हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

नुस्ता पसारा माझे सुपारी बाज राजकीय विश्लेषण

सध्या ५ डिसेंबर ला होणार्‍या मंत्री मंडळांचा विस्तार व राजकीय मानापमानाच्या निमित्ताने राजकीय परिस्थितीचा वस्तू निष्ठ आढावा घेतांना काही प्रश्न मनात आले.


मानसन्मान दिला  गेला तो पुरेसा आहे का
युद्धात जिंकले पण तहात हरले असे सेनेच्या बाबतीत म्हणतात ते खरे आहे का
गुजराती विरुद्ध मराठी अश्या मुद्द्यांवर मुंबईत लढलेल्या निवडणुकीत आता मनसे  परत आपले ९ आमदार निवडून आणू शकते का  असे प्रश्न मनात आले.

माझ्या मते खातेवाटप योग्य झाले आहे. प्रसार माध्यमांच्या टी र पी च्या मोहापायी दोन पक्षात काड्या  घालतात. त्याला दोन्ही पक्षातील असंतुष्ट नेते  बेताल वक्तव्य करून पुरेसा पूरक प्रतिसाद देतात. पण सध्या अश्या नेत्यांना त्यांची जागा दाखविण्यात आल्याने झारीतील शुक्राचार्य  नाहीसे झाले आहे. आता सत्तेच्या झारीतून विकासाची गंगा राज्यात वाहणार. एक भाबडा आशावादी आशावाद.
उपमुख्यमंत्रिपद व गृहमंत्री पद मिळाले नाही म्हणून तहात हरले असे म्हणणे बालिश ठरेल.
रोजच्या आयुष्यातील एक उदाहरण
 बाजारात     सफरचंद विकत घ्यायला गेल्यावर तुम्ही सांगितले ,कि मला अर्धा डझन सफरचंद हवी आहेत तेवढी माझ्या परिवाराला पुरेशी आहेत. पण विक्रेत्याने सांगितले की घ्यायची असेल तर सगळी घ्या तर ते व्यवहारी दृष्ट्या ग्राहका शक्य नाही. जर दुसरा पर्याय म्हणजे अर्धा डझन घ्या पण किंमत पूर्ण टोपलीभर सफरचंदाची द्या. ते सुद्धा व्यवहार्य नाही , तेव्हा सुरवातीपासून व्यवहार्य मागण्या झाल्या असत्या तर एवढे मोठे रामायण राज्यात जनतेला पाहावे लागले नसते.

सेना सत्तेत जाणार ह्या बातमी सोबत मनसे  राजकीय कोशातून  बाहेर येउन सोशल मिडियाचा वर कार्यान्वित झाली . माझ्या चेपेच्या भिंतीवर अचानक मनसे पुष्प अवतरले. विविध संदेश आणि फोटो सहित.
मुंबईचे मराठी मतदार विशेषतः साहेबांना मानणाऱ्या लोकांचे वर्तन हे काहीसे दक्षिणेतील मतदारांच्या सारखे होते. ते कसे एकाला तर एकाला मतदान करतात.  पुढच्या निवडणुकीत दुसर्‍या पक्षाला एकसाथ   मतदान करतात म्हणजे कधी जयललिता तर पुढच्या वेळी करुणानिधी तसा काहीसा प्रकार मुंबईत घडला.
९ आमदार असलेल्या मनसे ची मते ह्यावेळी सेनेकडे वळली.
गुजराती विरुद्ध मराठी अशी त्याला पार्श्वभूमी होती.
आता  सेना सत्तेत आल्यामुळे  मनसे ला विरोधी पक्ष व मराठी माणसांचा कैवार घेणे ओघाने आले. मनसे चा अजेंडा फक्त मराठी असल्याने हिंदुत्व व मराठी अशी दोन दगडांवर पाय ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागणार नाही. त्यांच्या आंदोलनाला  सरकारी बाधा विशेष पोहोचणार नाही असे मला वाटते . गृहखाते अश्यावेळी फार महत्त्वाचे ठरते.
पुढील निवडणुकीत भाजप  व सेना ह्यांना मनात असून युती करणे अशक्य होणार आहे.
 आघाडी वेगवेगळी लढली तर त्यांच्याकडे लढायला भरपूर जागा होणार व युती झाली तर तिकीट न मिळालेले  गयाराम होणार .
म्हणजे ह्या निवडणुकीत जे झाले तेच चक्र उलटे फिरू शकते.

आजकाल आयाराम गयाराम संस्कृती  हे राजकीय कटू सत्य आहे.ह्यामुळे मनसे ला पुढील निवडणुकीत मध्ये पंचरंगी निवडणुकीत  मोठी संधी आहे तिचे सोने राज साहेब करतील असे वाटते.
ह्यावेळी युतीचे आमदार जिंकून येण्यामागेही एक महत्त्वाचे कारण जे प्रसार माध्यमांनी कानाडोळा केल ते म्हणजे  आघाडीचा निष्ठावान मतदार मुसलमान व दलित त्यांच्याकडून हिरावला व त्यांनी  बसपा व एम आय एम ला  मतदान केल. एम आय एम ओ वि सी बंधू , त्यांची वक्तव्ये व जिंकलेल्या दोन जागा ह्यामुळे चर्चेत होती पण महाराष्ट्रात विशेष प्रकाश झोतात नसलेल्या मायावतींच्या पक्षाला दलितांची मिळालेली मते अचंबित करणारी होती. , येत्या ५ वर्षात ही मते युतीला आपल्याकडे आणणे  कर्मकठीण होणार आहे . आघाडी तर राजकीय   कोमात आहे .
 पण एकहाती हरयाणा जिंकणाऱ्या मोदींना महाराष्ट्र अवघड गेला.

पण पुढील ५ वर्षात देवेंद्र स्वतःच्या राजकीय पुण्याईवर महाराष्ट्र भर मते मागतील अशी आशा बाळगू या.
१९९५ च्या युतीच्या कारभारावर निराश होऊन राजकीय द्रष्ट्या विजनवासात गेलेले माझ्या पिढीचे अनेक तरुण व युवा वर्ग हे सध्याच्या भाजप नेतृत्वा बद्दल आशावादी आहे.
अवांतर
महाराष्ट्राचे किंग मेकर पवार साहेब असे चित्र प्रसार माध्यमे व सोशल मीडियात रंगवले जात होते . पण खरी सूत्रे देवेंद्र व दिल्लीतील शहा ह्यांच्या हातात होती. सेनेचा कधी योग्य मानसन्मान करायचा ह्याबद्दल कमालीची सुनियोजित राजकीय खेळी डावपेच त्यांनी लढवले.
आज अनेक सैनिक भाजपला झुकवले वगैरे पोस्ट  करतात पण
राजकारणात कधी आक्रमक तर कधी नरम पडावे लागते तर कधी आक्रमक व नरम पणाचा  आव आणावा लागतो.
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन जनतेचे मत भाजपने पहिल्या ३ दिवसात आजमावले . व आता योग्य मानसन्मान देतांना आपण याचक मोड मध्ये जाऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर नैसर्गिक मित्राला सत्तेचा मुकुटमणी स्वहस्ते चढवला असा आभास जनतेसमोर
निर्माण केला .सेना सत्तेत आली म्हणजे राष्ट्रवादीचा पाठिंब्याची गरज नाही हे सिद्ध झाले. मात्र सबळ कारणाशिवाय सत्तेतून सेना बाहेर पडली तर सरकार पडणार नाही ह्याची हमी घड्याळ देईल अशी सोय लावली. ,राज्य सभेत  सेनेचे व राष्ट्रवादीचे खासदार
भाजपला मोलाचे ठरणार .

सरत शेवटी जैतापूर , स्वतंत्र विदर्भ  ते सध्याचे विमा विधेयक याच्याविषयी कोणतेही आश्वासन न देत भाजपने याचक मोड वर.;)
राज्य कारभार सुरळीत चालविण्याच्या दिशेने दमदार पाऊल उचलले आहे.
आता भाजपला निवडणुका हव्या असतील तर  त्यांना फक्त स्वतंत्र विदर्भ व जैतापूर मुद्दे रेटावे लागतील . सेना विरोधात जाईल.
सरकार पडेल.
भाजपा सध्यातरी महाराष्ट्रात गावोगावी आपला पक्ष नेण्याच्या भूमिकेला प्राधान्य देणार त्यामुळे हे सरकार दीर्घायुषी असणार ह्यात शंका नाही ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips