हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, २३ जानेवारी, २०१३

सुभाषचंद्र बोसं ह्यांचे जर्मनी मधील वास्तव्य व तेथे केलेले कार्य

नेताजींच्या 116 व्या जयंतीनिमित्त   त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 
 ह्या लेखाच्या खाली दिलेली क्लिप  तमाम  देश भक्तांनी जरूर पहावी.
ह्यात सुभाष चंद्र बोसं ह्यांचे जर्मनी मधील वास्तव्य , आझाद हिंद सेनेची स्थापना व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाझी  राजवटी सोबत संबंध ह्यावर प्रकाश झोत टाकते.
ह्यात त्यांची जर्मन नागरिकत्व असणारी कन्या अनिता बोसं व नेताजींच्या सोबत काम केलेल्या अनेक जर्मन नागरिकांच्या मुलाखती आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिटलर व एस एस चा प्रमुख हिमलर सोबत च्या मुलाखतीचे व पाणबुडीची ज्यातून   नेताजींनी जर्मनी ते जपान असा प्रवास अशी अनेक दुर्मीळ दृश्ये  ह्यात पाहायला मिळतात.
अनेक जाणकारांची मते ह्या क्लिप मधून ऐकायला मिळतात.
जर्मन लोकांची नेताजींच्या बद्दल , त्या काळी तेथील वास्तव्यात असलेल्या भारतीय सैनिकांच्या बद्दल असलेली मते ऐकायला मिळतात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनिता बोसं ह्यांची गांधीजी ह्यांच्या विषयी मते सुद्धा कळतात.
 जर्मन लोकांनी नेताजींच्या बद्दल जे मत व्यक्त केले तेच महानायक ह्या कादंबरीत मला वाचायला मिळाले होते.
नेताजींचे भारत स्वतंत्र झाल्यावर
एक स्वतंत्र भारत म्हणून अनेक योजना , त्यांनी आखल्या होत्या ,थोडक्यात भारताच्या विकासाची सुसूत्र ब्लू प्रिंट त्यांनी  तयार केली होती.
दुर्दैवाने देशाची कमान त्यांच्या हातात आली नाही ,
 सदर क्लिप पाहण्यासाठी तुमच्या संगणकीय मुशकास येथे टिचकी मारण्याचा   आदेश द्या .

1 टिप्पणी :

 1. मित्रा निनादा,
  आजकाल, खऱ्याखुऱ्या देशभक्तांना आठवतोय कोण?
  अगदी अलीकडील इतिहास म्हणजे शिवाजी, पासून लाल, बाल, पाल, पेशवे, भगतसिंग, राजगुरू, आझाद, स्वतान्त्र्यावीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, तात्या ह्या सगळ्यांचे कार्य, त्यांची महानता ह्या गोष्टी, दुर्लक्षित आहेत. ह्यांनी केलेले बलिदान, निस्वार्थ त्याग, सगळे व्यर्थ. सगळेच...

  जर का पूर्ण देशाचा 'गांधार'च होणार असेल तर मग सगळे आयुष्य वेचलेल्या लोकांनी आणि वेळप्रसंगी प्राणांची आहुती देवून परकीय आक्रमणे आणि त्यांच्या सातेविरुद्ध बंड पुकारून श्रींचे स्वराज्य का बरे निर्माण करावे. ह्यांनी का स्वत:ची कातडी सोलली जावून तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. ह्यांनी ज्या लोकांपासून देश वाचवला तीच अत्याचारी आता आपली "हिरो" होताहेत.

  तुझ्या लेखात उ टूब संदर्भाची लिंक दिल्याबद्दल खूपच आभारी आहे. कारण मी ती क्लीप आमच्या पितांश्री सोबत बघितली. त्यांना खूपच आनंद वाटला आणि प्रश्नही खूपच विचारले. ज्यांची मी समाधानकारक उत्तरे देवू शकलो नाही.

  आपल्याकडे सरदार पटेल, नेताजी, टिळक, सावरकर, ह्यांसारखी मंडळीची स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात आवश्यकता किंबहुना अगणित पट होती.

  पण त्यामुळे नाउमेद न होता, कार्य जमेल तसे चालू ठेवणे. ५ किंवा १० पिढ्यांऐवजी "भारतात" ४० ते ५० पिढ्या जगू शकल्या कदाचित गांधार पर्व लांबवू शकलो तरी खूप योगदान समजावे. त्यानंतरचे कोणास ठावूक, देशाचे नाव् सुध्धा काय असेल काय काय माहिती?

  असो सध्यातरी दिसामाजी काहीतरी लिहित जावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे....

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips