हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, २४ मार्च, २०१६

होळीच्या निमित्ताने एकदिवशीय सोशल मिडियाहितार्थ पाणी वाचवा फुरोगामी नौटंकी

गेल्या काही वर्षात सोशल मिडीयावर होळी किंवा इतर हिंदू सण जवळ आले कि अनेक विचार्जन्तांचे   पर्यावरणाचे   बेगडी प्रेम जागे होते,ह्यावेळी होळीच्या निमित्ताने पाणी वाचवा ही बांग  देण्यात आली आहे. तत्वतः त्यात काही दोष नाही, मात्र नन्याची दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे. ,
ज्या शेतकऱ्यांच्या साठी पाणी वाचवा मोहीम सुरु झाली.
कोणी तरी त्या शेतकऱ्याला सुद्धा समजावा

तुझे बांधव आत्महत्या करत आहेत , तुझी देखील स्थिती फारशी चांगली नाही आहे ,अश्यावेळी
वारकरी नावाचे बिरुद लावून दरवर्षी तू धार्मिक अध्यात्मिक पर्यटन करतो ,त्यात वेळेची  पाण्याची पैशांची नासाडी होते.
चंद्रभागेचे प्रदूषण होते ते वेगळच. त्यापेक्ष्या वेळेचा सदुपयोग कर हा सल्ला कोणी त्यांना देत नाही.
आपली पारंपारिक पिके घ्यायची सोडून गेल्या काही   दशकात शेतकरी प्रचंड पाणी लागणारे उसासारखी अनेक नगदी पिके घेत आहे,  त्यामुळे भुजलस्तर     कमी झाला आहे, सहकाराच्या चळवळीला राजकीय दावणीला बांधून शेतकर्याला आपल्याच जमिनीचे पाणी कमी करायला भरीत पडले जात आहे.
  आता साखरेला चांगला भाव मिळाला नाही तर पाणीही हि गेले व साखरही कडू झाली अशी अवस्था शेतकर्यांची होते.
जगात ब्राझील मधून स्वस्तात साखर उपलब्ध असतांना येथे भारतात शेतकऱ्यांना त्यांच्या साखर सम्राटांना पोसण्यासाठी सरकारने पाण्याचा अपव्यय करून निर्माण झालेली साखर मुद्दाहून जनतेच्या करातून  जास्त किंमत देऊन ती जास्त किंमतीत जनतेला विकण्यासाठी का विकत घ्यायची.
 हमी भाव मिळण्यासाठी शेतकरी आंदोलन करतो त्यातून राजकीय पोळ्या पिकवल्या जातात ते वेगळेप्रकरण आहे.
एवढी दुनियादारी करण्या पेक्ष्या जीवनावश्यक  धान्ये कमी पाण्यात पिकवून स्वताचे भले शेतकऱ्याने करायची गरज आहे.
झाले लावली तर पाणी जिरेल हे समजाऊन सांगितले पाहिजे.
. शेतकर्यांना खरच मदत करायची असेल तर वर्षभरात अनेक उपक्रम राबवता येतात.
एक दिवसाचे प्रतीकात्मक  पाण्याचे नियोजन करून मध्यमवर्गीय माणसांचे सणांच्या निमित्ताने जे काही विरंगुळ्याचे क्षण  उपभोगतो त्यात बीब्बा टाकण्याचे काम का करावे.पाण्यावाचून होळी ही संकल्पना मला उमजली नाही
पाण्यावाचून होळी खेळला तर रंगाने माखलेले अंग पुसण्यासाठी तुम्हाला अंघोळीसाठी जास्तीचे पाणी वापरायला लागणार त्यापेक्ष्या होळीच साजरी करू नका असे सांगा कि ते पुढल्या वर्षासाठी राखीव ठेवले आहे.
पाणी वाचवायचे असेल तर
बाटलीबंद पाणी कोक पेप्सी सारखी शीत पेये पिणे बंद करा.
क्रिकेट चा सामना होण्यासाठी त्या मैदानावर किती लिटर्स पाणी वाया जाते काही तासाच्या मनोराजांसाठी सबब क्रिकेट आय पी एल पाहणे बंद करा.
अजून बरेच काही करता येईल , एका दिवसाची नौटंकी व त्याची सोशल मिडीयावर फुशारक्या मारणे ह्याहून पुढे जर खरच पाणी वाचवायचे असेल बरीच मोठी लांबलचक यादी आहे.
कारण बात निकाली ,तो बहुत दूर तक जायेगी .
अवांतर
देशात संरक्षण शेत्रावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो आणि तो देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे पण त्याच धर्तीवर
शहरीभागात  मुंबई पुण्यात चैन्नई च्या धर्तीवर  पाण्याचे पुनर्वापर प्रकल्प किंवा सागरी पाण्यापासून शुद्ध पाणी बनविण्याचा प्रकल्प  जे खर्चिक असले तरी राबविवले पाहिजे.
डोंबिवली कल्याण मुंबई येथे छोट्या प्रमाणात अजून पाणी साठविण्यासाठी तलाव बांधता येतील का ह्याचा शोध घेतला पाहिजे. शहरीभागात इमारतीच्या  आवारात जागा असेल तर विहीर खणल्या तर पावसाळ्यातील पाणी साठवून वर्षभर बोअरवेल च्या सहाय्याने धुण्या भांड्याला वापरता येऊ शकते.

जाता जाता दिया मिर्झा सारख्या क दर्जाच्या बेरोजगार नटीला सांगावेसे वाटते फुटकळ प्रसिद्धी साठी
मी होळी पाण्यावाचून खेळेन सारखी वक्तव्य करू नकोस  असे आवर्जून  सांगावेसे वाटते. तुझा दुट्टपीपणा ह्यातून दिसतो जेव्हा परदेशातील खूळ आइस बकेट आव्हान स्वीकारले तेव्हा एक बदली पाणी वय घालवून आणखी ५ जणांना ५ बादल्या  पाणी वायां घालविण्यासाठी तू उद्युक्त केले व तुझा विडीयो पाहून अनेक खुळचट लोकांनी पाणी वाया घालवले ते तुझ्या गावी सुद्धा नाही
ह्याच धर्तीवर हे सुद्धा सांगू शकतो
जर्मनी मध्ये होळी सण जर्मन आणि युरोपात  जगभरात   ठिकठिकाणी  त्यांच्या पद्धतीने साजरा करतात त्यात पर्यावरण पूरक रंग व पाणी मुक्त होळी असते.
भांगेच्या जागी बियर असते मात्र भारतात होळी साजरी करतांना काय खावे प्यावे हा ऐच्छिक मामला आहे.
आपल्याला आझादी हवी ती पाणी टंचाई पासून.
पाणी टंचाई पासून तर पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प चालवले पाहिजे त्यातही व्यापक प्रमाणात जगजागृती शाळा कॉलेज
कार्यालये ह्यातून वर्षभर शहरीभागात व गावात लोकांना सरकारी यंत्रणा कार्यरत करून जनजागृती केली पाहिजे.

शेतकर्याकडे खायला अन्न नाही तेही त्याने स्वतः पिकवून म्हणून आपण हॉटेलात जाऊन खायचे टाळतो का
त्याला वस्त्रे नाही म्हणून आपण महागडे कपडे विकत घेणे टाळतो का
आपले लग्न सभारंभ दणक्यात साजरे करायचे सोडतो का आणि का करू नये.

उदा दोन काठ्या आहे त्यात एक छोटी व दुसरी मोठी काठी आहे आता समानता आणण्यासाठी मोठी काठी तोडून छोटी करायची की छोट्या काठीला अजून एक काठी कापडाने बांधून मोठी करायची हा ज्याचा  त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.
मुळात हा समानतेचा ध्यास का
दळभद्री समजवादी विचारांनी मध्यमवर्गाला तो नियमित कर भरून वर्षभर निमुटपणे सत्ताधारी श्रीमंत ह्यांची माजोरी पाहत व गरिबांचे तुमचे बुआ उत्तम चालले आहे ह्या अर्थी शिव्या शाप खात जगतो.
 वर्षातून काही दिवस त्याने सण साजरे करायचे ठरवले तेही शेतकऱ्यांच्या सारखे ऋण न काढता तर त्या मोडता घालायचा अधिकार कोणालाही नाही आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips