हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

भारतीय जवानांचे शीर कलम त्यामागील पाकिस्तानी हतबलता व त्यावर भारताचे अपेक्षित उत्तर

आंतर्राष्ट्रीय राजकारणाची  एक  गंमत आहे.
येथे अंतिम म्हणून असे काही सत्य नसते.
असतात त्या फक्त अनेक शक्यता
ह्यात आपल्याला पचते झेपते ते आपण स्वीकारायचे.भारत व पाकिस्तानच्या मध्ये जवानाच्या मृत देहाच्या विटंबनेच्या मुद्द्यावरून जे काही राजकारण झाले त्यामागील एक शक्यता  थोडक्यात  माझे मत थोडक्यात मांडतो.


पाकिस्तान ने दाखवलेली ही क्रूरता ही त्यांची हतबलता आहे
 ह्या घटनेच्या नंतर
थोड्याच दिवसात पाकिस्तान मध्ये झालेला धार्मिक गुरूंचा उठाव आणि सरकार वर आलेले संकट ह्यांचा परस्पर संबंध असावा.
इतिहास साक्षी आहे की  जेव्हा जेव्हा पाकिस्तान मध्ये   राजकीय अस्थिरता निर्माण झाली किंवा अमेरिकेने अफगाण च्या सीमेवर डू मोर चा घोषा लावला तर पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर आपल्या सैन्याची कुरापत काढते त्यामुळे तेथील मूळ प्रश्न बाजूला राहून भारत पाक हा पारंपारिक द्वेषाचा खेळ व त्यातून जनतेचे लक्ष  विचलित करण्याचे जुना डाव रंगतो.

भारताच्या दृष्टीने पाकिस्तानात झरदारी ह्यांचे सरकार व पुढे त्यांच्या सुपूत्राचे सत्तेवर येणे भारताच्या व ह्या आशिया खंडातील शांततेच्या दृष्टीने येणे महत्त्वाचे आहे.  हे लिहिले होते.
झरदारी ह्यांना हटवून जर मुल्ला व मौलवी ह्यांचे सरकार पाकिस्तानात आले असते तर दहशतवादी संघटनांना अफगाण व भारतात कारवाया करण्यासाठी मोकळे रान मिळाले असते. जे अमेरिका व भारताच्या दृष्टीने अपायकारक होते .

पाकिस्तानात केनेडा वरून  मौलवी ताहिप उल कादरी नामक   धार्मिक ,राजकीय चक्रीवादळ येत आहे ह्याची अमेरिका ,पाकिस्तान , भारत सरकारला आधीच कल्पना असावी असे मला वाटते.
कारण भारत व पाकिस्तानच्या हेर संस्थांच्या सोबत अमेरिकेचा कायम संपर्क असतो.
भारतात   भारतीय सरकारने  पाकिस्तान  मध्ये  लष्करी कारवाई करावी असे वातावरण निर्माण होण्यासाठी  माझ्या मते पाकिस्तान ने   आपल्या जवानांच्या मृत देहाची विटंबना झाली. ह्या घटनेला प्रकाश झोतात ठेवण्यात आले ,

पाकिस्तानी नेत्यांनी  पाकिस्तानात सत्ताबदल होऊ नये ह्यासाठी पाकिस्तानच्या सर्व प्रमुख घटकांवर पाकिस्तानवर   भारतीय  लष्करी  कारवाई चा बागुलबुवा   दाखवला.

ह्याचा कदाचित योग्य तो परिणाम साधला गेला ,कदाचित अजून  काही राजकीय डावपेच रचल्या गेले व धार्मिक नेते व पाकिस्तानी सरकार मध्ये मध्यस्थी झाली.
धार्मिक नेत्यांना पाकिस्तान मधील कोणत्याही प्रमुख राजकीय विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला नाही.

कारण  पाकिस्तानातून  लष्करी सत्ता घालवणे एकवेळ शक्य आहे ,मात्र इराण सारखी धर्म संस्था  व धार्मिक नेते पाकिस्तानात सर्वोच्च स्थानी आले .व ते   पाकिस्तानात महत्त्वाचे निर्णय घेऊ लागले व सत्तेचा केंद्र बिंदू   बनले  तर पाकिस्तान दुसरा इराण होईल म्हणजे काय तर कितीही आर्थिक निर्बंध घाला व काहीही करा त्यांच्या नीतीत व वागण्यात अजिबात  बदल होणार नाहीत,
इराण व पाकिस्तान मध्ये फरक इतकच आहे की पाकिस्तान हे आधीच अण्वस्त्र सज्ज राष्ट्र आहे , व त्यांच्या कडे आशिया मधील अमेरिकन लष्करी तळ व भारतातील उत्तरेकडील महत्त्वाच्या भागात पोहोचण्यासाठी विमाने व मिसाइल  आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यू राष्ट्रे त्यांच्या टप्प्यात आहे ह्यामुळे 
जर चुकून धार्मिक नेत्यांचे पाकिस्तानात सरकार आले व त्यांनी ज्यू राष्ट्रावर हल्ला केला तर सारे मुस्लिम जगत पाकिस्तानच्या मागे सार्‍या शक्तीनिशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या उभे राहील. हे अमेरिकेसह भारताला परवडण्यासारखे नाही.ह्याने अण्वस्त्रधारी पाकिस्तान कट्टर पंथांच्या हाती जाईल.


गेले काही दशके आपण भारत पाक सीमेवर वाद मग दोन्ही कडील नेत्यांची आक्रमक भाषा व प्रसार माध्यमांची त्याला साथ त्यावर जनतेच्या भावना भडकणे व त्यांच्या नंतर प्रत्यक्ष काही कृती होण्याच्या आधी सर्व काही शांत व सुरळीत होणे हा खेळ आपण पाहत आलो आहोत ,
ह्या खेळाची सुरुवात पाकिस्तान करतो कारण त्यांना मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करायचे असते. असे माझे मत आहे ,
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्याही घटनेचे अनेक पैलू असतात व अनेक तर्क व शक्यता असतात त्यापैकी एक तर्क मी येथे मांडला.

आपल्या जवानांच्या मृत देहांच्या विटंबना झाल्यावर आपल्या लष्कर प्रमुखांनी प्रथम पाकिस्तान ला चेतावणी दिली त्यावर आपले सरकार आक्रमक झाले. त्यानंतर
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी ह्यांनी भारतावर थेट युद्ध खोरी ची भाषा वापरल्याचा आरोप केला , थोडक्यात पाकिस्तानात भारत आता हल्ला करणार असे वातावरण निर्माण केले. 
पाकिस्तान मधील धार्मिक चक्रीवादळ निवले. जे भारत ,पाकिस्तान व अमेरिकेसह जगाच्या शांततेच्या दृष्टीने अत्यावश्यक होते.
भारताविरुद्ध सतत कुरापत काढणाऱ्या पाकिस्तान विषयी भारताने ठोस उपाययोजना काय करावी ह्यावर माझे मत


पाकिस्तानी सैन्याला अफगाण सीमेवरून काहीही करून परत यायचे आहे ,कारण अमेरिका त्यांना डू मोर असा घोष लावते तर अमेरिकेला मदत करतात म्हणून तेहेरीके तालिबान त्यांच्यावर हल्ले करतात. त्यांचे नुकतेच २१ सैनिक नेउन ठार मारले , तेव्हा ह्यातून सुटका एकाच
भारत पाक सीमेवर अस्वस्थता निर्माण करायची त्यामुळे पाकिस्तानी आर्मी आपल्या काही बटालियन युद्धातून परत काश्मिरात आणू शकतील
म्हणून भारतीय सैन्याने त्यांच्या अश्या वागण्याला संयमाने तोंड दिले आहे ,
हे सरकार शूर नाही मान्य ,
मात्र हिंदुत्व वादी सरकार होते तेव्हा कारगील प्रसंगी सीमा रेषा का बरे नाही ओलांडली किंवा विमान अपहरण होत असतांना दहशतवादी सोडून देणे त्यातील एक आफिज सईद ने मुंबई हल्ला घडवून आणला ,
जसवंत सिंग त्या अतिरेक्यांना घेऊन चक्क गेले ,
तेव्हा काय वाटले असेल , पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकवायचा तर तेहेरीके तालिबान ला कुट नीतीच्या सहाय्याने मदत करावी , असे मला वाटते , शत्रूचा शत्रू आपला मित्र अशी म्हण आहेच.,
म्हणूनच आभासी जगतात जेव्हा मलाला मलाला हा घोष चालला होता तेव्हा मी हा लेख लिहून तेहेरीके तालिबान ची माहिती देऊन ह्या प्रकरणातील एक बाजू प्रकाशात आणली.
ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर द्यावे .
आज पाकिस्तान काश्मीर मध्ये फुटीर वादी गटाला अर्थ सहाय्य व इतर मदत करत असतील तर त्यांना कळले पाहिजे तुमच्या अर्थ व्यवस्थेच्या किमान पाचपट मोठी आमची अर्थव्यवस्था आहे ,
आम्ही पण तुमच्या देशातील अश्याच फुटीर वादी गटांना मदत केली , आधीच अशक्त असेल्या पाकिस्तानी चलन बनावट तुमच्या देशात आणले .
तर तुमचे विघटन होण्यास जराही वेळ लागणार नाहि,
चाणक्य नीती जाणणारा भारत देश आहे , हे त्यांनी लक्षात घ्यावे.

आमचे २ मारले तर तुमचे आम्ही २०० मारू मात्र ते मारण्यासाठी आपले हात रक्ताने माखण्याची काहीही गरज नाही ,
त्यांनी धर्मांच्या नावावर देश उभारला मग त्याच मुद्द्यावर सैन्य भारताच्या विरुद्ध कार्यरत ठेवले , धर्माच्या मुद्यावर दहशतवादी संघटना निर्माण केल्या , आता ह्याच धर्माचा आधार घेऊन तेहेरीके तालिबान जर पाकिस्तान मध्ये धुमाकूळ घालत असेल तर हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल.


४ टिप्पण्या :

  1. पाकिस्तानात केनेडा वरून मौलवी ताहिप उल कादरी नामक धार्मिक ,राजकीय चक्रीवादळ येत आहे ह्याची अमेरिका ,पाकिस्तान , भारत सरकारला आधीच कल्पना असावी असे मला वाटते.

    निनाद याबद्दल थोडी भर टाकू इच्छितो. कादरी हा निर्विवादपणे अमेरिकेचा एजंट आहे. ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर यावर थोडी चर्चा झाली आहे. कृपया या चर्चेचा विचार अवश्य करावा ही विनंती.
    हा त्यावरील चर्चेचा दुवा :
    http://www.aisiakshare.com/node/1514

    उत्तर द्याहटवा
  2. सागर तुमचे ह्या पंचतारांकित नगरीत मनापासून स्वागत
    मी संकेत स्थळांवर जास्त नसतो मात्र आपण दिलेल्या दुव्याचा व तेथील चर्चेचा मी मागोवा घेतला.
    चर्चेत काही निवडक सभासदांचे प्रतिसाद आहेत जे दर्जेदार आहेत.
    धन्यवाद
    कादरी ची भूमिका नक्की काय हे येत्या काही काळात कळून येईल.
    आताचे आंदोलन हे शक्ती प्रदर्शन होते व निवडणुकीत पाहूया त्याचा पक्ष काय करतो ,
    इम्रान खान च्या रेली ला सुरवातीपासून प्रचंड प्रतिसाद मिळतो मात्र ह्या गर्दीचे रूपांतरण मताच्या पेटीत परिवर्तीत होत नाही ,
    कारण निवडणुका हा भारत व पाकिस्तानात व जगभर पैश्याचा खेळ असतो.
    आणि स्थानिक हित संबंध तसेस धर्मांचे , जातीचे , पंथांचे राजकारण कारणीभूत असते.

    उत्तर द्याहटवा
  3. त्या दोघांची नावं पण आपले लोकं विसरल आहेत :(

    उत्तर द्याहटवा
  4. खरे आहे महेंद्र काका
    पुढचे पाडे पंच्चावन्न अशी अवस्था आहे.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips