हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

प्रादेशिक पक्षांचा नमो फोबिया

शिवसेनेने पूर्वीपासून मोदींना विरोध केला अगदी त्यांच्या पंत पंतप्रधानपदाच्या उमेदवारी पासून , त्यासाठी स्वराज ह्यांचे नाव पुढे तर अडवाणी गटाला पाठिंबा ,जरा विचार करा जर मोदींच्या जागी अडवाणी किंवा स्वराज ह्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली असती तर जास्तीतजास्त २००९ पेक्ष्या काही जाग जास्त मिळाल्या असत्या. मात्र पुढे सत्ता स्थापनेच्या घोड्बाजारात जर युपिए ला यश मिळाले असते तर राहुल पंतप्रधान झाले असते. त्यावेळी भाजपने योग्य निर्णय घेतला आजही शिवसेनेची युती तोडून योग्य निर्णय घेतला , एकत्रित सत्ता स्थापून पुढे भाजपला मनस्ताप देणारा अजून एक नितीश कुमार त्यांना बनवायचा नव्हता
, विशेषतः मोदींना दरवेळी प्रत्येक गोष्टींसाठी आपल्या लोकांना मातोश्रीवर पाठविण्यात रस नव्हता.  गडकरी व मोडी ह्यांच्यात एकमेव राजकीय समान मुद्दा म्हणजे शिवसेनेपेक्षा स्वबळावर राज्यात लढणे आज राज्यात भाजपची एकट्याची शक्ती केवढी ह्यांचे मूल्यांकन अजून नक्की कोणी अगदी पूर्वीच्या भाजप नेत्यांनी केले नाही. तशी कधी वेळ आली नाही. माझ्यामते हनुमानाला आपल्यातील सुप्त शक्तीची जाणीव नव्हत जी समुद्र उल्लंघन करतांना प्रभू राम चंद्राने त्यास करून दिली तशीच जाणीव भाजपला नमो ह्यांच्यामुळे झाली , एक राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक दर्जाचे नेतृत्व असल्यावर प्रादेशिक पक्षांचे नखरे का सहन करायचे असा प्रश्न उभा राहतो.

 ह्या आधी महाराष्ट्रात एकदाच सत्ता मिळाली त्यानंतर युतीचे राज्य संपल्यावर महाराष्ट्रात गेली १५ वर्ष जनतेने युतीला परत सत्ता हातात दिली नाही. महाजन,मुंडे, बाळासाहेब नंतर उद्धव त्यांच्यातून बाहेर पडलेले राणे , राज हे सर्व युती मध्ये होते , त्यावेळी युतीच्या सभेत हिंदीतून बोलणारे दिल्लीतील अडवाणी वाजपेयी हे नेते सुद्धा होते तरी हे शक्य झाले नाही किंबहुना शिवसेनेतून राज व राणे बाहेर पडले आघाडी सरकारचे नशीब चांगले की केंद्रात व राज्यात अत्यंत निष्काळजी व बेपर्वा ,अकार्यक्षम सरकार असून सुधा महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कौल दिला ह्याचे एकमेव कारण आहे ती परिस्थिती बदलून आपले आयुष्य बदलून टाकण्याचे कसब युतीच्या नेत्यांमध्ये आहे ह्याची जनतेला खात्री नव्हती कारण साफ होते , युतीच्या काळातील भ्रष्टाचार , दोघांच्यात भांडण रुसवे व सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भ्रष्टाचार.


 २००९ ला उद्धव व अडवाणी ह्यांनी केंद्रात व पुढे राज्यात मनासारखे जागावाटप केले व हातात काय आले घोर निराशा त्यावेळी बाळासाहेब होते आज ते हयात नाहीत. आता २००९ मध्ये जे साध्य झाले नाही ते आता शिवसेना एकट्याच्या जीवावर साध्य करू पाहत होते. उद्धव ह्याच्यासोबत ह्यावेळी आदित्य आहेत हाच काय तो बदल ह्याउलट भाजपकडे काय आहे , उत्तर आहे अडवाणी पर्वाचा अस्त व नमोंचा उदय आमच्याकडील प्रादेशिक नेत्यांना एकहाती महाराष्ट्र काबिज करता आला नाही हे कटू सत्य आहे , दक्षिणेतील नेत्यांना ते जमले अगदी ममता ला सुद्धा बंगाल मध्ये जमले. त्याचवेळी गुजरात चा एक प्रादेशिक नेता एकहाती सत्ता जिंकतो ती टिकवितो पुढे तो राष्ट्रीय स्तराचा नेता होतो तेथेही एकहाती सत्ता जिंकतो ज्या दिल्लीत आमचे सर्व पक्षीय नेत्यांना उपर्याची वागणूक दिली जाते ज्या दिल्लीत सर्व पक्षातील हिंदी भाषिक नेत्यांचा बोलबाला आहे तेथे नमो व शहा ह्यांनी आपले बस्तान बसवले. एका सामान्य घरातून आलेल्या नेत्याने असे यश मिळवणे ही भारतीय राजकारणातील पहिली घटना आहे ह्याआधी असा राष्ट्रीय नेत्या इंदिरा हो त्या ज्यांना पद वारस हक्काने मिळाले ,वडिलांच्या पुण्याईवर आपल्या चव्हाणांना डावलून मिळाले. आज महाराष्ट्रात जर नमो येउन हिंदीतून भाषण दिले तर मराठी अस्मिता कुठे दुखावली , ह्याआधी नेहरू , इंदिरा राजीव वाजपेयी अडवाणी हे हिंदीतूनच भाषण द्यायचे त्यावेळी महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना कधी काही बोलावेसे वाटले नाही. मुळात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना विरोध करणे व आमचे आम्ही बघून घेऊ असे म्हणायला महाराष्ट्र ही प्रादेशिक पक्षांची जहागिरी नाही. नमो काहीतरी चांगले करतील ह्यावर आधी गुजरात च्या व नंतर देशाच्या जनतेला विश्वास वाटतो ह्या जनतेच्या विश्वासाला घाबरून सध्या नमोंवर वाट्टेल ते आरोप करणे चालू आहे.

 आज केंद्रात निवडणूक न लढवता जावडेकर मंत्री आहेत तर गडकरींच्या हातात महत्त्वाची खाती आहेत. मुंडे सुद्धा मोठ्या पदावर होते. अश्यावेळी प्रथमच हिंदी भाषिकांच्या पेक्ष्या महाराष्ट्र केंद्रात मजबूत दिसत आहे. आठवा तो युतीचा काळ केंद्रात बिन महत्त्वाची खाती मिळाली म्हणून रुसणारे शिवसेनेचे नेते व त्यांच्या मागून आलेल्या जयललिता व अम्मा ह्यांचा केंद्रात दबदबा , मातोश्रीवर येउन मनधरणी करायची व केंद्रात तोंडाला पाने पुसायची , पद्धत होती , आज केंद्रात मराठी टक्का चांगला आहे. जर भाजपला संघ आपल्या तालावर नाचवतो असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. ह्यात आरोपात जर एक टक्का जरी सत्य असेल तर तर संघ प्रमुख हे मराठी असून त्यांचे कार्यालय हे महाराष्ट्रात आहे हे विसरून चालणार नाही , उद्या नागपूर हे दिल्ली व मुंबई पेक्ष्या महत्त्वाचे सत्ता केंद्र झाले तर ह्यात महाराष्ट्राचा गौरव नाही का 

 उभी हयात घराणेशाहीला शिव्या प्रत्यक्षात घराणेशाही पक्षात आणणे त्यातून आपल्याच बालेकिल्ल्यात पराभव पत्करणे शिवसेनेच्या नशिबी आले ,उभी हयात भीम शक्ती सोबत महाराष्ट्रात राडे केले पुढे सत्तेसाठी त्यांच्याशी हातमिळवणी केली अशीच हातमिळवणी युतीच्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली , मंडळ राजकारणाला कमंडळ उत्तर शोधणाऱ्या तत्कालीन भाजपला त्यावेळी शिव सेनेची साथ मिळाली तेव्हा हेतू सत्ता मिळवणे हा होता ह्या लोकांनी हिंदुत्वासाठी देशात काय केले राम मंदिर मुद्दा मग मशीद पडणे मग दंगल व मग बॉंब स्फोट हे सगळे सत्तेसाठी , मग दोन्ही कडे सत्ता आल्यावर ह्यांचे खरे रूप जनतेला कळले पुढे मोदी राष्ट्रीय राजकारणात येई पर्यंत ह्या युतीची सर्वच शेत्रात निराशाजनक कामगिरी होती.  मात्र नमो ह्यांच्या आगमनानंतर सारेच चित्र पालटले. भावनिक मुद्दे टाळून विकासावर भर दिला , देशाला देवालय नाही तर शौचालय हवी आहेत असा नारा देणारा नेता भारतीय जनतेने डोक्यावर घेतला. आज राज्यातील जनतेला नेत्यांच्या आडनावा पेक्ष्या काम करणारा नेता हवा आहे , जे आपापसात सत्तेसाठी भांडतात जे गर्व से कहो हम हिंदू हे असे सांगून हिंदू ऐक्याच्या गोष्टी देशाला सांगून स्वतःच्या घरात सत्तेसाठी भांडून वेगळे होतात अश्या घराणेशाहीचा शेवट झाला पाहिजे , बारामती असो किंवा मुंबई किंवा दिल्ली घराणेशाही संपलीच पाहिजे. .

1 टिप्पणी :

  1. Hello..
    Earn money from your blog/site/facebook group
    I have visited your site ,you are doing well..design and arrangements are really fantastic..
    Here I am to inform you that you can add up your income.
    Our organization Kachhua is working to help students in their study as well as in prepration of competitive examination like UPSC,GPSC,IBPS,CA-CPT,CMAT,JEE,GUJCATE etc and you can join with us in this work. For that visit the page
    http://kachhua.in/section/webpartner/
    Thank you.
    Regards,

    For further information please contact me.

    Sneha Patel
    Webpartner Department
    Kachhua.com
    Watsar Infotech Pvt Ltd

    cont no:02766220134
    (M): 9687456022(office time;9 AM to 6 PM)

    Emai : help@kachhua.com

    Site: www.kachhua.com | www.kachhua.org | www.kachhua.in

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips