हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

हिंदी कॉमिक्स , एक नॉस्टेल्जिया वाला अनुभव ,

.बालसाहित्य हे जगभरात साहित्यातील लोकप्रिय प्रकार. त्यामानाने भारतात त्याला अभिजात दर्जाचे मानले जात नाही.
बाल साहित्यावर परदेशात मोठाले सिनेमे होतात ते पाहतांना माझे मन अनेकदा माझ्या बालपणात शिरते नकळत माझ्या अस्सल भारतीय हिरोंची  व हॉलीवूड हिरोंची तुलना सुरु होते.
मिसळपाव ह्या मराठी संस्थळावर असाच लहानपणी वाचले जाणारे बालसाहित्य विशेषतः कॉमिक्स संदर्भात  लेख आला होता.

तो वाचून माझ्या बालपणीच्या नायकांची पुन्हा पुन्हा आठवण झाली म्हणूनच हा छोटेखानी लेखप्रपंच
आमच्या डोंबिवलीत माझी  मुंज १९८८ साली झाली आणि मला अनेक पुस्तके प्रेझेंट म्हणून मिळाली ,त्याने माझ्या वाचनाला खर्या अर्थाने चालना मिळाली. पण त्या आधी  माझ्या आयुष्यात ठकठक
 व चंपक

बन्या हे असेच खोडकर व इरसाल  कार्टे ठकठक मध्ये नेहमी असायचे ठकठक
मधील दिपू ह्या लहान मुलाला परग्रहावरून आलेल्या मानवाने जादूचा पट्टा दिला असतो त्यामुळे त्या पट्ट्या वरील कळ दाबताच त्याचे दिपू दि ग्रेट मध्ये रुपांतर होते व तो इतर सुपर हिरो सारखी लोकांना  मदत करू लागतो.
,  , चंपक मध्ये प्राण्यांच्या व माणसांच्या गोष्टी सचित्र असायच्या त्या सुद्धा रंगीत , खूप भारी वाटायचे वाचायला ,
कुमार नावाचे मासिक दरमहा यायचे पण ते मला इतके आवडायचे नाही , मात्र चांदोबा त्यातील विक्रम वेताळ मात्र आवडीने वाचले जायचे. डोंबिवली वेस्ट मधील योगायोग वाचनालय माझे पहिले वाचनालय त्यांचे मालक कुलकर्णी हे आमच्या बिल्डींग मध्ये राहायचे त्यामुळे बाबांनी तेथे वयाच्या ८ व्या वर्षी माझे खाते उघडले.  उन्हाळी व दिवाळी सुट्टीत तेथे माझा राबता असायचा पुढे डोंबिवली पूर्वेला ब्राह्मण सभेत माझे वाचनालय होते तेथे सुद्धा टारझन , शेरलोक होम्स , किंग कोंग किंवा अरेबियन नाईट ,गुलबकावली  माझ्या वाचण्यात आल्या.
इय्यता ५ वीत असतांना एकदा स्टेशन जवळ पेपर स्टोल वर बाबा महानगर हे सांज दैनिक घेत होते , त्याच्या शेवटच्या पानावर चित्र कथा जवळपास      दिपू दि ग्रेट च्या अंग वळणाने जायची ती वाचण्यासाठी मी बाबांना वागळे ह्यांचे महानगर घेण्यास भरीस पडायचो , असेच एकेदिवशी  त्या स्टोल वर एका रंगीबेरंगी हिंदी  कॉमिक्स ने माझे  लक्ष वेधून घेतले ते होते नागराज व जादुगार शाकुरा

मी ते बाबांच्या पाठी लागून विकत घेतले अश्यारीतीने हिंदी कॉमिक्स ने माझ्या आयुष्यात पदार्पण केले ,
हिंदी भाषा देवनागरी लिपी वाचायला सोपी व आमच्या मराठमोळ्या डोंबिवलीत पूर्वेला  आमच्या उच्चभ्रू इमारतीत हिंदी
पंजाबी , तमिळ , मारवाडी  भाषिक होते त्यामुळे आम्ही सर्व हिंदीमध्ये संवाद साधायचो , साथीला बॉलीवूड असल्याने हिंदी समजणे सोपे होते व आता वाटते हिंदी कॉमिक्स वाचल्याने ते अधिकच जास्त समृद्ध झाले.
हिंदी कॉमिक्स च्या मायाजालात  माझा प्रवेश झाला.त्यावेळी काही प्रमुख प्रकाशने व त्यांचे प्रमुख हिरोज माझ्या वाचण्यात आले त्यातील काही माझ्या भावगीतविश्वात अविभाज्य घटक झाले
ह्या सगळ्या मध्ये बडे प्रस्थ होते डायमंड कॉमिक्स व त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय  हिरो होते चाचा चौधरी ज्यांचे डोके कम्प्युटर पेक्ष्या जास्त जलद चालते तर ज्युपिटर ग्रहावरून आलेला साबू  त्यांचा परम सखा , ज्याला राग आला कि थेट ज्युपिटर ग्रहावर ज्वालामुखी फुटायचा  त्यांची बायको चाची  अशी मस्त भट्टी बनली होती.

हि मासिक बाल कॉमिक्स तीही मराठमोळी  आली,
भारतातील कॉमिक्स चे पितामह प्राण ह्यांनी १९६० साली पहिले कार्टून कॉमिक्स लिहिले.  जागतिक कॉमिक्स च्या शब्दकोशाचे
एडिटर मौरी होर्न ह्यांनी १९९९ साली प्राण ह्यांना स्वतःच्या आत्मचरित्रात भारताचे वॉल्ट डिज़्नी म्हटले आहे.२० लाखाहून जास्त वाचक त्यांच्या चाचा चौधरी , पिंकी , बिल्लू , रमन अश्या कितीतरी पात्रांच्या कॉमिक्स चे निस्सीम चाहते होते..

चाचा चौधरी वर सहारा वन वर बनलेली मालिकेचे तब्बल ६०० भाग बनले.  मागे काही महिन्यापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी वाचली तेव्हा हे माझ्या अनेक कॉमिक्स च्या प्रमुख पात्रांचे निर्माते होते हे कळले .
त्यांच्या भाषेत सांगायचे तर   Humor is the base of all his stories. "If I could put a smile on the face of people, I would consider my life successful", he says. Apart from that his comics always has a social massage to convey.
राज कॉमिक्स  चे दोन प्रमुख नायक सुपर कमांडो ध्रुव व नागराज ह्यांनी माझे बालपण झपाटून केले होते. ध्रुव मला नागराज पेक्ष्या जरा कमीच शक्तिशाली वाटायचा , त्याच्याकडे नागराज सारख्या अध्भूत शक्ती नव्हत्या म्हणून असेल कदाचित. 

पण आज मोठे झाल्यावर कळले. सुपर कमांडो ध्रुव हा त्याचे कुठल्याही समस्येवर बुध्दीचातुर्याने मात करायचा. प्रत्येक संकटात त्याचे डोके अफलातून चालायचे.

  नागराज ची बातच और होती. हजारो नागांचे विष अंगात असलेला नागमानव असलेला नागराज ज्याच्या हातातून नागाच्या जाळी बाहेर पडतात.
आता स्पायडरमन च्या हातातून स्पायडर वेब निघतात तर नागराजच्या हातातून नाग वेबस निघण्यास काय वावगे होते.
नागराज त्यांचे गुरु गोरक्षनाथ आणि त्यांचे अद्भुत विश्व अजब होते.  .
ह्या कॉमिक्स ची हॉरर सिरीज सुद्धा यायची.

रेल्वे च्या बुक स्टोल व स्टेशन बाहेरील पेपर च्या स्टोल वर आम्ही कॉमिक्स प्रिय मंडळी लक्ष ठेवून असायचो ,आपल्या नायकाचे नवे पुस्तक कधी येणार ह्याची आतुरतेने वाट पाहायचो
आमच्या ह्या आवडीला निकृष्ट दर्जा तत्कालीन वडीलधार्या व शिक्षक मंडळींनी दिला होता.
आताचे पालक मुलांना दुकाना बाहेर रांगा लावून हेरी पोटर घेऊन देतात तेव्हा त्यांचे कौतुक वजा हेवा वाटतो ,
मराठीत ठक ठक चा दिपू दि ग्रेट व चंपक मधील चंपू ससा
चांदोबा मधील विक्रम वेताळ दर महिन्याला आवडीने वाचायचो
कितीतरी वेळा मित्रांच्या कडून पुस्तकांची आदला बदली व्हायची.
रद्दीच्या दुकानात तासंतास पडीक राहून एखादे दुर्मीळ बालसाहित्य शोधून स्वस्तात विकत घ्यायचे व त्यासाठी सुट्टीच्या काळात शहरातील रद्दीची दुकाने सायकल वरून पालथी घालण्यात भारी मौज वाटायची ,
डोंबिवली पूर्व स्टेशन जवळ रेल्वेचा पूल उतरल्यावर पोलीस स्टेशन जवळ पेपर चा स्टोल तसेस फडके रोड च्या मध्यभागी  मोदेर्ण केफे जवळ असणारा पेपर स्टोल  हे माझे कॉमिक्स विकत घेण्याचे प्रमुख स्त्रोत होते. तर गणपती मंदिरावरून नेहरू मैदानाच्या दिशेने जातांना देढीया निवास च्या खाली असलेले रद्दीचे दुकान माझ्यासाठी अलीबाबाची गुहा होती.
शाळेमध्ये  माझा वर्ग मित्र राजर्षी व बालमित्र पराग संत हे माझ्याइतके कॉमिक्स वेडे होते, शाळेत व जोशीच्या बाईच्या क्लास मध्ये कॉमिक्स वर चर्चा व देवाणघेवाण व्हायची.
प्रत्येकवेळी कॉमिक्स बाबांना सांगून घेणे जमत नव्हते तेव्हा संत ने जालीम उपाय सुचवला. घरून  भाजी किंवा दुध आणण्यास घरातून हुकुम मिळाला की  ते आणल्यावर उरणारे सुटे पैसे पालकांना देतांना थोडे स्वतःकडे  ठेवायचे ,काम केल्याचे कमिशन किंवा मोबदला पण एक  गोम होती, हाव करायची नाही नाहीतर बिंग फुटते, तेव्हा थेबे थेबे तळे साचे ह्या उक्तीनुसार पैसे जमवण्याचा मध्यमवर्गीय बचतीचे बाळकडू कॉमिक्स मुळे आपसूकच गिरवले गेले.

इंटरनेट  वेग चांगला असेल तर प्रत्यक्ष रेषेवर वाचण्यासाठी
हि साईट लय भारी आहे.
 अधून मधून  जेव्हा रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात डोके शिणून जाते तेव्हा मी एखादे कॉमिक्स वाचतो , बास सिगरेट दारू काहीही नको , बालपणीच्या आठवणीत रमून गेल्यावर कॉमिक्स वाचून संपते व मी नव्या जोमाने  आयुष्याला सामोरे जातो.

 . 

४ टिप्पण्या :

 1. मेंड्रेक जादूगर आणि वेताळ उर्फ फेंटमचा उल्लेख राहीला......

  उत्तर द्याहटवा
 2. Introspection तुझे पंचतारांकित नगरीत स्वागत.
  हो वेताळ मेड्रेक व अनेक पात्रांचा उल्लेख राहिला त्यात बांकेलाल पासून अजून बरेच आहेत.
  पण माझ्या लहानपणी आम्ही आमच्या कॉमिक्स ची मित्रामध्ये देवाणघेवाण करायचो. त्यात वरील उल्लेख केलेल्या तीन पात्रांची एखाद दुसरे कॉमिक्स वाचले होते. पण का कुणास ठाऊक ते क्लिक नाही झाले , का ते ठाऊक नाहीत.
  आणि म्हणूनच माझ्या लहानपणी माझ्या कॉमिक्स संग्रहात त्यांचे स्थान नव्हते. खरे तर ते दोन्ही सुपर हिरोज हे नागराज व ध्रुव ला वयाने जेष्ठ आहेत.पण दिल आय नागध्रुव पे तो.... अशी अवस्था होती.

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips