हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

टीचर्स डे ,सरकारी सेक्युलर दांभिकता


मुळात उठसूठ  डे साजरे करणे हि परकीय संस्कृती राज्यकर्त्यांनी अनेक गोष्टींप्रमाणे शिक्षक दिन  साजरा करतांना  ह्यावेळी सुद्धा ती पाळली. परकीयांच्या अनेक उधार घेतलेल्या गोष्टींचे हे एक अजून उदाहरण ,आपल्या संस्कृतीत गुरु पौर्णिमा हा सण आहे , व त्यांचे महत्त्व
परदेशात सुद्धा मानले जाते ,
शिक्षक हा सुशिक्षित करतो तर गुरु सुसंस्कृत


आमच्या नशिबी निःस्वार्थीपणे काही शिकवणारे गुरु नाही आले ,
गुरू पौर्णिमा व गुरु दक्षिणा अशी परंपरा असतांना उगाच अजून डे कशाला साजरे करायचे. सरकारी पातळीवर साजरे करणारे डे त्याला कितीसे महत्त्व द्यायचे.
सरकारी दरबारी गुरु पौर्णिमा हिंदूंचा सण
 व त्याचवेळी
आपल्या देशातील गुरु शिष्यांच्या नात्याची परंपरा जाणून घेऊन गुरु हा शब्द परदेशात इंग्रजी भाषेच्या  शब्द कोशात सामील करून घेतला ,
आज सरकार दरबारी गुरु पौर्णिमा शून्यात जमा आहे
गुरु हा आपल्या संस्कृतीत सर्वात उच्च स्थानी असतो ,तसा श्लोक देखील आहे ,


आपल्या देशात हुशार हे अभियांत्रिकी , वैद्यकीय शिक्षण घेतात. काही सी ए होतात तर काही एम बी ए
व ह्यापैकी काहीही न होता होणारे मग माध्यमिक व प्राथमिक शाळेत शिक्षक होतात , जे माझ्या वाट्याला आले ,
हि वस्तुस्थिती आहे ,
तळमळीने शिकवणे सोडून द्या पण खाजगी कोचिंग क्लासेस च्या कुबड्या शालेय जीवनात मलाच काय हुशार मुलांना सुद्धा लागायच्या.
शाळेतील माझे खरे शिक्षक मानले तर विकास व नवनीत हे माझे सावत्र शिक्षक मानले पाहिजेत.
वर्षभर घोका व परीक्षेत तीन तासात ओका
एवढेच त्यांच्याकडून शिकलो.
महाराष्ट्र भर पसरलेले कोचिंग क्लासेस
व काही कोचिंग क्लासेस सम्राट व भारताच्या कोणतेही विद्यापीठ हे जगातील पहिल्या दहा सोडाच पहिल्या १००मधे सुद्धा येत नाही.
आणि जगातील प्राचीन अशी विश्व विद्यालये नालंदा व तक्षशीला एकेकाळी भारतात होती ह्यावर कुणाचा विश्वास बसेल ,
आज तक्षशिलेच्या विद्यापीठाचे जे भग्न अवशेष पाहायला मिळतात ते खरे तर आपल्या देशातील शैक्षणिक शेत्राचे प्रतिनिधित्व करतात.
परदेशात कोणताही कोचिंग क्लासच्या कुबड्या न लावता अभियांत्रिकी व वैद्यकीय शेत्रात प्रवेश करणारे विद्यार्थी पहिले की असेही घडू शकते ह्यावर विश्वास बसत नाही.
रुप याहून जास्त अवमूल्यन काही दशकात शैक्षणिक शेत्रांचे व शिक्षकांचे झाले आहे , आपल्या पगारवाढीसाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावून संप करणारे आजचे शिक्षक पहिले कि तिडीक येते.
भारतात आज आय बी स्कूल्स , श्रीमंत , सी बी ए सी ह्या मध्यमवर्गीय व सरकारी शाळा ह्या गरीबीसाठी
अशी शैक्षणिक  वर्ण व्यवस्था निर्माण झाली आहे

६ टिप्पण्या :

  1. खरं आहे अगदी. आता तर काही होता आलं नाही की शिक्षक होतात, विशेषत: मराठी शाळांची अशी अवस्था आहे. मुळात शिक्षकांकडे ज्ञान नसेल तर ते मुलांपर्यंत पोचणार कसं. आणि हा दिवस तो दिवस. खरंच किती आंधळेपणाने अनुकरण चालू आहे हे.


    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मोहना जोगळेकर आपले पंचतारांकित नगरीत मनापासून स्वागत
      चेहरा पुस्तकावर आता माझ्या लेखावर प्रतिसाद वाचतांना मला अशी असे कळले की ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन ह्यांचा जन्मदिवस आहे. ते प्रथम एक शिक्षक होते, म्हणून त्यांचा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन मानला जातो.
      दुर्दैवाने माझ्या काळात कोणत्याही शाळेच्या भिंतीवर , नेहरू , इंदिरा , नेताजी , शाळा मराठी माध्यमिक असेल तर शिवाजी महाराज , टिळक , सावरकर व राधाकृष्णन ह्यांची तसबीर असे , दुर्दैवाने डॉ राधाकृष्णन हे रूढार्थाने राजकीय नेते नसल्याने आमच्या पिढीला त्यांच्या विषयी आमच्या शिक्षकांनी
      तोंडओळख सुद्धा करून दिली नाही तुमच्या शब्दात ते काय चीज होते ह्याची आमच्या पिढीला सुतराम कल्पना नाही म्हणूनच ह्या सो कोल्ड टीचर डे सरकारने मारे त्याच्या नावाने काढला पण आज सरकारी दरबारी डॉ ह्यांची आठवण काढली जात नाही व माझ्या पिढीतील माझे समकालीन चेहरा पुस्तकावर टीचर डे च्या निमित्ताने आपापल्या भिंती रंगवत असतील त्यांनी सुद्धा डॉ राधाकृष्णन ह्यांना उद्देशून काही लिहिले नाही ,उगाच चेहरा पुस्तकावर एखादा डे दिसला की टाकली पोस्टची एक पिंक
      असाच ट्रेंड बोकाळला आहे.

      माझ्या काळी व सध्या शिक्षण सम्राट व शिक्षण महर्षी जिल्हो जिल्हि निर्माण झाले नव्हते. शिक्षणाचा बाजार झाला आहे.

      हटवा
  2. मी आपल्या विचारांशी सहमत आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जयू आपले पंचतारांकित नगरीत मनापासून स्वागत .पु ल देशपांडे ह्यांना जे सर लाभले व ते ज्यांना सर म्हणून लाभले त्या शिक्षकी पेक्षातील सुवर्णकाळाला मानवंदना म्हणून समकालीन चितळे मास्तर हे व्यक्तिचित्र उभे राहिले ,
      त्यामुळे जुन्या पिढीला ह्या दिवसाचे अप्रूप व महत्त्व असणे . मला वाटत नाही ,

      हटवा
  3. सतीश आपले माझ्या पंचतारांकित नगरीत स्वागत
    गुणवत्ता यादीत मुले आणण्यासाठी आमचे शिक्षक धड पडायचे त्यात त्यांचे नाव व फोटो वृत्तपत्रात येण्याची शक्यता असायची ,
    मात्र काठावर पास होणार्‍या किंवा ४० ते ५० टक्के मिळवणाऱ्या बहुसंख्य मुलांना प्रथम श्रेणी मिळवून देण्यासाठी अजिबात घाम गाळणार नाही , त्यांना वार्यावर सोडून दिले होते ,
    अश्याच मुलांच्या जीवनावर आधारीत दहावी फ हा सिनेमा आहे.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips