हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, ८ मार्च, २०१६

महिलादिना निम्मिताने मन कि बात

.
आपल्या समाजात मातृभक्त हा सन्मानीय शब्द आहे मात्र बायकोभक्त असणाऱ्याच्या नशिबी जोरू का गुलाम ,ताटाखालचे मांजर असे हिणवले जाते.तुम्हाला जन्म देणारी वंदनीय आहे पण तुमच्या अपत्याला जन्म देणारी सुद्धा आदरणीय असली तर त्यात वावगे काय आहे.

आझादी हवी तर ह्या पुरुषप्रधान मानसिकतेपासून हवी.
ही मानसिकता सर्व धर्मात सर्व वर्गात आढळते पुरुषप्रधान संस्कृती हा देशातील सर्व धर्म जात पंथ वर्ग ह्यांचा जोडणारा समान दुवा आहे त्यापासून खरे तर आझादी हवी . आजच्या दिवसानिमित मी अश्या नवर्यांचे सुद्धा अभिनंदन करतो जे आपल्या सहचारणीला फुलासारखे जपतात आणि आई इतकेच मानतात.
रिश्ता वही सोच नयी.
 
 थोबाड पुस्तकाच्या भिंती आज महिला दिनाच्या निमिताने संदेश शुभेच्छा ह्यांनी सजल्या आहे. त्यात माझा सुद्धा खारीचा वाटा आहे , पण महिलादिनी हा संदेश टंकन केला तेव्हा
मला ह्या महिलादिनाच्या निमित्ताने मनात जे विचार मुद्दा ओघळत आहे त्यांना पंचताराकित दालनात मी प्रसवत आहे.
ह्या निमित्ताने मोदींनी फक्त महिला संसद महिलांना आज बोलू देण्याच्या संबंधी जी सूचना मंडळी त्यांचे कौतुक वाटत आहे , त्यांची माउली  साध्या रुग्णालयात  जाते वर मुलाला माझी काळजी करू नको देशाची सेवा कर असे सांगते अश्या माउली
पुढे नतमस्तक होतो , आपल्या नवर्याच्या बलीदानावर जेव्हा
आपल्या मुलाला त्याच्या सारखा सैन्यात पाठवेन असे म्हणणाऱ्या वीरमातेस वंदन करतो.
आणि  ३००० कमावून मुलाला उच्च शिक्षण शिकायला एक दशक घराच्या बाहेर ठेवणाऱ्या व त्याने राजकीय दिवे लावल्यावर तरीही
आपला तो बाब्या ही उक्ती सार्थ करणाऱ्या मातेस सुद्धा वंदन करतो. 
 

1 टिप्पणी :

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips