हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

तुंडा पुराण


.
 खतरनाक अतिरेकी , जिहादी तुंडा ला खालावत्या  तब्येतीमुळे   पाकिस्तानात आत्मघाती केंद्रात प्रशिक्षण देणे शक्य नसल्याने आय एस आय ने त्याला नारळ दिला ,
आता निवृत्त तुंडा ला  जगण्यासाठी उत्कृष्ट वैद्यकीय सेवेची नितांत गरज होती जी पाकिस्तानात त्याला मिळणे अशक्य होते ,    आय एस आय त्याला दुबई किंवा आखतात उपचारासाठी पाठवणे शक्य नव्हते .लंगडे घोडे पे कौन पैसा लगायेगा .  
त्यातच .आपले काम प्रामाणिकपणे व इतबारे करणाऱ्या तुंडाला त्याच्या संघटनेत वरिष्ठ अधिकारी कमांडर लख्ख्वी कडून मानहानी सहन करावी लागली .भारताने अटक केलेला दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याने चौकशीदरम्यान लष्करे तय्यबाचा कमांडर झाकी उर रेहमान लख्वी याच्याविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. काश्‍मिरपर्यंतच मर्यादित असलेल्या संघटनेला अखिल भारतीय स्वरूप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्या नंतरही लख्वीने संघटनेत उच्च स्थानी पोचण्याच्या माझ्या मार्गात अडथळा आणल्याचे टुंडाने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले.
म्हणूनच गड्या  आपला गाव बरा  ह्या उक्तीनुसार व स्वदेस हा शिनेमा सलग ३ वेळा न झोपतां पहिल्याने तुंडा च्या मनावर परिणाम होऊन त्याने मनाशी एक निर्णय केला.
 तुंडा ने डोके चालवले
व भारत सरकार च्या स्वाधीन झाला , ह्याची गोड फळे त्याच्या लगेच पदरात पडली , त्यावर त्वरीत वैद्यकीय उपचार सुरु झाले. त्याच्या पाषाण , निष्ठुर हृदयाची काळजी घेण्यासाठी 

शरीरात  पेसमेकर बसविला गेला.  एम्स' रुग्णालयात हृदयात शनिवारी "पेसमेकर' बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने डॉक्टरांनी टुंडावर "पेसमेकर' शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता,
त्याच्या रोजच्या जेवणात चिकन चा समावेश आहे
अधून  मधून बिर्याणी सुद्धा मिळेल
हे सर्व पाहून दाउद  सुद्धा एकेदिवशी भारताच्या स्वाधीन होईल
म्हणजे त्याची तिसरी बायपास जसलोक मध्ये करता येईल
मग 
वन्स अपॉन तैम  इन मुंबई दोबारा  live   
  ताजा कलम
नुकतीच ही  बातमी वाचली .
संमतीने शरीरसंबंध गुन्हा नाही
 तुम्ही पण वरील    बातमीवर टिचकी
मारून ती  वाचून घ्या , हेच मत फार आधी मी मांडले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips