्पेस थ्रिलर इत्तेफाक हा सिनेमा दिग्दर्शित केला. 
ज्यात सुपरस्टार काका होता. ज्या साली काका चा आराधना युग सुरु झाले त्याच १९६९ साली त्याला घेऊन यश जी ह्यांनी बॉलिवूड चा सर्वप्रथम नृत्य व संगीत विरहित सिनेमा केला, हा सिनेमा स्टार्ट टू एंड नुसता प्रेक्षकांना खुर्शीला खिळवून ठेवतो. सिनेमा हीट झाला. हे वेगळे सांगायला नको.


 सिनेमाची कथा थोडक्यात एक चित्रकार राजेश खन्ना ह्यांच्यावर आपल्या पत्नीच्या खुनाचा आळ येतो. बायकोशी भांडण झाल्यावर तिचा खून झाल्याच्या मधील काळात नक्की काय घडले हे राजेश ला आठवत नाही व कोर्ट त्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवते. तेथून पळून जाऊन राजेश नंदा च्या घरात शिरतो. आणि तिला धमकावत तिच्या घरी आश्रय घेतो. त्याला तेथे फक्त एका रात्रीसाठी आश्रय हवा असतो. कारण रेडिओ वर एक वेडा खुनी फरार झाल्याची बातमी वार्‍याच्या वेगाने पसरवली असते. नंदा च्या घरातून राजेश निघून जाणार एवढ्यात त्याला तिच्या बाथरुम मध्ये एक प्रेत दिसते.

 तो वेड्या राजेश चा भ्रम असतो. का राजेश च्या हातून खून अजून एक खून झाला असतो हे शेवट पर्यत एक रहस्य राहते. एक दर्जेदार रहस्यमय सिनेमा पाहायचा असेल तर हा ह्या दुवा.

 आणि ह्या सिनेमा च्या शीर्षका प्रमाणे इत्तेफाक घडला. १९७० साली बेस्ट डिरेक्टर चे ऍवॉर्ड यशजी ना मिळाले आणि ह्यात त्यांनी शक्ती सामंता ह्यांना आराधानासाठी मात दिली होती. राजेश खन्ना ह्यास दोन महान दिग्दर्शकांच्या सोबतीने आपली सुपरस्टार कारकिर्द सुरु करायला मिळाली. 
यश चोप्रा ह्यांना माझी आदरांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips