हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, ११ जून, २०१२

वय हे मानण्यावर असते. Top Gun


एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?

 काही ठिकाणी नेट वर म्हणजेच आभासी जगतात अश्या प्रकरच्या वाझोट्या चर्चा मी वाचल्या. म्हणजे ह्या मोहिमेतून काय साधल्या गेले. वैगैरे .... माझ्या मते  

माझ्या मते निसर्गाची रम्य व रौद्र रूपे मानवाला नेहमीच भुलवत राहिली आहेत. कारण मानव ह्या निसर्गाचा घटक आहे. मात्र मेंदू विकसित झाल्यावर मानवाने निसर्गावर मत करण्याचा नेहमीच प्रत्यत्न केला आहे. ह्यात कधी तो विजयी तर कधी निसर्गाकडून परास्त झाला आहे.

पण अधून मधून एवरेस्ट सारख्या अवाढव्य पर्वत सर करणे किंवा इंग्लिश चेनेल पार करणे हे सर्व सामान्य माणसाच्या कुवातीबाहेरील कामे एखादा माणूस सराव ,विज्ञान व सर्वात महत्वाचे म्हणजे अमर्याद इच्छाशक्ती ह्या जोरावर पार करतो. व नथिंग इज इम्पोसिबल हे मानवाच्या प्रगतीमागील ब्रीदवाक्य व दरवेळी प्रगतीची नवनवी शिखरे काबीज करण्याची इर्षा व त्यामागील त्याच्या अथक प्रयत्नांची तेजोशालाका तळपत राहण्यासाठी अश्या मोहिमा फार मोठे काम पार पाडतात.


माझ्या सासरा अल्बर्ट ह्याला वयाच्या साठाव्या वर्षी विमानातून स्काय डायविंग करावेसे वाटले.
कारण आपण म्हातारे झालो आहोत अशी पुसट जाणीव सुद्धा आपल्या भवतालच्या लोकांना किंवा स्वतःला होऊ नये ही त्यामागील कदाचित भावना असू शकते. किंवा अजून न बरेच काही असू शकते जे मला वयाच्या ३० व्या वर्षी आता कदाचित कळणार नाही.
.
माझ्या बायकोचे त्यावेळी व आजही एकच मत होते की सुखासुखी स्वतःचा जीव धोक्यात कशाला घालायचा किंवा मराठी म्हणी नुसार उगाच विषाची परीक्षा का घ्यावी.
माझा सासरा अल्बर्ट मार्झ हे एक अजब व्यक्तिमत्व आहे .मूळ पिंड हा खेळण्याचा .लहानपणापासून फुट बॉल ची प्रचंड आवड .त्यांच्या घरासमोर त्याच्या गावातील क्लब चे मैदान आहे . त्यामुळे रोज फुट बॉल पाहत बालपण गेले .दुसर्या महायुध्धाच्या धामधुमीत वडिलांचा चेहरा पाहणे नशिबात नव्हते .ह्यांचा जन्म त्यांच्याच घरात झाला .हॉस्पिटल मध्ये जखमी लोक प्रचंड संख्येने  येत होते. त्यामुळे तेथे सामान्य नागरिकांना जागाच नसायची.वडील रशियात निकराने झुंझत होते.मोठी बहिण व आजी, आई अश्या ३ महिलावर्गात हे शेंडेफळ. त्यामुळे लाडावलेले .त्याकाळी तरुण वयात नोकरी धंद्याचे प्रथम पहा असा घराच्या मंडळीचा सल्ला डावलून साहेब फुट बॉल च्या मैदानात रमू लागले .(खेळामुळे व उमद्या व्यक्तिमत्वामुळे
पंचक्रोशीत लवकरच लोकप्रिय झाले (.महिलावर्गात विशेतः  ) वयाच्या ३०व्य वर्षी आपल्याहून १० वर्षाने लहान तरुणीच्या प्रेमात पडले .त्याच आमच्या सासूबाई अनिता .ह्या सुध्धा मेरेथोन रनर. पण फुट बोलचा तिटकारा कारण हा खेळ इतर खेळांचा गळा घोटतोय अशी समजूत.

 खेळाडू हा व कलाकार हे मनस्वी असतात. आणी माझा सासरा त्याला अपवाद नाही.
 पण त्याचे अस्तित्व हे त्यांच्या शरीरावर अवलंबून असते.म्हणजे कितीही दुर्दम्य इच्छा शक्ती असली तरी शरीर बळकट हवे. म्हणूनच हेल्थ इज वेल्थ असे म्हटले आहे. माझे सासरे ह्या बाबतीत भलतेच जागरूक, आयुष्य लाथा मारण्यात गेले (फुट बॉल ला ) आपल्या क्लबचे सुपरस्टार मग कोच अगदीच रिटायर्ड व्ह्याच्या काही वर्ष आधी शिट्या फुंकणे व कार्ड दाखवणे ( दोन्ही संघांच्या पाठीराख्याचे शिव्याशाप  कधी धमक्या तर कधी गाडीचे टायर चाकूने फाडून घेणे. ) असे  सोपस्कार पार पडल्यावर मिशिलीन कंपनीतून ते नुकतेच निवृत्त झाले. सध्या आपल्या बर्याच मोठ्या मित्र परिवारासह फुट बॉल वर चर्चा मग ग्रुप बेटिंग व पार्ट्या हे त्यांचे विश्व.
 ( बाकी बायको दोन मूली माझ्या सारखा जावई)ह्यांच्यासाठी देखील वेळ असतो.जर्मनीत फुटबॉल च्या ९ श्रेणी असतात.त्यात हे ३ र्या श्रेणीत खेळायचे  
 तर ह्या खेळाची अमाप माहिती चा  उपयोग हे किमान माजी २० खेळाडू व काही स्वतः कधी खेळले नाही तरी खेळातील स्वयंघोषित तज्ञ ज्यांना खेळातील सर्व समजते असे महाभाग ह्याचा भरणा असलेली  जेष्ठ मंडळी  प्रत्येकी २ युरो आठवड्याच्या काढतात व लोकशाही पद्धतीने निर्णय घेऊन बेट लावतात .बहुतेक वेळा जिंकतात .मग त्या  पैशाची पार्टी करतात.


येथे जिंकण्याचे व हरण्याचे सर्वात महत्वाचे म्हणजे पैसे कमाविण्यात  कोणालाच विशेष रस नाही.फक्त ज्या खेळाशी आयुष्यभर बांधल्या गेलो त्याच्याशी ह्या ना त्या निमित्ताने बांधिलकी जपणे हाच प्रमुख हेतू असतो.
.
 आपण म्हातारे झालो म्हणजे संपल सार अश्या कल्पनेचा भुंगा माझ्या सासर्याचे कुठेतरी मनोविश्व कुरतडायला लागला. (असे माझे मनोविश्लेषण आहे .)तर काही दिवसानंतर अचानक (हे सासू बाईंकडून नंतर कळले. ) कि टीवी पाहत असताना  पेराशुत ड्रायविंग अल्बर्ट ने पहिले आणि संकल्प जाहीर केला.
. माझ्या साठाव्या वर्षी मी विमानातून उडी घेणार. ( (एक बार मैने कमीटमेंट करली, फिर मे....   ह्या प्रकारात मोडणारे )

  अर्थात एकदा निर्णय घेतला कि मागे हटायचे नाही .हा त्याचा खाक्या .ताबडतोब क्लब मध्ये नाव नोंदणी झाली ..त्यांचे वय हे त्यांचा अनुभव वा आजही फिट असलेले शरीर ह्या सर्व गोष्टींमुळे आड आले नाही.
.त्यांच्या १० जणाच्या तुकडीत सर्वात वृध्द वयाने व मनाने सर्वात तरुण (बाकीचे मंदीच्या तडाख्यात नाही म्हणता पोळले होते .) होते. अर्थात ह्या सर्व घडामोडी आमच्या सासूबाई खेरीज इतर कोणालाही माहित नव्हत्या .
अखेरीस तो दिवस उजाडला सर्व प्रशिक्षित टीम क्लबच्या मैदानात पोहचली
.तिथे सर्व कोर्स मधील महत्वाच्या गोष्टींची उजळणी झाली. थोडा शारीरिक  व्यायाम अंग गरम व्हावे म्हणून करण्यात आला.
राष्ट्रगीत म्हणण्यात आले .नि मग कार ने प्रत्यक्ष विमानतळावर   प्रशिक्षित टीम पोहचली .सासूबाई प्रत्येक क्षणाच्य स्मृती हदयात नि केमेर्यात चित्रबद्ध करत होत्या .त्या मनाने खंभीर होत्या. वातावरणात .त्या   क्षणी तणाव हा एक अनिवार्य घटक होता  .बाकीच्या लोकांचे नातेवाईक सुध्धा तणाव व रोमांच ह्याच्या सीमेवर होते.


 .विमान सर्वाना घेऊन वर गेले. खालती विमान कुठे जाणार. व मैदानाच्या कोणत्या भागावर आल्यावर हि मंडळी उड्या मारणार ह्याची परफेक्ट माहिती खालील मंडळीना होती .व त्यांची तिथे जायची व्यवस्था देखील केली होती. प्रत्यक्ष तो क्षण आला .एका पाठोपाठ उड्या सुरु झाल्या. आपल्या नवर्याचा नंबर सासूबाई ठाऊक होता .म्हणून त्रिशंकू अवस्थेतील नवर्याचे फोटो काढता आले .
सासरा न्यूटन च्या नियमाला साद देत धरतीवर अवतीर्ण झाला..हे सर्व वीर जेव्हा मैदानातून चालत येत होते तेव्हा top गन सिनेमातील टोम्या सारखा  त्यांचा डौल होता. .मनात विजयी भाव होता.
 .काही क्षण अवकाशात घालवले ह्या स्मृतीचा थरार हदयात कायमचा बंदिस्त होता .आयुष्यातील पुढे म्हातारपणी आजार येणार .कदाचित अजून काही प्रसंग येतील ,त्यांना तोंड देतांना हा प्रसंग त्यांना टोनिक सारखा उपयोगी पडणार .हे नक्कीच. आम्हाला जेव्हा हे फोनवरून कळले. आम्ही तीनताड उडालोच .मी लगेच फोटो पाहून  पण असेच करणार असे जाहीर केले .  पण माझ्या साठाव्या वर्षी ) त्याच्या मित्र मंडळीनी ह्या निम्मिताने त्यांचा वाढदिवसाची त्यांना भव्य मेजवानी दिली
मी त्यांना अभिनंदांचा जो संदेश पाठवला त्याचे शीर्षक होते.
 वय हे मानण्यावर असते हेच खरे .
.



३ टिप्पण्या :

  1. आयुष्य लाथा मारण्यात गेले (फुट बॉल ला ) (हशा)!!!
    मी लगेच फोटो पाहून पण असेच करणार असे जाहीर केले . पण माझ्या साठाव्या वर्षी (हशा व टाळ्या)
    आवडला..दुसर्यांदा.. प्रथम तो मिपा वर वाचला होता.
    तुझा लिहिण्याचा एक विशिष्ट Pattern, ज्यावर तू तुझी एक वेगळी निनादीय छाप सोडतोय... चालू दे...

    उत्तर द्याहटवा
  2. मनापासून धन्यवाद ( असे लिहिण्याची पध्धत आहे )
    जगात आणि भारतात प्रसारमाध्यमे त्यांचे दुकाने चालविण्यासाठी सतत नकारात्मक पत्रकारिता करत असतात. तेव्हा आजूबाजूचा भ्रष्टाचार आणि इतर अनेक मुद्यांनी आणि दैनंदिन आयुष्याच्या रहातगाड्यात जीव कधी कधी नकोसा होतो. अश्या वेळी
    आपल्याच भोवतालच्या माणसांकडून काही होकारात्मक कृतींना अनुकरण करणे व त्यांचे अनुभव शेअर करणे मला वाटले म्हणून ही पोस्ट

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips