हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, १० मे, २०१२

सुपर जंबो ए ३८० , जणू इंद्राचा ऐरावत.,

अमेरिकन बोईंग च्या  जगभरातील एकतर्फी साम्राज्याला शह द्यायला युरोपातील प्रमुख राष्ट्रांनी   आर्थिक भागीदारी करत  एअरबस ह्या विमान कंपनीची स्थापना केली.  केली. ह्याचा एक भाग म्हणून बोईंग च्या ७४७ ह्या जंबो विमानाला टक्कर देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या विमान निर्मितीची योजना केली.पण नकटी च्या लग्नाला विघ्ने का काय म्हणतात तसे ह्यांचा उड्डाणाला विलंब झाला.( काही प्रसारमाध्यमांनी हा पांढरा हत्ती उडणार कधी अशी त्याची कुचेष्टा सुरु केली.)
 पण ह्या ऐरावताचे पहिले उड्डाण पेरीस वरून लंडन च्या हिथ्रो वर आगमनाची तारीख पक्की ठरली.


ते वर्ष २००६ चे होते.. हित्रो लगत मोठ्या इमारती नसल्याने   फक्त चार आणी पंचतारांकीत हॉटेलातील उंच इमारतीमधून हा लेंडिंग सोहळा दिसणे शक्य होते. मी व  माझी  माजी प्रेयसी व आत्ताची  पत्नी  हिल्टन हिथ्रो मध्ये कार्यरत असल्यामुळे ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले  . (पत्नी हि क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते ह्या मतावर मी ठाम आहे.)


टेलीविजन मिनिटा मिनिटाची खबरबात देत होते.. विमान चार्ल्स दे गौले वरून यशस्वी रीत्या अवकाशात झेपावले.
 तेव्हा तेथील जनतेचा, विमान निर्मिती करणाऱ्या. सदस्यांचा आनंद अवर्णनीय होता. हा युरोपच्या इभ्रतीचा, अभिमानाचा प्रश्न होता. एकेकाळी जगाला नवीन नवीन सर्वोत्तम गोष्टी देणारा युरोप मधल्या काळात अमेरिका व जपान च्या उत्तुंग यशाने झाकळून गेला होता. आज हवाई प्रवासाला कलाटणी देणारा शतकामधील सर्वोत्तम क्षण होता. सर्व श्रेणी मध्ये ५५५ आसन शमता असलेले हे विमान इंधन बचत व कमी आवाज करणारे पर्यावरणाच्या अनकूल होते.
आम्ही हॉटेलचा सर्व कर्मचारी वर्ग हिल्टन हीथ्रोच्या च्या गच्चीवर गेलो. दुसर्या महायुद्धातील कट्टर वैरी जर्मनी व फ्रांस व एरवी अमेरिकेचा कच्छपी असलेला व युरोपियन असून युरो न स्वीकारलेला ब्रिटन व स्पेन ह्या देशांनी एकत्र येऊन ही विमान निर्मिती केली होती. हे विमान जेव्हा अवकाशातून हित्रोवर आले तेव्हा एकच जल्लोष झाला. आमच्या पिढीसाठी तो हवेतला महाल ( त्यातिल मोठी दालने पाहून तर रंग महाल म्हंटले पाहिजे) म्हणजे कुहुतलाचा विषय होता. तर आम्ही  पर्यटन आणि हॉटेल शेत्रातील असल्यामुळे ह्या घटनेकडे व्यावसायिक दुष्ट्या फार महत्व होते.

आता हवाई प्रवास  १६ तासाचा तोही सलग सुरु झाला. त्यामुळे त्यात नुसता प्रवासापेक्षा प्रवाश्यांना इतर सुविधा देणे क्रमप्राप्त झाले.
जगात करोडपतींची, संख्या वाढत असल्याने त्यांना व्यापारी श्रेणीत जास्त सुविधा देणे ओघाने आले. ह्या सर्व मागण्या हे विमान पूर्ण करणारे होते.. एमिरात ने आता ह्या विमानात स्पा निर्माण केला आहे. ओर्गेनिक खाद्य पदार्थ , जगातील उंची मद्ये असलेले बार आणी अनेक सोयी येत्या काळात ह्या विमानात येणार आहेत. ह्या सुविधा पुरविण्यास जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यामध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.


गरुडा सारखे त्यांचे आगमन झाले. ह्या सुपर जंबो जेट पाहताना माझ्या लहानपणी बाबांनी सांगितलेली  त्यांच्या तरुणपणी पाहिलेल्या जंबो जेट ची आठवण आठवली.
कुर्ल्याच्या एका बटाट्याच्या चाळीत त्यांचा जन्म व बालपण गेले. कुर्ल्याहून सांताक्रूझ विमातळ अर्ध्या तासावर आहे.भारतात जेव्हा जंबो जेट नवीन आले तेव्हा त्याचा प्रचंड गाजावाजा झाला होता. ते महाकाय धूड विमातळावर आले आहे ही बातमी कळताच चाळीतील तरुण मुल गटागटाने ते पाहायला गेले होते. त्यातील काही उत्साही मंडळीनी विमान तळाच्या भिंतींवरून उडी मारून थेट धावपट्टी पर्यंत धाव घेतली होती. पूर्वी माझ्या लहानपणी कुर्ला वेस्ट येथे स्टेशन पासून ५ मिनिटावर डोंगर लागायचा ( आता तो पोखरून काढल्याने त्याचे एका टेकडीत रुपांतर झाले आहे. ज्यावर झोपडपट्या उभारल्या आहेत) तेथे आम्ही होळी साठी गोवर्या चोरायला जायचो. आणी इतरवेळी विमानतळाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जायचो.

जंबो ते सुपर जंबो हे दोन पिढीतील अंतर ,मानवी प्रगतीचा चढता आलेख दर्शवितो.

ह्या विमानात इतर विमानांचा तुलनेत ५०% जास्त फ्लोवर शमता असली तरी केवळ ३५ % जास्त प्रवासी प्रवास करू शकणार होते. कारण विमानात सर्व श्रेणीच्या सीट्स मोठ्या आणि प्रशस्त आहेत. ह्या विमानाचा उड्डाण मार्ग जगातील सर्वात जास्त रहदारी असणार्या हवाई मार्गावर असल्याने निकोप स्पर्धा निर्माण होऊन विमान प्रवासाचे दर कमी होतील ही आशा आहे. दुर्दैवाने मंदीमुळे विमान कंपन्या व जगातील सरकार हवालदिल झाले आहेत. व प्रवास महागला.
( भारतातून  ह्या विमानाचे नियमित उड्डाण अमेरिका व युरोपियन खंडात सुरु झाले तर हवाई प्रवास नक्कीच स्वस्त होईल.) मात्र नुकतेच लुफ्तांजा ने म्युनिच आणी फ्रांक फ्रुट ते दिल्ली ह्या वाढत्या हवाई प्रवासाठी ह्या सुपर जंबो विमानाची निवड केली. पण दुर्दैवाने आपल्या कडून ही मागणी साफ नाकारल्या गेली ( आणी ह्या विमानाचे भारतातील आगमन बोंबलले )
आपल्या हवाई मंत्रालयाच्या मतांसार बोईंग चा विमानापेक्षा जास्त १४९ आसन शमता जास्त असलेले हे सुपर जंबो भारतात आले तर भारतीय कंपन्या ज्या ७०% बोईंग वापरतात त्यांचावर विपरीत परिणाम होईन. किंग फिशर ने ह्या विमानाची २००८ मधेच ओर्डेर दिली होती मात्र आता त्यांचा निर्णयावर पुनर्विचार करायला त्यांना भाग पाडले जात आहे.( अजून एक कारण आपले विमानतळ ह्या विमानाच्या लायकीचे नाही हे कारण दिले जाते )

मात्र एरबस खुद हे आरोप नाकारते. दिल्ली विमानतळ हे ह्या सुपर जंबो साठी सर्वथा योग्य आहे. तर बाकीच्या प्रमुख विमातळावर काही तांत्रिक बदल केले तर ते सुद्धा कार्यरत होतील. काही खरी कारणे ,, हि आहेत. ( आता मुंबई विमानतळ जर स्वतःचा हक्काच्या जमिनीवरील बांगलादेशी व इतर उपर्या लोकांचे निवासस्थान मानवी हक्काचा उदार दृष्टीकोनातून ( काही दुष्ट लोक त्याला मताचे राजकारण म्हणतात ) हटवू शकत नाही.

तरी नवीन मुंबईत नवीन विमानतळ उभारतांना ह्या सोयी नक्कीच देऊ शकतात.( जगातील सर्वोत्तम असा फोर्मुला १ चा ट्रेक आपण बनवू शकतो त्याचा शेजारी भविष्यात जेपी ग्रुप क्रीडा नगरी ज्यात १ लाख आसन क्षमतेचे क्रिकेट स्टेडीयम बनवण्याची योजना राबवत आहे ) उभारली जात आहे तेथे अद्यावत विमानतळ बांधणे काहीच अवघड नाही.

मात्र जर भारतीय कंपन्या जर एरबस कडून अ३८० विकत घेऊ लागले तर बोईंग च्या भारतातील बाजार पेठीला प्रचंड धक्का बसेल.

भारतीय प्रवाशांचे काय ?
त्यांना हवाई प्रवासाची खाज असेल तर तर चार दिडक्या जास्त देतील.) जगातील सर्व प्रमुख हवाई कंपन्या आता ए ३८० ला पंसती देत आहेत. २००३ पासून एरबस ला बोईंग पेक्षा जास्त ओर्डेर संपूर्ण जगातून येत आहेत. आम्ही मात्र अजूनही...

बोईंग कशाला ३८० च्या तोडीस तोड विमान बनवेल. आपल्या सारख्या देशातील एकनिष्ठ बाजारपेठ त्यांचा दिमतीला आहेतच. म्हणूनच त्यांनी विधर्भात  कारखाना काढून दिला. थोडक्यात मुक्त बाजारपेठेत तुम्ही मात्र आम्ही देऊ ती विमाने आम्ही  मागू त्या किमतीत विकत घ्या.
आज एमिरात व लुफ्तांजा ह्यांना भारतात हे विमान आणायचे आहे. मात्र एमिरात ने हे विमान आणले तर व जेट ला सुद्धा हे विमान घ्यावे लागेल नी मग एर इंडिया ह्या पांढर्या हत्तीला सुद्धा  ..
..पण त्याने भारत ते आखात प्रवास केवढा स्वस्त होईन व्यापार नी पर्यटन किती पटीने वाढेन. ह्याचा विचार कोण करेन.

त्या दुबई ची एमिरात किंवा अबुधाबी ची etihad किंवा साउथ कोरियन ह्या अमेरिकन धार्जिण्या देशांनी सुद्धा ए ३८० ला पसंती दिली. मात्र आम्ही अजूनही स्वतःची लायकी असून जगाच्या मागे राहत आहोत.जगातील हा हवेत तरंगत्या महालापासून भारतीयांना वंचित ठेवत आहेत.  .
आज प्रमुख युरोपियन राष्ट्रांनी एकत्र येऊन जसे हे जंबो जेट बनवले तसे बोईंग ने भारत किंवा चीनशी हातमिळवणी करून एखादे नवीन विमान बनवले तर मग सकस स्पर्धा निर्माण होईल. असे वाटते.
अमेरिकेने भारताला नैसर्गिक मित्र मानलेच आहे. तेव्हा भारताकडे नुसती बाजारपेठ म्हणून न पाहता आर्थिक व सामरिक मित्र बनवून घ्यावे. सध्याचे जग जोइंत वेंचर चे आहे.

अवांतर किंवा उपसंहार
ह्या बाबतीत एक उदाहरण द्यावेसे वाटते. ५ व्या पिढीतील लढाऊ जेट विमान फक्त आजतागायत अमेरिकेने विकसित केले होते. पण ते जरी सर्वात विकसित असले तरी त्यांची देखभाल करणे म्हणजे पांढरा हत्ती पाळणे होते. साहजिकच मंदीच्या लाटेत सर्वात पहिले ते अमेरिकेने तत्कालीन सेवेतून काढून टाकले. आता चीन ह्या पद्धतीत विमान विकसित करत आहे. तर भारत व रशिया संयुक्त रीत्या ह्या विमानाची निर्मिती करून २०१७ पर्यत ते उडण्यास सज्ज करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन विमानापेक्षा ते खर्चाचा व गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरणार आहे.( त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवावासा वाटतो.कारण ब्रामोस ह्या जगातील एकमेव सुपेर्सोनिक क्षेपणास्त्र  जे ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगवान बाबतीत त्यांचे सर्व दावे कसोटीस खरे ठरले होते.)

अजून एक मुद्दा असा आजतागायत जगभरातील विमान कंपन्यांना बोईंग आणी एअरबस ह्या दोनच प्रमख कंपन्या पर्याय आहेत.

रशियन चीनी कंपन्या प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यश मिळत नाही.
भारत व आशियातील काही प्रमुख राष्ट्रे सिंगापूर ,इंडोनेशिया ,जपान जमल्यास चीन व रशिया ह्यांनी एकत्र येऊन विमान उत्पादन केले तर ते नक्कीच सरस ठरेल कारण तिसर्या देशातील स्वस्त व कुशल मजदूर आणी बरेच फायदे त्यांना मिळतील
मी काही बोईंग ह्य अमेरिकन कंपनीला विरोध किंवा द्वेष करत नाही आहे. मात्र जगात विमान बांधणीत सकस स्पर्धा निर्माण झाली तर सर्वोत्तम उत्पादन निर्माण होईल व आम्ही अनिवासी भारतात येतांना हवेतील रंगमहालात मस्तपैकी तरंगत येऊ.

५ टिप्पण्या :

  1. अभ्यास चांगला आहे. लिहिलेलेही छानच आहे, निनाद तू लिहितोस 'चौफेर' ! तुझ्या लेखनाला आणि तुझ्यातल्या लेखकाला मनोमन दाद दिली.

    पण एक खरे कि जगात जेव्हा जन्मतात तेव्हा आमच्याकडे राम, सम्राट अशोक किंवा बापू होतात.

    जे काही उमजलं नाही ते नंतर केव्हातरी वेळ आल्यावर...किंवा समक्षच समजावून घेईन.

    -पराग

    उत्तर द्याहटवा
  2. विमान उत्पादन करणे शक्य आहे. भारतीय लोकं फार छान कॉपी करू शकतात, पण नवीन डेव्हलपमेंटच्या नावाने बोंब आहे. स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी मधे आपण मास्टर आहोत. हेच कारण आहे की आज एकही कार भारतीय बनावटीची नाही. मोटरसायकल्स तर चक्क डिझाइन कॉपी किंवा चांगल्या भाषेत रिव्हर्स इंजिनिअर्ड आहेत.
    मध्यंतरी एका डबलडेकर प्लेन बद्दल वाचलं होतं, त्याचंही काय झालं पुढे ते समजलं नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. महेद्र काका
    अगदी बरोबर अनुकरण करणे आपल्याला आपली शिक्षण पद्धत शिकवते. एखादा कुलकर्णी किंवा जोशी कुटुंबात जन्माला आला तर त्याने अभियांत्रिकी शिक्षण आणि त्या नंतर हौस आणि लगेच रोजगार मिळाला नाही तर व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेणे हे अपरिहार्य असते. नाहीतर जणू समाज वाळीत टाकेन.
    थोडक्यात एखद्याला त्याला रुची असलेल्या विषयात शिक्षण घेण्यास प्रवूत्त करण्यापेक्षा एखादा व्यक्ती कोणत्या समाजात जातीत अगर पंथात जन्माला आहे त्यावर त्याने कोणते शिक्षण घ्यायचे हे ठरत असते.
    त्यातच भाईंच्या भाषेत आपली शिक्षण पाद्ध्द्ती म्हणजे गप्पा बसा, प्रश्न विचारू नका थोडक्यात मेंधरी वृत्ती चे पाईक बनविणारी आहे. स्वातंत्र्या नंतर आपल्याला विज्ञानात व कोणत्याही इतर विषयात नोबेल मिळवता आले नाही. आपल्या लोकांनी परदेशात राहून संशोधन करून ती मिळवली.
    मग काय होणार.
    भारतात व्यवसाय किंवा संशोधन करणे महा जिकरीचे काम.
    मात्र आहे ती परिस्थिती बदलता येत नाही म्हणून त्यत सुवर्ण मध्य म्हणजे एखद्या प्रगत देशात जर संशोधनासाठी पोषक वातावरण असेल तर आपण एखाद्या प्रकल्पाचा आर्थिक भार उचलावा व आपले भारतीय क्रीम ह्या प्रकल्पात राबवावे म्हणजे जगातील आदिवित्य जसे ब्रमोस सारखे प्रोडक्ट बनविता येईन.
    अवांतर
    सध्या तरी अमेरीक्तून उर्जा संशोधक आपल्या भूगर्भातून कोणती उर्जा काढणार आहेत ह्याकडे चित्त आणि डोळे लागून राहिले आहे.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips