हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

२ ऑक्टोबर ,, क्विट इंडिया ,स्टेटस कम्प्लीट.क्लीन इंडिया स्टेटस , इन प्रोग्रेस

एकाचा बिपी तर एकाचे विजन
अश्यावेळी कोणता झेंडा घेऊ हाती अशी द्विधा मन स्थिती होणे साहजिकच आहे.
अश्यावेळी फक्त कल्पना करा.

  ५ दिवसाच्या अत्यंत दगदगीच्या दौरा आटपून अमेरिका ते भारत हा अत्यंत लांबलचक विमान प्रवास करत उपाशीपोटी काल रात्री दहा वाजता भारतात आले
लगेच सकाळी सात च्या सुमारास राजघाट वर जाऊन गांधीजींच्या समाधी पुढे नतमस्तक झाले. व नंतर स्वच्छता अभियानाला सुरुवात केली , जो माणूस दिवस रात्र देशाचा विचार करतो. ज्याचा परिवार सारी भारतीय जनता आहे अश्या ध्येयाने प्रेरित माणसाला जेटलेग सारख्या गोष्टींची बाधा होत नाही. अश्या माणसाच्या पक्षाला सत्ता देऊन महाराष्ट्रीय जनतेने निर्धास्त व्हावे असे मला मनापासून वाटते. तुम चलो तो हिंदुस्तान चले ह्या जाहिरातीची आठवण आजच्या दिवशी झाली. मराठी परप्रांतीय असे प्राचीन काळातील जुनाट मुद्दे नव्याने उरकून काढणे चालू आहे , मुंबई वेगळी होणार अशी आवई उठवली जात आहे. पण मोदींना अजून किमान २ टर्म राज्यांच्या मध्ये व केंद्रात सत्ता हवी आहे जेणेकरून त्यांच्या स्वप्नातील भारत साकार होईल तेव्हा त्यांच्या हातून मराठी माणसाच्या भावनांना अजिबात धक्का लागणार नाही ,असे मला वाटते.
महाराष्ट्रातील घराणेशाही संपविण्यासाठी हीच सुवर्ण संधी आहे
९० च्या दशकातील जुनी घोषणा आठवली
ताई माई अक्का , विचार करा पक्का
कमळावर मारा शिक्का
 आजपर्यंत गांधीच्या फोटोंच्या तसबिरी सरकारी कार्यालयात लावण्यात आले , त्यांच्या नावाचे अनेक मार्ग आहेत , अगदी ड्राय डे सुद्धा
स्वातंत्र्य नंतर जे गांधी राजकारणात आले त्यांच्या नावांच्या अनेक सरकारी योजना नावापुरत्या अस्तित्वात आल्या.
पण नमो ह्यांनी आज खर्या अर्थाने गांधींचा विचार अमलात आणला.
आज खरेच वाटले और कूच चले ना चले देश चल पडा हेअवांतर
आमच्या मातोश्रींच्या सरकारी कार्यालयात दक्षिण भारतीय साहेब भलतेच हुशार. गेल्या आठवड्यापासून १५ मिनिटे प्रत्येकाला दिवसातून कार्यालये साफ करण्यास सांगितले. त्यामुळे आज त्या कार्यालयात जाऊन उरलेली साफसफाई करून मग स्वच्छता राखण्याची शपथ घेऊन आल्या.
त्यांचा शपथविधी सोहळा चतुर भ्रमणध्वनी वर बंदिस्त करण्यात त्यांच्या सहकार्‍यांना यश आले , असे खात्रीलायक सूत्राकडून कळले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips