दक्षिण आफ्रिका हरल्याचे दुख झाले पण त्याहून जास्त राग आला
महत्त्वाच्या क्षणी गचाळ क्षेत्ररक्षण हे आता त्यांच्या सवयीचा भाग झाला आहे , एवरी लहान बाळ घरी बडबड करते बडबड गीते गाते मात्र घरी पाहुणे आले व कौतुकाने बाळास काही करावयास सांगितले तर ऐन मोक्याच्या क्षणी बाळ घुम्या सारखे गप्प बसते अश्यावेळी पाहुण्या समोर पालकांची जी अवस्था होते ती काल दक्षिण आफ्रिकन लोकांची झाली.
डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की
धाव बाद करण्याच्या सोप्या संध्या गमावल्या ,
सोप्या हे त्यांच्या दर्जानुसार लावलेला निकष आहे , आपला एक शमा दोन दिवाने सारखे झेल घेण्यासाठी आतुर व झेल सुटल्यावर लाचार झालेले दक्षिणआफ्रिकन पाहिले व मला १९९० च्या काळातील आपले क्षेत्ररक्षण आठवले.
सामना चालू असतांना मनात विचार आला
मन सांगत आहे कि दक्षिण आफ्रिका जिंकणार तसे रागरंग दिसत होते
पण त्याचवेळी खात्री होती की दक्षिण आफ्रिका हरणार ,
शेवटी आपली चोकर इमेज सांभाळणे त्यांना गरजेचे वाटते
Breaking News:
ऑस्ट्रेलियातून दक्षिण आफ्रिका संघ कालसर्प शांतीसाठी थेट त्र्यंबकेश्वरला येणार.
अश्या आशयाचा संदेश काय आप्पा म्हणजेच वोट्स अप वर फिरत होता , त्यांना दवा कि नाही दुवा कि जरुरत हे .
असेच खेदाने म्हणावस वाटते.
ते हरले तेव्हा त्यांचे रडणे पाहून आधी सहानुभूती व नंतर संताप आला
तुम्ही असे क्षेत्ररक्षण कराल तर आमच्या इशांत ने काय करावे.
उद्याचा सामन्यात सर जडेजा ह्यांनी निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मी संघात स्थान राखून आहे हे दाखवून देणे गरजेचे आहे .
काढी ना मी धावा ,घेई ना विकेट मी
झेल पकडीन, धावबाद करेल मोक्याचे चार
अशी कृष्णाने अर्जुनला वचन दिले तसे जडेजाने धोणीस द्यावे.
शमी ने वहाब वसा घ्यावा , यादव ने लालू च्या बिहार मध्ये नेहमी असते त्यापेक्षा जास्त यादवी खेळपट्टी वर माजवावी ,
विराट ने आपले विराट रूप खेळपट्टी वर दाखवावे
धवन ने वरून धवन च्या बदलापूर सारखा कांगारूंचा
मागील काही कसोटी एकदिवसीय सामन्यांचा बदला घ्यावा.
धोनी ने त्यांचे चाणक्याला अतर्क्य वाटतील असे डावपेच मैदानावर कर्णधार म्हणून करावे ,
शर्माने द्विशतक सगळेच करतात आता मी त्रिशतक करतो असा पण करावा , कुणास ठाऊक तो पूर्णत्वास जाईल सुद्धा.
नुकतीच सुप्रीम कोर्टाने भारतात शिव्यांच्या वापरावर बंदी शिथिल केली आहे तेव्हा शल्य नीती नुसार प्रत्येकाने आपापल्या शाल जोडीतील खास राखून ठेवलेले शब्द भांडार उद्या मुक्त कंठाने रिते करावे जेणेकरून कांगारू शब्द भम्भाळ होतील . कारण ते उद्या तेच करणार . अश्विन ने सिडनी ची खेळपट्टी फिरकीस पोषक आहे ह्या ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून गोलंदाजी करावी ,
उद्या खेळपट्टी वर हिरवळ ठेवण्याचा कावा कांगारू करतील , कारण आपला एक फिरकीपटू चालला कि धोनी मिळेल त्याच्या हाती चेंडू सोपवून तुतर्फा फिरकी मारा प्रतिपक्षावर करतो
अश्विन विराट शर्मा रैना जडेजा असे पाच फिरकी गोलंदाज त्याच्या दिमतीला आहे .
तेव्हा शमी व यादव व मोहित वर सुद्धा मोठी जबाबदारी आहे ,
उद्या सिडनी ला इडन गार्डन चे स्वरूप येणार हे नक्की
मौका मौका
कांगारू ला त्यांच्या गल्लीत हरवण्याचा मौका मिळणार आहे
उद्या भारत जिंकणार अशी माझी मनोदेवता सांगते .
उद्याचा एक दिवस सारे भारतीय जात पात धर्म आपला आर्थिक स्तर विसरून काही काळ एक भारतीय एक देश ह्य भावनेने हा सामना पाहणार
हा सामना जिंकणे म्हणूनच अधिक गरजेचे अनिवार्य आहे.
चक दे इंडिया
एवढे लिहून मी माझी मन कि बात संपवतो
आता भेटूया अंतिम सामन्याच्या आधी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा