हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २३ मे, २०१५

.तन्नू वेडस मन्नू रिटर्न्स

.तन्नू वेडस मन्नू रिटर्न्स पाहिल्यावर पहिले काय केले तर परत
तन्नू वेडस मन्नू पहिला.
सिक्वेन्स हा मूळ सिनेमाच्या पेक्ष्या सरस बनू शकतो ही केवळ अंधश्रद्धा आहे असे वर्षोवर्ष माझी समजूत होती.
पण ती ह्यावेळी पार मोडीत निघाली .हा सिनेमा का पहावा
ह्या सिनेमात आधीच्या भागात पहिले ते सर्व काही आहे पण  महत्त्वाचे  म्हणजे ह्या सिनेमातील प्रत्येक प्रसंग त्यातील व्यक्तिरेखा त्यांचे संवाद ह्यांच्याशी कधी आपण स्वतःला रिलेट करतो हेच कळत नाही. 
आता हा सिनेमा किती चांगला त्याची बलस्थाने काय हे सांगण्याच्या निमित्ताने सिनेमाची संपूर्ण कथा येथे अजिबात सांगणार नाही ,पण हा सिनेमा पाहून जर तो तुम्हाला आवडला नाही तर येथे बिनधास्त येउन मला लाखोलि वहा.
ज्याची वेळ येणार नाही म्हणा
आणि कंगना
आग बाई असा अभिनय वैगैरे नसतो करायचा.
इतरांच्या पोटावर लाथ मारू नये
नेशनल अवॉर्ड वैगैरे तुझी मक्तेदारी नाही आहे. ह्याची जाणीव ठेवू थोडा रुक्ष , निरस, कंटाळवाणा  म्हणजे अनुष्का ने केला बॉंबे वेल्वेट मध्ये तसा अभिनय करायचा असतो ,त्यांनी काही सिनेमाची कारकिर्द संपत नाही , प्रत्येक सिनेमा हा आपल्या आयुष्यातील शेवटचा सिनेमा आहे असे समजून झपाटून जाऊन अभिनय नसतो करायचा.
 सर्वोत्तम माणसाने आपली तुलना व स्पर्धा आपल्याशी करायची असते.
तू क्न्विन  च्या  तुझ्या अभिनयाशी स्पर्धा केली.
बाकी अप्रतिम पटकथा , चुरचुरीत मार्मिक संवाद खुसखुशीत अभिनय आणि चटपटे संगीत ह्याची सुंदर भेळ म्हणजे तुझी कलाकृती आहे ,
सर्व समीक्षकांनीही एकमुखाने गौरविलेल्या तुझ्या सिनेमावर   व शुक्रवारी त्यावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहर लावलेली आहेच
आणि काय लिहू
अनुराग कश्यप ..................
रामूच्या आगीला खदखद फिदीफिदी हासला, पण प्रत्येक निर्माता आयुष्यात एक तरी आग बनवतो करण ची माय नेम इज घाण असो किंवा तुझा बॉंबे वेवेट
अनुराग च्या बाबतीत मात्र एक गाणे आठवले ,

कोण होतास तू काय झालास तू
अरे जोहर च्या नादात वाया गेलास तू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips