हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, ६ जून, २०१२

आयटी युगातील मराठी संस्थळ आणि मराठी माणूस

इंटर नेट (  आंतरजालिय महाजाळ) म्हणजेच आंजा   जसे जसे जगभरात लोकप्रिय होऊ लागले. तसे जग एकाच व्यासपीठावर येऊ घातले गेले. वसुधैव कुटुंबं किंवा ग्लोबल सिटीझन ही संकल्पना मूळ धरू लागली. जगाच्या कानाकोपर्यातून समविचारी माणसाचे कंपू मग इंटर नेट च्या आभासी जगतात भेटू लागले. कधी चेट रूम कधी फोरम तर कधी थ्रेड्स तर कधी कम्युनिटी
ह्यांना जोडणारे महत्वाचे कारण म्हणजे धर्म ,भाषा , राष्ट्रं किंवा एखदी मानसिकता
किंवा एखादा विचार. वपुर्झा मध्ये वपू म्हणतात त्या प्रमाणे आपण का लिहितो? ह्याचे एकमेव कारण मला जग किंवा एखादा विषय समाजाला उमजला आहे हे सार्यांना कळावे म्हणून.

भारतात विचारवंत व बुद्धीजीवी व वादविवाद प्रवीण समूह प्रामुख्याने दोन
बंगाली ,मराठी 


ह्यामुळे आयटी व संगणक साक्षरता ह्या दोन्ही मुद्यांवर मराठी माणूस बर्यापिकी आघाडीवर आहे. जगाच्या कानाकोपर्यात मराठी माणूस अनेक मोठ्या पदांवर अनेक वर्षापासून राहत आहे तर मराठी माणसाचा हा ओघ जगभरच्या कानाकोपर्यात पसरत आहे. व त्याच बरोबर मायमराठी चा गंध आता परदेशात दरवळत आहे. अश्यावेळी इंटर नेट मुळे एक महत्वाचा फायदा असा झाला की सामान्य माणूस आपल्यातील कवी ,लेखक आंजा चा माध्यामतून अभिव्यक्त करू लागला. आपले विचार आणि प्रतिभा त्याला नेट  वर मोफत प्रकाशित करता येऊ लागली. आणि सामान्य माणूस स्वतः चे विचार व मानसिकता व मत ह्या आभसी जगतात मुक्तपणे प्रसवू लागला.  व त्यास जगभरातील समविचारी  मंडळींना   पाठिंबा लाभला व ह्यातून आंजावर मैत्री विकसित होऊ लागली.

 ह्यातून निर्माण झाल्या मराठी कम्युनिटी म्हणजेच मराठी संस्थळ 
देशापासून दूर असलेल्या अनिवासी बांधवांना किंवा परप्रांतात   राहणाऱ्या मराठी बांधवांना मायमराठी ची नाळ जोडून धरण्यात तू नळी ( यु ट्यूब ) सोशल नेटवर्क जसे( चेहरा पुस्तक( चेपू ) म्हणजेच फेसबुक किंवा गबोल (जी टोक ) सारख्या घटकांचा महत्वाचा वाटा आहे.
आता मराठी संस्थळ आली म्हणजे मराठी माणसाचे जगभरातून तेथे राबते सुरु झाले , आभसी जगतात नित्यनियमाने मैफिली ,चर्चासंत्रे, कट्टे भरू लागले. व मराठी असल्याने साहजिकच कंपूबाजी ,गटबाजी , खेकडी वृत्तीचे प्रदर्शन होऊ लागले. जातीय वादास जात नाही ती जात ह्या उक्तीनुसार ह्या जागतीकरण्याच्या
युगात नवीन परिमाण लाभले. जातीय कम्युनिटी स्थापन झाल्या व ह्यातून सुरु झाली दुसर्या जातीच्या ,वर्गाच्या समुहावर चिखलफेक ह्याचे दुसरे रूप म्हजे राजकीय पक्ष ,नेते धर्म व देव ह्यांना वाहिलेल्या कम्युनिटी -
येथे प्रत्येक जण मेरी कमीज से भला तुम्हारी कमीज सफेद कैसी ह्या जाहिरातीच्या  टेग लाईन नुसार दुसर्या प्रव्रुती ,विचारधारा ,मानसिकता ह्यावर यथेच्च निंदा करू लागले. अर्थात नाण्याची दुसरी बाजू म्हणजे मराठी माणूस एकत्र आला. त्यांचे वैचारिक , आर्थिक आदानप्रदान सुरु झाले. आयटी च्या जगात व युगात माहितीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आणि हीच माहिती मग कोणत्याही विषयावर आधारित असो मराठी माणूस प्राप्त करू लागला.

ह्या आभसी जगतात मराठी संस्थळावर माझा गेली ३ वर्ष वावर आहे. व ह्या वर्षी ब्लोगिग सुरु झाले आहे. तेव्हा आज माझा मराठी संस्थळावर वावर , सक्रीय सहभाग मर्यादित झाला आहे. पण मूकवाचक म्हणून माझी तेथे नित्यनियमाने हजेरी असते. तेथील घडामोडीवर बारीक लक्ष असते.
तेथील ३ वर्षाच्या वास्तव्यात मला माझ्या खाजगी आयुष्यात मराठी संस्थालांचा काय व कसा फायदा झाला हे माझ्या पुढील पोस्ट मध्ये लिहीन.
जय हिंद ,जय महाराष्ट्र
व जय जर्मनी

२ टिप्पण्या :

  1. मित्रा निनाद, संकल्प खरोखरच स्पृहणीय आहे. तो तडीस नेण्यास तुला वेळेची वारेमाप उपलब्धी लाभो ही शुभेच्छा!.

    उत्तर द्याहटवा
  2. वेळेची उपलब्धी
    मला तेजाब मधील अनिल कपूर मंदाकिनी ला सायकोलोजी ची शिकवणी देण्याच्या वेळी म्हणतो " टायम होता नही हे , निकालना पडता हे.

    दिवसभराच्या दैनदिन रहाट गाड्यातून फुरसतीचे काही क्षण मिळाले की
    मायमराठी काही ओळी लिहिल्या कि माझा बालपण , संस्कार , आणि माझा महाराष्ट्र , मुंबई , डोंबिवली ह्यांच्या संधर्भात असलेल्या माझ्या सार्या आठवणी ,जाणीव , संवेदना
    माझ्या रंध्रातून ,रोमारोमातून , श्वासा श्वासातून वाहू लागतात.

    त्यात तुझ्या सारख्या दिलखुलास प्रतिसाद देणाऱ्या मित्राची साथ असेल तर और क्या कहने.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips