हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, १५ एप्रिल, २०१५

नारायणअस्त की नारो भरारी



सामान्य माणूस मोठ्या मेहनतीने एखाद्या कंपनीचा सी इ ओ झाला व त्याने मेहनतीने कंपनीच्या कारभाराचा गाडा हाकला पण दुर्देवाने त्याचा अकस्मात मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देईल मात्र त्याच्या पत्नीला कंपनीचा सी इ ओ बनवेल की एखाद्या कर्त्या व्यक्तीस संधी देऊन कंपनीचे भवितव्य सुरक्षित ठेवेल

राजकारण असे गजर्कर्ण का आहे ज्या सर्व पक्ष लायक उमेदवाराची संधी नाकारून जनतेच्या माथी घराणे लादतात .
मग नेहेरु व गांधी घराण्याला शिव्या घालण्याचा काय नैतिक अधिकार उरतो
वर्षभर मनसोक्त टीका व शिव्या देऊन आपल्या मित्र पक्षाची निवडणुकीत मदत घेऊन विजय साजरा करणे ह्यालाच खरे राजकारण म्हणतात.
राण्यांचे दुर्दैव असे की ओविसी आघाडीच्या मुळावर उठला आहे व मराठी मताचे विभाजन मनसे व भाजपने टाळले.
मोदींचे आश्वासक नेतृत्व व देवेंद्रचा संथ तरी स्थिर व भ्रष्टाचार विना सुरु असलेला राज्य कारभार जनतेला भावलेला दिसत आहे. ह्यावेळी मनसे ने उमेदवार दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते , सुडाची भावना मनात ठेवून सुडाचे कपाटाचे राजकारण भाजपाने केले असते तर चित्र नक्की वेगळे दिसलं असत. किंबहुना भाजपचा असा मनसुबा असता तर  ह्या राजकीय साठेमारीत  मनसे ने कदाचित उमेदवार देऊन आपले राजकीय भवितव्य आजमावले असते.
 भ्रष्टाचारविरहित   उच्चशिक्षित ओविसी जी प्रतिमा त्याला भडकाऊ विधाने करणाऱ्या भावाची साथ ह्यामुळे भारतातील तमाम मुस्लिम मतांचे दृविकरण करण्याचा त्यांचा मनसुबा आहे , ह्यात सेक्युलर च्या नावावर आपल्या  तुंबड्या भरणाऱ्या हरामखोर पक्षांचे अतोनात नुकसान आहे , मागच्या विधान सभेत अएङ्क गुंड स्मगलर राजकारणी ओविसी च्या मुले जे मत विभाजन झाले त्यामुळे अनेक वर्ष सत्ता भोगून शेवटी एकदाचे पडले ,ह्याच्याबद्दल खरे तर त्याचे आभार मानले पहिले
ह्यावेळच्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत परप्रांतीय
मते भाजपला मराठी मते भाजप व सेनेला प्रामुख्याने जातील तर मुस्लिम मते ओविसी च्या पक्षाला जातील.
समाजवादी व इतर पक्षांचा सुपडा साफ होणार ह्यात शंकाच नाही

महाभारत आपण नारायण अस्त्र पहिले होते आता कलियुगात नारायणअस्त पाहिला मिळणार की फिनिक्स च्या जिद्दीने राखेतून नारोभरारी पाहण्यास मिळेल हे काळच ठरवेल.
सेनेने पंकजा मुंडे ह्यांना मागच्या निवडणुकीत की मदत केली त्याची सव्याज परतपेढ भाजपने ह्यावेळी केली ,
आता ह्या खेळीमेळीच्या राजकारणात जैतपूर प्रकल्प मार्गी लागला तर सोन्याहून पिवळे होईल
ह्यावेळी मुसलमानांनी मत सेनेकडे पाहून दिले कि भाजपकडे
हा कळीचा मुद्दा आहे.

२ टिप्पण्या :

  1. नुसते परिस्थितीजन्य तुलना करायची झाली तर राणे ह्यांची तुलना मी संभाजी राजे ह्यांच्याशी करेल. वाघाच्या गुहेत ते शिरले ,
    त्यांना युतीची थेट सामना होता, जुने मतभेद रुसवे फुगवे सौन त्यांनी एकी दाखविली. मनसे एन वेळी तटस्थ राहिली. दक्षिणेतून गनीम चालून आला आणि स्वकीयांनी आतून अंदाज असल्याप्रमाणे दगाबाजी केली.
    मनसे चे धोरण
    धोरण कळत नाही , कुणी उमदेवार वारला आणि त्यांचा वारसा हक्काने कुणास निवडणुकीचे तिकीट मिळाले. तर तुम्ही तुमच्या वतीने योग्य उमेदवार देणार नाही , दक्षिणेतून गनीम चालून आला आणि स्वकीयांनी आतून अंदाज असल्याप्रमाणे दगाबाजी केली.
    म्हणजे ज्या घराणेशाहीला कंटाळून तुम्ही नवीन पक्ष स्थापन केला तोच पक्ष आता घराणेशाही ला म्हणजे कर्तुत्वा पेक्ष्या वारसा हक्काला प्राधान्य देणार असेल तर जनतेला तुमच्याकडून कर्तुत्ववान अनुभवी युवा नेतृत्व कसे मिळणार.
    लालूच्या जागी राबडी आली तर त्यास नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.
    खुद घराणेशाही ला कंटाळून दुसर्‍या घराणेशाहीच्या पक्षात जाऊन स्वतः घराणेशाही करून आता एकदम विकासाच्या गोष्टी करणे म्हणजे ... असो
    घराणेशाही चिरायू होवो ,
    बलशाली भारत होवो ,विश्वात शोभूनी राहो

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips