हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१२

गो मेरी गो

उद्या लंडन मध्ये ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या स्थानिक वेळ दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी ५ वेळा जगजेत्ती भारतीय मेरी कोम व ब्रिटीश खेळाडू निकोल अडम ह्यांच्यात बॉक्सिंग चा सामना रंगणार आहे. मेरी कॉम ही साऱ्या भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याची माझ्या मते शेवटची आशा आहे.

 दोन मुलांची आई व ५ वेळा जगात अजिंक्य ठरूनही सानिया किंवा आपल्या आय पी एल खेळणाऱ्या स्टार खेळाडू सारखा लक्ष्मीचा वरदहस्त तिच्यावर कधीच नव्हता. आता मात्र लंडन मध्ये तिची मुलाखत घेण्यासाठी जगभरातील वार्ताहर तळमळत आहेत. सानिया मिर्झा खाली हात आये थे हम , खाली हात जायेंगे हे ऋतिक रोषन च्या पहिल्या सिनेमातील गाण्यातील ओळ सार्थ करत आपल्या घरी गेली सुद्धा असेल

. तेव्हा आपल्या पूर्व भारताच्या ह्या मिलियन डॉलर बेबी च्या विजयासाठी सर्वांनी मिळून साकडे घालूया. येथे जर्मनीत बॉक्सिंग लोकप्रिय आहे. मात्र महिला बॉक्सिंग चा पहिल्यांदा ह्या ऑलिंपिक मध्ये सहभाग झाल्याने त्यातही भारतीय महिला खेळाडू ने पदक नक्की केल्याने मी व केट उद्या ऑफिस ला दांडी मारून उद्याचा सामना पाहणार आहोत.


. एकेकाळी क्रिकेट साठी अश्या सुट्या मारल्या जायच्या ह्या माझ्या गोष्टीवर माझाच विश्वास बसत नाही एवढे अती क्रिकेट मुळे ह्या खेळा विषयी व त्यात आलेल्या काळ्या व पांढरा पैसा व त्याने खेळाला आणलेले बाजारी स्वरुप ह्यामुळे क्रिकेट हा शब्द सुद्धा नकोसा झाला आहे.


 भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणार एवढेच काही मेरी चे महत्व आपल्या पुरता नाही आहे. कारण मागे अभिनव ने सुद्धा ते मिळवले होते. त्याने काही देशात क्रीडा क्रांती घडून नाही आली. मात्र सध्या पूर्व भारत अस्थिर करण्याचे कुटिल कारस्थान रचले जात आहे. आसाम अशांत आहे. अश्या स्थितीत मेरी चे देशासाठी पदक मिळवणे हे देशाच्या अखंडतेला पूरक ठरणार आहे. ह्या प्रदेशाकडे पाहण्याचा सरकारी व भारतीय जनतेचा दृष्टीकोन काही प्रमाणात बदलेल. अशी आशा बाळगतो. आणि एवढेच म्हणतो गो मेरी गो

1 टिप्पणी :

  1. मेरी चे पदक सोन्याचे नसले तरी ते सोन्याहून खूपच पिवळे आणि चकाकते असे आहे.
    तिचे, सायनाचे आणि सर्व खेळाडूंचे खूप खूप हार्दिक अभिनंदन!
    कारण माझ्या सव्वाशे कोटींच्या देशात, स्पर्धेपेक्षा, तिथे पोहोचेपर्यंत जी अगणित अडथळ्यांचे शर्यत पार करायची असते, कि ज्याला नियम नाही कि काहीच निकष नाहीत , ती पार करून नंतर स्पर्धेत पोहचता येणे हेच खरे किती कौतुकास्पद आहे.

    का हा पदकांचा दुष्काळ आहे? कारण आपली सगळी सिस्टीम पोखरली गेली आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्किल सेट, प्राविण्य, प्रगती ह्या योग्यते पेक्षा, इतर गोष्टींना महत्व देणे?

    जो देश पूर्वी 'सोने को चिडिया' होता किंवा ज्यात सोन्याच धूर निघत होता, त्यात आजही सोन्याबद्दल ओढ हि जगावेगळी आहे, सोन्याचे सर्वात ज्यास्त आकर्षण आणि खप सुद्धा ज्या देशात ज्यास्त आहे, त्याच देशाची अशी परिस्थिती आहे आहे कि फक्त दोन हातांच्या बोटावर मोजता येण्या इतपतच पदके तेही कसेबसे मिळताहेत.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips