हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, २२ जुलै, २०१३

पैचान कौन

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला की डान्स बार वर असलेली बंदी बेकायदेशीर असून महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा सुद्धा एका अर्थी बेकायदेशीर आहे. तेव्हा डान्स बार खुले करण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता   अनेक नव्या जुन्या ,बदनाम  मुन्नी ,शीला  , जलेबी बाई व अनारकली डिस्को जाण्यासाठी आपली हलकट जवानी रसिकांना दाखवण्यास उतावळ्या होत आहे. त्यांचे फोटो अगदी फेविकॉल ने  ओठांशी चिटकवून ठेवण्यास रसिक आतुर आहेत.  आणि आबांचे आपले काहीतरीच ...   प्रत्येक आंतरराष्ट्रीय महानगरात अनेक स्तरीय लोक  अनेक कारणांसाठी लघु किंवा दीर्घ वास्तव्यासाठी येतात , त्यांच्यासाठी प्रौढ मनोरंजन हे प्रत्येक शहरात असते. ते कायद्याच्या कक्षेत असल्याने सामान्य लोकांच्या जीवनात त्याचा प्रादुर्भाव होत नाही , मात्र सरकारचे त्यांच्यावर लक्ष असते , व त्यांना नियमित महसूल मिळतो . भारतात गर्भ श्रीमंतांसाठी

  पब्स डिस्को असतात , तेथून ड्रग्स किंवा पिक अप कोर्नेर हे प्रकार घडतात किंवा त्यांच्या परकीय संगीतावर  धुंद , बेधुंध होऊन कृष्ण लीला चालतात , अश्याच एका प्रसिद्ध पब्ज मध्ये माझ्या उमद्वारीच्या दिवसात मी कामाला होतो  उद्योगपती व त्यांच्या भोवती रुंजी घालणाऱ्या ब व क श्रेणीच्या  अभिनेर्त्री
अनेक मोडेल्स ह्यांचे चाळे  पाहत भांडवलशाही युगात मी वयाच्या   २०व्य वर्षीच पदार्पण केले.


 
 
, एकदा काम संपवून शेवटच्या लोकल मध्ये काही बारबाला बसलेल्या होत्या ,
नेहमी नेहमी आमच्या डब्यात त्या येत असल्याने आम्ही त्यांना ओळखत असलो तरी बुजून असायचो ,
पुढे त्यांनी आमच्याशी गप्पा मारायला सुरवात केली.
कितीतरी जणांची गावाकडे परिवार असतो , सर्व भावंडांचे शिक्षण व लग्न त्या पैसे घरी पाठवून करत असतात.
एकीचा भाऊ इंजिनियर झाला पण त्याच्या लग्नाचा खर्च करून सुद्धा त्याने आपली बहिण बारबाला आहे म्हणून तिला लग्नाला बोलावले नाही , तिने तिच्या बहिणीची लग्न लावून
स्वतः मात्र  अविवाहित राहिली कारण आई बाबा तिच्या गळ्यात मारून तिचे बहिण भाऊ मोकळे झाले होते.
अश्या कितीतरी जणींच्या कर्म कहाण्या चकीत करणाऱ्या होत्या.
 

सर्वोच्च न्यायालय म्हणत की डान्स बार वर बंधन  घटनाविरोधी आहे. मुळात ह्या बार वर  कायद्याने अनेक बंधन आणता येतात , वेळेचे बंधन किंवा एखादा अमाप पैसा उडवत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळवले किंवा पोलिस व इन्कम टेक्स  अधिकाऱ्यांची संयुक्त टीम निर्माण करून डान्स बार वर लक्ष ठेवणे ह्यातून काळे पैसे वाले अनेक मोठे मासे गळाला लागू शकतात.
एका रात्रीत एक कोटी उडवणारा हा कोण म्हणून चौकशी केली तर तेलेगी पोलिसांच्या डोळ्यात भरला म्हणूनच पुढे त्यांचा करोडोंचा घोटाळा उघडकीस आला.
आता लोकांना बेन्कोक मध्ये विक एंड घालवायला जावे लागणार नाही. पैशाची उधळण  मुंबई ची रात्र  उजळून टाकणार त्या उजेडात मुंबईच्या  झोपड्यांच्या दारिद्र्याचा  अंधकार असा विरोधाभास सुद्धा दिसणार . मुंबई श्रीमंत आहे ,पण मुंबईकर श्रीमंत नाही आहेत. हेच खरे

मधल्या काळात भारतात अनेक शहरात अनेक कोट्यधीश वाममार्गाने झाले आहेत त्यामुळे त्यांची सूज आलेली ही संपत्ती मुंबईत येणार म्हणजेच मुंबईत  कोट्यधीश  लोकांच्या आता रांगा लागणार , हेही उघड आहे. मुंबई काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था उभारण्याच्या आत कायदे झाले पाहिजेत
मात्र  मुंबईकरांच्या स्मार्ट फोन वर आवाज घुमणार
पैचान कौन

२ टिप्पण्या :

  1. तुझ्या विचारांशी पुर्ण सहमत असेल जेव्हा हा कायदा तयार होईल

    उत्तर द्याहटवा
  2. तुझ्या विचारांशी पुर्ण सहमत असेल जेव्हा हा कायदा तयार होईल

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips