हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, २२ एप्रिल, २०१२

महाभारत व आपण आणि तात्विक वाद

हिंदू समाजात रामायण आणी महाभारत ह्या दोन गाथा हजारो वर्ष जनमाणसात रूढ आहेत.  ह्यातही सलीम खान म्हणतात त्याप्रमाणे "महाभारतासारखे दुसरे कथानक आणी स्क्रीन प्ले जगात कुठेही आढळणार नाही". ह्यातील प्रत्येक प्रसंग व घटना हि पुढे घडणारया घटनेची नांदी आहे. एखादे पुस्तक हातात घेतल्यावर ते संपल्याशिवाय हातावेगळे करता येत नाही ,तसीच अवस्था महाभारत वाचताना किंवा आपली टीवी वर पाहतांना होते. 
म्हणुनच मला असे वाटते की रामायणा पेक्षा महाभारताचा  आपल्या समाजावर जास्त पगडा आहे. पण आपल्या वास्तविक जीवनात किंवा आभसी जगतात मुशाफिरगीरी करतांना मी अनेकदा कर्ण श्रेष्ठ कि अर्जुन हा पुणे की मुंबई ह्या धर्तीवर रंगणारा वाद पहातो.
 "कर्णाला ह्या शतकात मृत्युंजय ह्या कादंबरीने मोठा केला" अशी वक्तव्ये जर कुणी केली की
एखादा कर्णप्रेमी ( बहुदा अश्या व्यक्ती ज्यांना  आयुष्यात कोणत्या तरी बाबतीत आपली सतत उपेक्षा झाल्याचा सल उरी असतो अश्या व्यक्ती ) चवताळून उठतात. मग कोणत्याही बंगाली आणि महाराष्ट्रीय माणसाला तात्विक वाद किंवा वैचारिक मंथन करणे आवडते ह्या उक्तीला अनसरून मग शाब्दिक चकमकी लढतात. जीव्हेचे वार होतात. आणी महाभारताचे अनेक दाखले व प्रसंग दिले जातात. प्रत्येक पक्ष आपली बाजू हिराहीरीने मांडतो. 

ह्यात अनेक जण महाभारतावर लिहिलेली पुस्तके किंवा महाभारताची एखादी प्रत ही आधार मानून निकम साहेबांच्या तोडीस तोड युक्तिवाद करतात.
तेव्हा मला असा प्रश्न पडतो की खरे खुरे महाभारत नक्की कोणते ?
  महाभारत ज्यावेळी घडले तो काळ काही हजार वर्षापूर्वीचा
त्या काळी जे घडले ते व्यासांनी सर्वप्रथम लेखणीतून साकारले. आता मूळ महाभारताची प्रत कोणती? ह्यावर सुद्धा एक लेख पडू शकतो
मात्र हजारो वर्षात त्यात अनेक लेखकांनी आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेनुसार त्यांचा नजरेतून हे महाभारत लिहिले.
अलीकडच्या शतकातील उदाहरण द्यायचे तर दाजी पणशीकर ( नाट्य सम्राट पणशीकर ह्यांचे जेष्ठ बंधू व ह्या शतकातील संस्कुत भाषेचे प्रकांड पंडित .त्यांचे सामना मधील सदर खूपच वाचनीय असते )
किंवा इरावती कर्वे व शिवाजी सावंत ह्यांनी आपल्या आवडत्या व्यक्ती रेखाच्या अनुषंगाने महाभारत व त्या


तील अनेक कथानके लिहिली व ती  वाचून आज आभासी आणि वास्तविक जीवनात अनेक जण तात्विक वाद घालत असतात. मात्र एक गोष्ट साफ विसरतात कि भारताचा पुराव्याने शाबित होईल असा इतिहास माझ्या मते अशोकाने जे स्तंभ उभारले कि लेणी बनवली तेव्हापासून सुरु होतो. ( जाणकार ह्या बाबत अधिक भाष्य करतील )
ह्या आधीच्या गोष्टी म्हणजे निव्वळ दंतकथा.

ह्याचा अर्थ महाभारत व रामायण घडलेच नाही असे नाही मात्र आज आपल्याला जे माहित आहे तेच महाभारत ओरीजनल आहे हे आपण पुराव्याने शाबित करू शकत नाही. तो श्रद्धेचा भाग आहे.
एक उदाहरण देतो. टिपू सुलतान ह्या विषयो समस्त भारतीयांना म्हणजे कर्नाटक सोडल्यास काय माहित होते ह्यावर प्रवाद निर्माण होऊ शकतात. मात्र संजय खान ह्याने टीवी वर ह्या सुलतानाला ज्या रीतीने सादर केला की माझ्या बालवयात असतांना हा सुलतान म्हणजे इंग्रजांचा कर्दनकाळ ,हिंदू मुस्लीम ऐक्याचा कट्टर पुरस्कर्ता अशी एक भंपक इमेज निर्माण झाली होती.
आज पानिपतच्या लढाया किंवा पहिले, दुसरे महायुध्द, भारताची स्वातंत्र्य चळवळ ह्या विषयावर जर वाद विवाद झाले तर त्यामागील दावे हे पुराव्याने शाबित होऊ शकतील कारण ह्या घटना पाहिलेल्या व्यक्तींनी बखर किंवा लेखन करून ते कालखंड जतन केले आहे. आज पानिपत ह्या पुस्तकातील निर्मितीमागील संधर्भ ग्रंथ पहिले तर दोन्ही बाजूने केलेले लिखाण वाचून पानिपतची निर्मिती झाल्याचे कळते
.
 पुरंदरे ह्यांनी शिवचरित्र लिहितांना हेच केले आहे.उदा शाहिस्तेखान आणि तुटकी बोटे हि घटना कोणीही नाकारू शकत नाही कारण शाहिस्तेखानाची रोजनिशी हा सबळ पुरावा किंवा महाराजांचा राज्याभिशेष हि वस्तुस्थिती आहे कारण पुरंदरे ह्यांनी त्याचे बहुतेक वर्णन हे महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या इंग्रज वकिलांचे त्याच्या कंपनीला केलेले रिपोर्टिंग खुद पुरंदरे ह्यांनी लंडन मध्ये जाऊन वाचले आहे. त्यावर आधारित आहे.( आजही हॉलंड मध्ये लाखो अशी कागदपत्रे तत्कालीन भारतीय राजनैतिक घटनांवर आधारित आहेत. त्यावर जर संशोधन झाले तर नव इतिहास समोर येईन असे खुद पुरंदरे म्हणतात. नुकतेच एका विदुषीने इंग्लंड मधील वृत्तपत्रात सुरत लुटीचे वर्णन वाचून त्यावर लेख लिहिला तर अफजाखन खान व कोथळा हि भाकडकथा नसून ती वाघनखं आजही इंग्रजानाकडे संग्रही आहेत. त्यांचे काही वर्षापूर्वी मुंबईत प्रदर्शन मांडले होते.

आज पाकिस्तानात जिना ह्यांची काही हस्त लिखिते व भाषणे ह्यांचा आधार घेत असा दावा तेथील प्रसारमाध्यमे करत आहेत कि पाकिस्तानची निर्मिती हि मुस्लामांच्या अस्तित्वासाठी नव्हती.
मुळात हिंदुस्थानात मुसलमानावर म्हणजे सामान्य जनतेवर अजिबात अन्यान्य नव्हता. मात्र राजकीय व आर्थिक सूत्रे हि हिंदू लोकांकडे होती. व पंजाब व बंगाल मधील मुस्लीम बहुल प्रांतात तेथील जमीनदार व मोठ्या धेंडांनी स्वताचा प्रांत तेथे स्वतःची मोनोपोली किंवा स्वतःचे अस्तित्व निर्माण होण्यासाठी कवी इकबाल ह्यांना पाठिंबा दिला.व इक्बाल ह्यांनी ह्या चळवळीचे नेतृत्व त्यांच्या समाजातील सुशिक्षित व विजनवासात गेलेल्या जिना ह्यांना दिले. ह्याला इंग्रजांनी फुस दिली कारण साम्यवादाच्या विरुद्ध छोटी धर्मावर आधारित राष्ट्रे हा तोडगा त्यांच्या मनात होता म्हणुनच ज्यू राष्ट्र व मुस्लीम राष्ट् ह्यांना गांधी ह्यांचा विरोध होता.
ह्यांचा अर्थ गांधी साम्यवाद मानत होते असे नव्हे. ह्यावर सविस्तर परत कधीतरी

तेव्हा मतितार्थ एवढाच उदारणार्थ राज कि उद्धव ह्यावर सरस कोण ह्यावर मत मांडण्यासाठी अत्यंत योग्य व्यक्ती म्हणजे त्यांना बालपणापासून पाहणारे शिवसैनिक.
आता वृत्तपत्रातून आलेले लिखाण वाचन जर मी ह्यावर मत व्यक्त केले तर तो मूर्खपणा ठरेल.
सरत शेवटी मी वी स खांडेकर ह्यांचे उदाहरण देईन. त्यांनी ययाती ह्या कांदबरीचा शेवट मूळ पुराणातील कथेहून निराळा केला. ह्यावर झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले कि माझ्या मते ययाती ह्यांच्या व्यक्तिरेखेचे तर्क शुद्ध विवेचन केले तर जो ज्या रीतीने आपल्या जीवनात वागला असेल त्याबद्दल मी अनुमान मांडले आहे. म्हणून हि कादंबरी वास्तविकतेच्या दिशेने झुकते. व तिला जनाश्रय मिळाला.

तेव्हा माझ्यामते आज उपलब्ध असलेले महाभारत हे त्या लेखकांचे महाभारतातील व्यक्तिरेखेवर त्याकाळातील सामाजिक नितीमुल्ये ह्यांच्याकडे त्यांचा पाहण्याचा स्वतंत्र असा दृष्टीकोन आहे.किंबुना ह्यात त्या लेखकांची स्वतःची मते व विचार व त्यावर आधारित महाभारतातील पात्रांचे वर्तन अवलंबून आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी आजच्या काळातील नीती अनीती ./ न्याय ,अन्याय ह्यावरील मापदंड निकष मानून त्याकाळातील घटनांवर चर्विचरण करू नये.

आजच्या घडीला पुराणातील वांगी पुराणात ही म्हण आचरणात आणायची ठरवली तरी महाभारतातील. कृष्णाची अजरामर वक्तव्ये जसे" हाती न धरी शस्त्र मी ,गोष्टी सांगे युक्तीच्या चार व ह्या युक्त्यांच्या आधारे पांडवांनी जिंकलेले युद्ध किंवा " हा सूर्य ,हा जयद्रथ असा गनिमी कावा किंवा सध्याच्या कोर्पोरेत जगतात उपयोगी पडेन असा योग्य त्या समयी नरो बा कुंज रोबा ही धर्मराजाचे वचन
आजच्या काळात आपल्या दैनदिन आयुष्यात आचरणात आणता येते. गीता , दासबोध सारखे ग्रंथांच्या पोथ्या करून त्यावर हळद कुंकू लावून देव्हार्यात ठेवण्यापेक्षा त्यामधील विचार हे आचरणात आणले  तर आपण हिंदू धर्मात जन्मल्याचे सार्थक होईल.



२ टिप्पण्या :

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips