हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

दसऱ्याच्या दिवशी भारतीय संघांचे झाले पुण्यात पानिपत व सचिन झाला निवृत्त


आज  भारतीय संघ हरला कारण कांगारूंनी ३०० धावा सहज केल्या.   व पुढे दबावाखाली आपली फलंदाजी घसरली.
पण आपले क्रिकेटवेडे दर्शक मात्र अजून सचिन आणि त्याची निवृत्ती मधून बाहेर पडले नाही आहेत म्हणूनच आजचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला नसावा , कुठेही चेहरा पुस्तकाच्या भिंतीवर त्या बद्दल लिहून आले नाही.

भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाचे कारण  आपली गोलंदाजी आहे ,
गोलंदाज नुसते धावा रोखत नाहीत तर बळी घेऊन पण सुध्धा जिंकतात . पण सध्या निवृत्ती पुराणाचे पूरण आपल्या देशात भारतीय अनेक दिवस पुरवून पुरवून खाणार असल्याने कालचा आपला पराभव ते सहज पचन करतील ,
जुन्या मुळव्याधी इतकीच भारतीय गोलंदाजी हि भारतीय क्रिकेट ची प्रमुख समस्या आहेत
सीमेपलीकडे पुरेश्या सुविधा नसून आग ओतणारा  तोफखाना नेहमीच सज्ज असतो , आपल्याकडे दर्जेदार सातत्यपूर्ण गोलंदाजीचा अभाव का आहे .
ह्याचे कारण आपल्या लोकांचा क्रिकेट ह्या खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे.
भारतीय क्रिकेट विश्वात  फलंदाज म्हणजे बिझनेस क्लास व  गोलंदाज म्हणजे वर्किंग क्लास आहेत  व भारतीय संघाच्या पराभवाचे बहुतांशी कारण हेच असते.
येथे सगळ्यांना सचिन बनायचे आहे , कपिल आणि कुंबळे कोणालाच बनायचे नाही आहे.
आज कांगारू ने खरे  सिमोल्लंघन केले त्यांचे अभिनंदन.

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips